मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे झाला जुळ्या बाळांचा “बाप”, बाळांच्या हटके नावांची होतेय चर्चा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

जगात जर्मनी तर भारतात परभणी ! हे वाक्य बोलून आपल्या कवितेच्या, अभिनयाच्या आणि सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून रसिकांना खळखळून हसवणारा मनोरंजन करणारा अभिनेता नुकताच बाप झाला आहे. या गोष्टी चा फोटो आणि पोस्ट त्याने सोशल मीडियावर टाकलेली आहे. ती सध्या खूपच व्हायरल होत आहे.

Sankarshan Karhade

सध्या लॉक डाउन आहे; पण अस्वस्थ असणाऱ्या काळात त्या अभिनेत्या ला आनंद होईल अशी घटना त्याच्या आयुष्यात घडण्याचा काल योग आला. बाप होणं खरंच जबाबदारी ची गोष्ट असते आणि तो अभिनेता खूप उत्तम रित्या ती पूर्ण पाडतोय आणि पाडत राहणार आहे. कारण आजपर्यंत चा त्याचा प्रवास हा काही साधा सुधा नाही. खूप खचता खाऊन त्याने इथपर्यंत ची वाट मिळवली आहे.

See also  "देवमाणूस" मालिकेतील टोन्याच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात दिसते अशी, पहा तिचे सुंदर फोटो...

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं कोणत्या अभिनेत्या बद्दल बोललं जातंय. तर होय एकच असा बहुरंगी विनोदी कवितेतून वास्तव मांडणारा अभिनेता आहे ज्याने परभणी तून येऊन आज मनोरंजन क्षेत्रात बस्तान बसवलं. तो म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. ज्याला आपण वेगवेगळ्या मालिका आणि इतर चित्रपट किंवा गोष्टी मधून पाहतच आलेलो आहोत.

Sanghrshan Karhade

एक महिनाभर आधीच म्हणजे 27 जून 2021 रोजी संकर्षण बाप झाला; पण फक्त त्याने कळवलं नव्हतं. त्यामुळे कुणालाही कळलं नाही. काल त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली लेट पोस्ट म्हणून आणि कळवलं की बाप झालो म्हणून. आता बघा त्याच्या आयुष्यात आनंद किती असेल. म्हणजे तो एका मुलाचा आणि मुलीचा बाप झालेला आहे.

होय म्हणजेच त्याला दोन जुळे मुलं मुली झालेले आहेत. त्याच्या इतकं नशिब फक्त त्याचच. कारण इतके गोंडस मुलं म्हणजेच एक मुलगा आणि एक मुलगी त्याला झालेले आहेत. सोशल मीडियावर बाळांचे फोटो आपल्याला पाहायला मिळतील. यावर कॉमेंट करून चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीत सहकलाकारांनी त्याला खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

See also  "तू सौभाग्यवती हो" मालिकेतील 'ऐश्वर्या' आहे प्रसिद्ध अभिनेत्याची लहान बहीण, नाव ऐकून थक्क व्हाल!

442154 karhade

संकर्षण ने त्यांचे नावे ही ठेवलेली आहेत. सर्वज्ञ आणि स्रगवी. किती गोड नावे आहेत. म्हणजे सर्वज्ञ म्हणजे ज्ञानी आणि मुलीच्या नावाचा अर्थ आहे पवित्र तुळस. खूप विचार करून त्याने ही नावे ठेवलेली आहेत.

संकर्षण कऱ्हाडे हा आपल्याला आवडला तो झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या आम्ही सारे खवय्ये मधून. खूप उत्तम शो रन करायचा तो. त्यानंतर वेगवेगळ्या मालिकेत ही त्याने काम केलं. पुढे चित्रपट ही केले. आता तो कवी म्हणून जरा जास्तच परिचयाचा झालेला आहे. त्याच्या कविता सोशल मीडियावर फार व्हायरल होत असतात.

तर संकर्षण सारख्या हरहुन्नरी आणि सशक्त नटाला बाप झाल्याच्या खूप शुभेच्छा. आणि सर्व परिवाराचं अभिनंदन. असेच वेगवेगळ्या नाटक, सिनेमा आणि वेब ,मालिका मधून अभिनयाचा नजराणा पाहायला चाहते रेडी आहेत. बाकी आज साठी एवढंच. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. वाचत रहा. स्टार मराठी.

See also  ‘देवमाणूस’ फेम सोनाली पाटील दिसणार मराठी बिगबॉसमध्ये? हे कलाकार दिसू शकतात बिग बॉस मराठी 3 ऱ्या पर्वात...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment