महाराष्ट्रातील मराठी तरुण कॉर्पोरेटमधील नोकरी सोडून अंजीरची लागवड व उत्पादन प्रक्रियेद्वारे कमावतोय करोडों रुपये…

एकेकाळी पुण्यात कॉर्पोरेट क्षेत्रातील आपली चांगली जम बसलेली, पर्मनंट नोकरी सोडून महाराष्ट्रातील दौंड येथील मराठमोळा तरुण समीर डोंबे आज अंजीराची लागवड व प्रक्रिया करून शेती करीत आहे. शेतीक्षेत्रात उतरुन शेतीला उत्पादन, व प्रक्रियेचा व्यवसाय बनवून यशस्वी झालेल्या या तरूण शेतकऱ्याची ही यशोगाथा आहे. तो केवळ अंजीर पिकवतच नाही तर त्यावरील प्रक्रियेच्या क्षेत्रातही नवनवीन प्रयत्न करुन थेट ग्राहकांपर्यंत त्याचे प्रॉडक्ट्स पोचवत आहे. आज जाणून घेऊयात त्यांची यशोगाथा!

२०१३ मध्ये समीर डोंबे यांनी आपली कॉर्पोरेट नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. मूळचा महाराष्ट्रातील दौंडचा रहिवासी असलेले समीर पुणे येथील एका कंपनीत काम करत होता आणि महिन्याला त्यावेळी चाळीस हजार रुपये मिळवत होता. पण नोकरीच्या दीड वर्षातच तो या जॉब रुटीनला कंटाळायला लागला, कारण वेळ कमी, काम खूप आणि प्रचंड दगदग आणि एवढे करुनही त्याला या कामातून जराही समाधान मिळत नव्हते. मग त्याने काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला आणि अंजीर लागवड सुरू केली. तसे त्याच्या कुटुंबात आधीच्या दोन पिढ्यापासून अंजिराची लागवड केली जात आहे.

समीर म्हणतात की, “सुरुवातीला सोबत कुटूंबातील सदस्य किंवा मित्र कोणीही नव्हते. चांगली नोकरी सोडण्याच्या माझ्या निर्णयामुळे कोणीही खूश नव्हते. वास्तविक कृषी क्षेत्रातील अनिश्चिततेमुळे कुटुंबातील सदस्य माझ्या निर्णयाच्या विरोधातच होते. पण मला माझ्यावर आत्मविश्वास होता. मी सुरुवात केली आणि हळूहळू सर्वांचे सहकार्य होऊ लागले. आज मी अंजीर लागवडीतून वर्षाकाठी दीड कोटी रुपये कमवत आहे.” ते पुढे म्हणतात, “सुरुवातीला घरच्यांचा वि’रो’ध असण्याचे मुख्य कारण म्हणजे, शेतीतील अनिश्चितता. एकतर त्यांनाच शेतीत अपेक्षित फायदा मिळत नव्हता. दुसरे म्हणजे या क्षेत्रात सिंचनाच्या साधनांची तीव्र कमतरता. त्यामुळे पावसावर अवलंबून राहावे लागे. तसेच, आई व वडिलांना ही भीती होती की जर नोकरी गेली तर मला मुलगी कोण देणार? माझे लग्न जमणार नाही. ”

पण अंजीर लागवडीबद्दल समीरच्या मनात बरेच काही अभिनव प्रयोग करायचे चालले होते. त्याने आपल्या अडीच एकर जागेवर अंजीर उगवायला सुरुवात केली. समीरने आपल्या उत्पादनांचे ब्रँडिंग व मार्केटिंग करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. त्यांनी अंजिराला एक किलोच्या पॅकेटमध्ये पॅक केले आणि ते बाजारात विक्रीसाठी तयार केले. त्यांचे हे छोटे पॅकेट पाहून एका मित्राने सांगितले की तुम्ही सुपर मार्केटमध्ये प्रयत्न केले पाहिजेत.”

