सलमान खानने नाकारलेले “हे” पाच चित्रपट, जे शाहरुख – आमिरने केले आणि सुपरहिट झाले…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मध्ये रोज काही न काही गोष्टी घडत असतात. घडामोडी चे प्रमाण जास्त असल्याने काही गोष्टी समोर येतात तर काही या आतल्या आतच दाबल्या जातात. पण त्या प्रेक्षकांच्या पर्यंत या आल्याच पाहिजे.

झालं असं की बॉलिवूड मध्ये सलमान खान ( Salman Khan ) ने नाकारलेले असे काही चित्रपट आहेत की जे केल्यानंतर आमिर आणि शाहरुख हे सुपरस्टार झाले. तर ते कोणते ? चला जाणून घेऊयात. कारण अश्या गोष्टींचा आपण कधी विचारच केला नसेल.

Advertisement

बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींना किती चित्रपट मिळतात आणि किती नाही हे सहसा त्यांच्या कनेक्शन, अभिनय क्षमता, प्रसिद्धी आणि नशिबावर अवलंबून असते.

दरम्यान, एकमेकांकडून चित्रपट हिसकावणे किंवा कलाकार चित्रपटातून काढून टाकणे यासारख्या बातम्याही बॉलिवूडमध्ये येत राहतात. याबाबतीत कार्तिक आर्यन ( Kartik Aryan ) आजकाल खूप चर्चेत आहे. अलीकडे, काही कारणास्तव, करण जोहरने त्याला त्याच्या चित्रपटातून काढून टाकलेले आहे. असे बरेचदा घडते की ज्या चित्रपटाला ऑफर होऊन सुध्दा कलाकार साइन करत नाहीत ते जेव्हा इतरांच्या खात्यात जातात. तेव्हा इतरांचे आयुष्य घडवून जातात ते चित्रपट. म्हणजे एकंदरीतच असे चित्रपट कधीकधी ब्लॉकबस्टर आणि सुपर-डुपर हिट सुद्धा ठरतात. ठरलेली आहे जो इतिहास आहे.

See also  या मोठ्या कारणामुळे रितेश सोबत लग्न न करण्याचा सल्ला अभिनेत्री जेनेलियाने नाकारला, कारण ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

बॉलिवूडच्या दबंग अर्थात सलमान खानच्या हातातून बाहेर गेलेल्या चित्रपटांबद्दल आज जाणून घेऊया, जे इतर कलाकारांसाठी जबरदस्त हिट ठरले. हे चित्रपट केवळ हिट नव्हते, तर हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतके आवडले की त्या कलाकारांचे करिअर बनले.

बाजीगर : एका मुलाखतीदरम्यान सलमान खानने स्वतः ही गोष्ट सांगितली की त्याला शाहरुख खानच्या आधी बाजीगर चित्रपटाची ऑफर मिळाली होती. या चित्रपटासाठी अब्बास मस्तानने सलमान खानची भेट घेतली होती. सलमानने सांगितले की यासाठी त्याने त्याच्या वडिलांना विचारले ज्यांनी नकारात्मक पात्र असल्यामुळे हे करण्यास नकार दिला. यानंतर शाहरुख ( Shahrukh Khan ) खानला हा चित्रपट मिळाला. आणि चित्रपटासोबत अभिनेता ही गाजला.

Advertisement

दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे – बॉलिवूडच्या सर्वात ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ने शाहरुखच्या कारकिर्दीला एक नवीन उड्डाण दिले. यश व प्रसिद्धी सोबतच पैश्याचे शिखर गाठून दिले.

See also  'राजा हिंदुस्थानी' तील 'त्या' किसिंग सिन बाबतीत करिश्मा कपूरने केला खुलासा, म्हणाली, "अमीर...

पण शाहरुखच्या आधी या चित्रपटाची ऑफर सलमान खानला आली. शाहरुखच्या आधीही सैफ अली खानला चित्रपट करण्याची ऑफर आली होती. पण ही भूमिका पुन्हा शाहरुख खानकडे गेली आणि तुम्हाला माहिती आहेच की पुढे काय झाले. चित्रपट , कलाकार सुपरहिट

Advertisement

2008 मध्ये आलेला गजनी हा 100 कोटींचा व्यवसाय करणारा बॉलिवूडचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात आमिर खानच्या ( Aamir Khan ) आधी सलमान खानला संजय सिंघानियाची भूमिका मिळाली, पण त्याने स्क्रिप्ट नाकारली. हा चित्रपट त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

चक दे ​​इंडिया ( Chak de India ) : हा भारतातील खेळांवर बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट मानला जातो. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून तसेच समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळाली होती. असे म्हटले जाते की सलमान या चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल आनंदी नव्हता. यामुळे त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला. जो शाहरुख ने केला आणि लोकप्रिय झाला.

See also  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या लग्नविधींना झाली आहे सुरुवात?, फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...
Advertisement

कल हो ना ( Kal Ho Na Ho ) : 2003 चा चित्रपट कल हो ना हो आठवत असेलच. उत्कृष्ट गाणी, पटकथा आणि अभिनयाने सजलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला आहे.

पण या चित्रपटात सैफ अली खानची ( Saif Ali Khan ) भूमिका सर्वप्रथम सलमानला देऊ करण्यात आली होती पण त्याला शाहरुखसमोर छोटी भूमिका करायची नव्हती. आणि मग त्याने हा चित्रपट देखील नाकारला. तर अश्या प्रकारे सलमान खान ला अजुन लोकप्रिय करून टाकणारे चित्रपट त्याने नाकारले.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close