महामा’री’त र’क्तदानासाठी अहोरात्र झटणाऱ्या “या” मराठमोळ्या अभिनेत्याच्या कार्याला सलाम…
कोरोनाचं सा’व’ट लक्षात घेऊन या काळात असलेली र’क्ता’ची आणि त्याच बरोबरीने असलेली प्ला’झ्मा’ची जीवनर’क्ष’क गरज समजून घेऊन आपल्या मराठी सिने-नाट्यसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संदीप पाठक याच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात विविध ठिकाणी र’क्त’दा’न शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा सं’स’र्ग भारतभर पाहायला मिळतो आहे. अनेक कलाकार आता कोरोनाच्या या ल’ढा’ई’त उतरले आहेत.
काहींनी सोशल मीडियाची मदत घेऊन कोरोनासंबंधीच्या बातम्या लोकांना सांगायला सुरुवात केली आहे. मदत इकडून तिकडे पोहोचवायला सुरुवात केली आहे. तर काही कलाकारांनी आपआपल्या परीने खारीचा वाटा उचलायला सुरुवात केली आहे. संदीप पाठक हा त्यापैकी एक.
संदीप पाठक या कलाकाराला आपण अनेक चित्रपट, नाटकांतून पाहिलं. वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकाचे प्रयोग तो करतोच. पण रंगा पतंगा, एक हजाराची नोट अशा अनेक चित्रपटांमधून तो दिसला आहे. म्हणूनच त्याचा असा एक चाहतावर्ग तयार झाला आहे.
कोरोनाचं सा’व’ट लक्षात घेऊन या काळात असलेली र’क्ता’ची गरज समजून संदीपने सोमवारी रक्तदान केलं. त्यासंबंधी त्याने एक पोस्ट करुन ती सोशल मीडियावर टाकली. आपण र’क्त’दान करतो आहोतच. पण लोकांनीही र’क्त’दानासाठी पुढे यावं असं आवाहन त्याने केलं. पण इतकं करुन तो थांबला नाही.
र’क्त’दा’नाचा हा संकल्प त्याने आपल्या गावी म्हणजे बीड जिल्ह्यातल्या माजलगाव या तालुक्यात करायचं ठरवलं. संदीप कामानिमित्ताने सध्या मुंबईत असतो, पण माजलगावात त्याचा मोठा मित्र परिवार आहे. माजलगावात काही नड असेल किंवा कुणाला कशाची गरज असेल तर जीव माजलगांव आणि लव माजलगांव असे दोन तरुणाईचे ग्रुप आहेत. ही मुलं तालुक्यासाठी सकारात्मक काम करत असतात. संदीपने र’क्त’दान केल्याचे फोटो, व्हिडीओ तिथल्या ग्रुपवर टाकले आणि या तालुक्यात १०० बाटल्या र’क्त संकलन करण्याचा संकल्प माजलगावकरांना बोलून दाखवला.
संदीपची ही योजना तिथल्या तरुणाईला आवडली. जीव माजलगाव आणि लव माजलगांव असे ग्रुप या कामाला लागले. याबद्दल बोलताना संदीप म्हणाला, “माजलगाव हा तालुका जरी असला तरी तिथे र’क्तपेढी नाही. प्ला’झ्मा वगैरे तर लांबची बात. शिवाय, व्हें’टि’ले’ट’र’ची सुविधा नाही. ऑ’क्सि’ज’न’ची सुविधा नाही. र’क्त’दा’न शिबीर जरी घेतलं तरी बीडहून र’क्त’संकलनालाठी डॉ’क्ट’रां’ची टीम येते. सर्व बाटल्या घेऊन ती गाडी बीडला जाते.
तिथल्या र’क्त’पेढीत ते ठेवलं जातं आणि तिथून आवश्यक ठिकाणी त्याचा पुरवठा होतो. मी रक्तदान केलं आहेच. पण र’क्ता’ची खूप गरज आहे सध्या. यातून ही संकल्पना उदयाला आली. या योजनेला प्रतिसादही चांगला आहे. ३० एप्रिलला माजलगावात मां वैष्णवी मंगल कार्यालय इथे हे रक्तदान शिबीर यशस्वी पार पडले. माजलगावातल्या लोकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
संदीपच्या या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता केवळ माजलगावच नव्हे, तर आसपासच्या परळी, आंबेजोगाई अशा छोट्या ठिकाणांपासून तर हळूहळू संपूर्ण अशी र’क्त’दान शिबीरं व्हावीत आणि त्यातून र’क्त’संकलन व्हावं अशी अपेक्षा संदीपची आहे व त्यानुसार तो आणि त्याची मित्रमंडळी धोरणात्मक व नियोजनबद्ध पद्धतीने या जीवर’क्ष’क कामाला लागली आहेत. आपण स्वतः रक्तदान करतानाच परिस्थितीचं गां’भी’र्य ओळखून आपल्यासह इतरांनाही या मोहिमेत सहभागी करुन घेण्याचा संदीपचा प्रयत्न खरोखरीच कौतुकास्पद म्हणावा लागेल.