समीरने एकाच ठिकाणी डील फायनल केली आणि तेथूनच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर त्याने त्याचे नाव ‘पवित्रक’ ठेवले आणि इतर तीन ठिकाणी डिलिव्हरी देखील सुरू केली. हळूहळू त्यांच्या उत्पादनांची मागणी वाढू लागली. आज त्याच्या शेतात पिकवलेले अंजीर पुणे, मुंबई, बेंगळुरू ते थेट दिल्ली पर्यंत पोचत आहेत. त्यांनी त्यांच्या पॅकेजिंगवर त्यांचा फोन नंबर आणि पत्ता लिहिला. अशा प्रकारे मग काही ग्राहकांनी थेट त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरवात केली. समीरने या ग्राहकांचा एक गट तयार केला आणि त्यांच्याकडून बल्क ऑर्डर घेणे सुरू केले. यामुळे त्याला अधिक नफा कमविण्याची संधी मिळाली.

“अंजीर पोषक तत्वांनी समृद्ध असतात, परंतु केवळ भौगोलिक परिस्थितीवर आधारित निवडक ठिकाणीच शक्य होते. दौंड हे डोंगराळ स्थान असल्यामुळे या फळासाठी ते एक उत्कृष्ट परिपूर्ण क्षेत्र आहे. त्यांची शेती प्रदूषणापासून दूर आहे, कारण महामार्ग सुमारे १० किमी अंतरावर आहे.

शेतीला गोड्या पाण्याचा पुरेश्या प्रमाणात पुरवठाही उपलब्ध आहे.” समीर म्हणतात,” कोणतेही प्रदूषण नसलेले आणि डोंगराळ भागात वेढलेले असल्यामुळे अंजिराच्या वाढीसाठी उत्तम परिस्थिती आहे. यामुळे त्यांचे फळ उच्च प्रतीचे आहेत, जे त्यांच्या ग्राहकांना आवडतात. तसेच बाजारात या फळाची व्यापक प्रमाणात उपलब्धता नसते. मी मागणी लक्षात घेऊन योग्य वेळी हमखास, गरजेनुसार पुरवठा करतो आणि माझ्या यशस्वी व्यवसायाचा हाच योग्य नियम आहे.”

अखेरीस, त्याने आपल्या शेतीचा विस्तार २.५ एकरा पासून ते ५ एकरपर्यंत केला आणि अंजीरपासून जाम, पल्प आणि इतर उत्पादने तयार करण्यासाठी मग फूड प्रोसेसिंग युनिटची स्थापनाही केली. समीर म्हणतो की, ” ग्राहकांशी त्यांच्या असलेल्या थेट संपर्कामुळे कोविड-१९ च्या लॉकडाऊन दरम्यानही त्याचा व्यवसाय चालू ठेवण्यास मदत झाली. मी अनेक ग्राहकांशी संपर्क साधला ज्यांनी अभिप्राय दिले आणि आमच्याशी थेट संपर्क साधला. आम्ही व्हॉट्सअपवर ऑर्डर घ्यायला सुरवात केली. लॉकडाऊन दरम्यान, जेव्हा सुपरमार्केटने आमची फळे विकत घेतली नाहीत, तेव्हा आम्ही आमचे उत्पादन असेच ऑर्डर घेऊन विकले. लॉकडाऊन दरम्यानही अंजीर विक्रीतून सुमारे 13 लाखांची कमाई केली.”

हा तरुण कृषी-उद्योजक म्हणतो की,”सरकारवर टी’का करुन काही फायदा होणार नाही. आता शेतकर्‍यांना स्वत:च्या उत्पादनासाठी स्वतःच बाजारपेठ तयार करावी लागणार असून यासाठी शेतकर्‍यांना प्रक्रियेच्या क्षेत्रात प्रवेश करावा लागणार आहे. चांगल्या प्रतीची फळं प्रति किलो ८० ते १०० रु. किलोप्रमाणे विकतात. नवनवीन पद्धती अवलंबुन शेतकरी चांगला नफा कमवू शकतात. आम्हाला आमच्या कृषी उत्पादनांचा व्यापार करावा लागेल आणि त्यास कॉर्पोरेट बाजारासारखे ब्रँड बनवावे लागेल, कलात्मक व सर्जनशील टॅगलाइन आणि पौष्टिकतेवर जोर द्यावा लागेल. केवळ यामुळेच आम्हा शेतकऱ्यांची प्रगती होईल. लवकरच आता अंजीरापासून वाईन बनविण्याचाही मानस असल्याचेही समीर यांनी सांगितलंय. ”

समीरच्या या उपक्रमाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या स्टार मराठी टीम तर्फे अंजीर शेती व उत्पादन प्रक्रिया उद्योग करणाऱ्या समीरच्या उपक्रमाचे कौतुक आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment