विकी कौशलने घातली कतरीना कैफला लग्नाची मागणी, सलमानची प्रतिक्रिया पाहून थक्क व्हाल; पहा व्हायरल व्हिडिओ…
बॉलिवूड मधील एक अभिनेत्री अशी आहे की तिचं नाव अनेकांशी जोडल्या गेलेलं आहे. आधी सलमान, रणबीर आणि आता आहे विकी कौशल ( vicky kaushal ). आता आपल्याला लक्षात आलंच असेल की कोणत्या अभिनेत्री बाबत इथं बोललं जातंय. होय कतरिना कैफ. सध्या विकी आणि कतरिना ( kaitrina kaif ) यांच्या नात्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.
अश्यात आता ते दोघे लग्न करणार अशी गोष्ट व्हायरल होत आहे. म्हणजे विकी ने कतरिना कैफ ला चक्क लग्नाची मागणी घातलेली आहे. नेमकं काय आहे हे व्हायरल व्हिडीओ चं प्रकरण चला सविस्तर जाणून घेऊ.
विकी कौशल आणि कतरिना कैफ हे दोघे रिलेशनमध्ये आहेत, हे जवळपास आता नक्की झाले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर सतत चर्चा होतच असतात. अशातच या दोघांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे याही व्हिडीओमध्ये विकी आणि कतरिना एकमेकांशी लग्नाबद्दल बोलताना दिसत आहेत आणि ते देखील चक्क सलमान खान याच्यासमोर. या दोघांचे हे बोलणे ऐकून सलमानची प्रतिक्रिया देखील अगदी पाहण्यासारखी आहे.
सलमान ची प्रतिक्रिया येणारच ना कारण कतरिना सोबत त्याचं चांगलं प्रेम प्रकरण वालं नातं आहे. कारण सलमान नेच तिला इंडस्ट्री मध्ये लॉंच केलं.
ज्या व्हिडीओ मुळे लग्नाची गोष्ट व्हायरल होतीय त्या या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमाच्या स्टेजवर विकी कतरिनाला विचारतो, ‘सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. तर मग तू लग्न का नाही करत? मला असे वाटते की सगळीकडे लग्नाचा माहौल आहे, ते पाहून तुला देखील लग्न करावेसे वाटत असेल, म्हणून मी तुला विचारले.’ विकीच्या या बोलण्यानंतर कतरिनाही लाजून हसू लागते.
तर दुसरीकडे प्रेक्षकांमध्ये बसलेला सलमान त्यांचे हे बोलणे ऐकून हसू लागतो. मग विकी गाणे गात कतरिनाला विचारतो, ‘मुझसे शादी करोगी?’ त्यानंतर सलमान त्याच्या बाजूला बसलेल्या अर्पिताच्या खांद्यावर डोके ठेवतो आणि डोळे बंद करून घेतो. हे पाहून कतरिना म्हणते, ‘हिंमत नाहीए ‘ त्यानंतर सलमान डोळे उघडतो आणि सरळ बसतो.
कारण सलमान खान हा एक असा अभिनेता आहे की त्याच इंडस्ट्री वर खूप द’रा’रा आहे. सलामान चा राग तर खूप भयानक आहे. त्यामुळे कुणीच त्याच्या नादाला लागत नाही. म्हणून ही कतरिना म्हणाली असावी की हिंमत नाही.
तर आणखी एका व्हिडीओमध्ये स्टेजवर विकी, कतरिना आणि कार्तिक आर्यन उभे असलेले दिसतात. त्या व्हिडीओमध्ये विकी कतरिनासोबत ‘कमली कमली’ या गाण्यावर मजेशीर डान्स करताना दिसत आहे. विकी त्यानंतर कतरिना त्याच्या उरी सिनेमातील ‘ हाऊज द जोश ‘ हा डायलॉग म्हणतो, त्यावर कतरिना म्हणते, ‘हाय सर…’ सध्या कतरिना आणि विकी यांच्यात खूपच जवळीक निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत.
कतरिना आणि विकीची तसं पाहिलं तर खूप सुंदर जोडी आहे. त्यांच्या चाहत्यांना ही त्यांचं एकत्र असणं जास्त आवडत आहे असं सोशल मीडियावर दिसून येत आहे. आता त्यांच्या नात्यावर त्यांनी खुलून लवकरच बोलावे हीच साऱ्या चाहत्यांची इच्छा आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.