सारा अली खानने हिंदू मुलाशी केले लग्न? कपाळावर भरलेल्या सिंदूराचा फोटो झाला व्हायरल
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशलचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री सारा अली खान कपाळावर सिंदूर आणि बिंदी लावताना दिसत आहे. दोघेही त्यांच्या एका चाहत्यासोबत फोटोसाठी पोज देताना आढळले आहेत. सारा अली खान आणि विकी कौशल यांना काही दिवसांपूर्वी इंदौरमध्ये पाहिलं गेलं होतं. जेथे ते त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग करत होते.
या फोटोत सारा अली खान गृहिणीसारखी दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे म्हटले जात आहे की, विकी कौशल आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान एका नवीन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहेत.
या चित्रपटाच्या शूटिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्या अभिनेत्रीच्या चाहत्याने हा फोटो शेअर केला आहे. तो तिची स्तुती करत आहे आणि “विकी कौशल आणि सारा अली खानसोबत छान दिसत आहे” असे त्याने कॅप्शन दिले आहे.
हे फोटो चित्रपटाच्या शूटमधील आहेत या फोटोंबाबत चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. नेटिझन्स देखील कमेंट करून या दोघांवर ही प्रेम व्यक्त करताना दिसले, एका वापरकर्त्याने कमेंट केली की, “सारा आणि विकी कौशल एकत्र छान दिसत आहेत.” आत्तापर्यंत फोटोंवर हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. फोटो पाहून दोघेही एका चित्रपटासाठी शूटिंग करणार असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला आहे.
सारा अली खान आणि विकी कौशल इंदौरमध्ये बाईकवर फिरताना दिसले या फोटोमध्ये सारा अली खान फ्लोरल प्रिंटची साडी परिधान केलेली दिसत आहे. दुसरीकडे, विकी कौशल निळ्या टी-शर्टवर लाल जॅकेट घातलेला दिसत आहे. दोन्ही सेलिब्रिटी त्यांच्या बाइकवरून इंदौरच्या रस्त्यांवर फिरताना दिसले. तेव्हा त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटात सारा अली खान आणि विकी कौशल काम करत आहेत तुम्हाला सांगू इच्छितो की, अभिनेत्री सारा अली खान आणि विकी कौशल लक्ष्मण उतेकर यांच्या लुका छुप्पी पार्ट 2 चे शूटिंग करताना दिसत आहेत. मात्र हे फोटो कोणत्या चित्रपटाचे आहेत हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण लवकरच त्याचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.