‘हा’ तर पंकजा मुंडेना खतम करण्याचा डाव, जाणून घ्या असं का म्हणाले संजय राऊत?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मुंबई: 7 जुलै रोजी पार पडलेल्या मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात अनेक धक्कादायक आणि आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळात अनेक अविश्वसनीय फेरबदल झाले. प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, हर्षवर्धन इत्यादि ज्येष्ठ नेत्यांकडून राजीनामे घेण्यात आले. तसेच अनेक नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली.

या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून 4 खासदारांना मंत्रिपद देण्यात आले. यात प्रीतम मुंडे यांचंही नाव आघाडीवर होतं. मात्र, ऐनवेळी त्यांना मंत्रीपदापसून वंचित ठेवण्यात आलं. यामुळे मुंडे भगिनींमध्ये तीव्र नाराजी असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखात भागवत कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडे यांना खतम करण्याचा डाव आहे असा दावा केला आहे.

See also  जय मल्हार च्या धुमधडाक्या नंतर धडाकेबाज महेश कोठारेंची नवी कोरी मालिका येतेय प्रेक्षकांच्या भेटीला.

पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठी…

भागवत कराड यांना केंद्रात राज्यमंत्रीपद देण्यात आलं. ते गोपीनाथ मुंडे यांच्या सावलीत वाढलेले नेते आहेत. प्रीतम मुंडे यांना डावलून त्यांना मंत्रिपद देणे म्हणजे पंकजा मुंडे यांना खतम करण्याचा डाव आहे. तसेच वंजारी समाजात फुट पाडून पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठी हे सर्व केलं की काय, ही शंका घ्यायला जागा असल्याचेही , या अग्रलेखात म्हटले आहे.

नारायण राणे यांच्या मंत्रीपदाबाबत दिली प्रतिक्रिया…

आजच्या सामना अग्रलेखात मंत्रिमंडळ विस्तारातील बर्‍याच बाबीवर टीका करण्यात आली आहे. यात ज्येष्ठ नेत्यांचा राजीनामा तसेच निष्ठावंत नेत्यांना डावलून आयात केलेल्या नेत्यांना मंत्रिपद देणे इत्यादि बाबींचा समावेश आहे.

नारायण राणे मूळचे भाजपचे नाहीत. शिवसेना ते कॉंग्रेस आणि आता भाजप असा त्यांचा प्रवास आहे. नारायण राणे यांची गृह , संरक्षण, अर्थ या सारखे महत्वाचे खाते सांभाळण्याची क्षमता आहे. त्यांना महत्वाचे खाते मिळेल असं वाटलं होतं. मात्र, त्यांना लघु, मध्यम उद्योग खाते देण्यात आले. नेहमी ठरल्याप्रमाणे त्यांना अवजड उद्योग खाते मिळाले नाही. ही समाधानाची बाब असल्याचेही अग्रलेखात म्हटले आहे.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment