सारा अली खान व जान्हवी कपूरने घेतले केदारनाथचे दर्शन, सोशल मीडियावर फोटो होत आहेत व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे बीचवरील किंवा एखाद्या हॉटेलवरील, पार्टीतील असे फोटोज् प्रचंड वायरल होताना आपण नेहमीच पाहतो. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या फेवरेट स्टार्स विषयी सगळ्या अपडेट्स मिळतात. तर स्टार्स लोकांचे फॅन फॉलोइंग यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढते. परंतु हे ऐकून तुम्हांला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल की अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी नुकतेच उत्तराखंड मधील केदारनाथ मंदिराचे एकत्र दर्शन घेतले.

या दोन्ही अभिनेत्रींचे सध्या सोशल मीडियावर केदारनाथ दर्शनाचे फोटोज् वायरल होत आहेत. ज्यामध्ये त्या पूजाअर्चा करताना दिसत आहेत. काही फोटोज् मध्ये तर ह्या दोघी सुद्धा हिमालयाकङे पोज देताना दिसत आहेत. अभिनेत्री सारा आणि जान्हवी ह्या दोघीही एकमेकींसोबत नेहमीच स्पॉट होताना दिसतात. रणवीर सिंह च्या शो द बिग पिक्चर मध्ये सुद्धा त्या दिसल्या होत्या.

See also  चित्रपटांमध्ये काम मिळत नाहीये म्हणून खूप परेशान झालाय अभिषेक बच्चन, विकून टाकला आलिशान फ्लॅट...

sara 1635749266

या वायरल फोटोज् मध्ये सारा ने ईयरमफ्स सोबत जांभळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. तर जान्हवी ने मफलर सोबत सिल्वर रंगाचे जॅकेट घातले आहे. आपल्या एका फॅन्ससोबत चा फोटो सुद्धा त्यांनी वायरल केला आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये सारा अली खान आणि जान्हवी कपूर ह्या दोघीही खूप खुश दिसत आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर ही आपल्या सिल्व्हर बॉम्बर जॅकेट मध्ये अफलातुन दिसत आहे. तिने आपले केस मोकळे सोडले आहेत आणि एक सुंदर शॉल सुद्धा परिधान केला आहे. तर अभिनेत्री सारा अली खान ही सुद्धा खूप क्यूट दिसत आहे. तिने आपल्या हुङीवर जांभळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे.

अभिनेत्री सारा अली खान च्या वर्कफ्रंट विषयी म्हणायचे झाले तर ती शेवटची वरुण धवन ची कॉमेडी फिल्म “कुली नंबर 1” मध्ये दिसली होती. तर तिचा आगामी चित्रपट “अतरंगी रे” हा लवकरच रिलीज होण्याच्या तयारीत आहे. आनंद एल राय च्या या फिल्म मध्ये अक्षय कुमार आणि धनुष हे दोघेही मुख्य भूमिकेत आहेत. तर अभिनेत्री जान्हवी कपूर ही शेवटी हॉरर कॉमेडी रुही मध्ये राजकुमार राव आणि वरुण शर्मा सोबत दिसली होती. तर लवकरच ती धर्मा प्रोडक्शन च्या “दोस्ताना 2” मध्ये सुद्धा दिसणार आहे.

See also  भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे सोंगाड्या आहेत, 'या' भाजप नेत्याने केली जहरी टीका

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment