‘या’ भारतीय क्रिकेटरवर फिदा आहे ‘ही’ प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!
क्रिकेट आणि बाॅलिवूड हे समीकरण भारतात तरी नव्याने सांगायला नको. अर्थातच अनेक सिनेअभिनेत्र्या बऱ्याचदा क्रिकेटपटूंच्या शैलीच्या फॅन झाल्या तिथून पुढे काहींचा प्रवास थेट लग्न वगैरे इथपर्यंत सुखरूपरित्या पोहोचला. भारतीय संघाचा सध्याचा कर्णधारच उधारण म्हणून पहा ना. सध्या पुन्हा चर्चेत येतोय तो मध्यंतरी आपल्या शैलीचा सूर हरवलेला ऋषभ पंत. सराव कसोटी सामन्यात नुकतीच त्याने त्याची फलंदाजी जराअधिक सुधारल्याच नमुना उत्तमरित्या सादर केला.
मागे ऋषभ पंत बराच काळ सोशल मिडीयावर चर्चेत राहिला तो त्याच्या एका खास बाॅलिवूडशी जडलेल्या कनेक्शन मुळे आणि त्यावर त्याने दिलेल्या काही खास प्रतिक्रीयांमुळे. परंतु आता नेमकं पुन्हा त्याच बाॅलिवूडशी काय असं कनेक्शन जोडल्या जातयं; हे आपण पाहूयात.
आपल्या सर्वांना हे चांगलचं ठाऊक असेल की, वर्ल्ड कप २०१९ पासून महेंद्रसिंग धोनी सतत भारतीय क्रिकेट संघापासून दूर होता आणि महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋषभ पंतला सतत अनेक संधी देण्यात आल्या. नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत ऋषभ पंतच्या जागी केएल राहुलवर विकेटकीपिंगची जबाबदारी देण्यात आली होती.
मुळात के.एल. राहुल याने ही जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली आहे; आणि सध्या ऋषभ पंतला भारतीय क्रिकेट संघात टिकणे कठीण होईल, अशी अपेक्षा लोकांमधे निर्माण होत आहे. पण ऋषभ पंत लवकरच भारतीय क्रिकेट संघात असेल, असा दिग्गजांचा विश्वास आहे. एक मोठा पुनरागमन तो करेल. लोकांना ऋषभ पंत खूप आवडतो, तो त्याच्या खूबीमुळे.
आजच्या काळात त्याची लोकप्रियता खूप वेगवान गतीने वाढली आहे. सोशल मिडीयावर ऋषभ पंतसाठी भरपूर मुली अक्षरश: वेड्या आहेत. जरी ऋषभ पंत हा बऱ्याच मुलींची आवड आहे, तरी आजच्या आपल्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला एका मुलीबद्दल सांगणार आहोत जिने संपूर्ण देशाला वेड लावले आहे मात्र तीदेखील ऋषभचीच चाहती आहे.
तुम्हाला आम्ही ज्या मुलीबद्दल सांगत आहोत ती कोणी इतर सामान्य मुलगी नसून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री “सारा अली खान” आहे. सारा अली खान ही “सैफ अली खानची” मुलगी आहे. आणि तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये जबरदस्त काम केले आहे. मित्रांनो, सारा अली खानला भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत खूप आवडतो. सारा अली खान ऋषभ पंतच्या फलंदाजीची खूप जास्त चाहती आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.