मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी “सारा” पडलीय या प्रसिद्ध क्रिकेटरच्या प्रेमात, क्रिकेटरचे नाव ऐकून थक्क व्हाल!

यंदा कोविड मुळे होईल की नाही याची शक्यता देता येत नव्हती. कारण भारतात खूप पेशंट वाढू लागले आणि त्यामुळे बरेच महिने निघून गेले. पण नंतर भारताच्या बाहेर का होईना पण आयपीएल घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आता रोज मॅच चालू झाल्या आहेत. यात सोशल मीडियाच्या माध्यमातून सारा ही सचिन न तेंडुलकर ची मुलगी अचानक क्रिकेट आणि क्रिकेट पट्टू प्रेमामुळे चर्चेत आली आहे.

IPLचा १३वा हंगाम युएईमध्ये सुरु आहे. १९ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या सामन्यात काही धडाकेबाज फलंदाजी आणि आक्रमक गोलंदाजी पाहायला मिळाली. आयपीएल सुरू असल्यामुळे फक्त मैदानावर नाही तर मैदानाबाहेर विशेषत: सोशल मीडियावर खेळाडूंद्वारे शेअर केल्या जाणाऱ्या पोस्टवर सर्वांचे लक्ष असते. पण यावेळी चर्चेत आली आहे ती भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर होय.

आता सारा तेंडुलकर नेमकी का चर्चेत आलेली आहे ? तर त्याला ही एक खूप कारणे आहेत. एक एक करून आपण जाणून घेऊयात.

भारतीय संघाकडून खेळणारा युवा फलंदाज आणि सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा सलामीवीर शुभमन गिल  आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा यांच्यावर क्रिकेट चाहत्यांची नजर आहे. या दोघांच्या पोस्टवरून ‘दो दिल मिल रहे है’, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी शुभमन आणि सारा यांनी एक सारखी कॅप्शन असलेली पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. तेव्हा हे दोघे सर्व प्रथम नजरेत आले होते.जुलै महिन्यात शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांनी आपल्या सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. अर्थात त्यात खास असे काहीच नव्हते. पण या दोघांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एक साम्य होते. हे साम्य म्हणजे फोटोच्या खालील लिहलेली कॅप्शन होय.

या दोघांच्यात काही सुरू आहे की नाही हे माहित नाही. पण ही चर्चा आणखी जोरात पुन्हा सुरू झाली आहे. त्याचे कारण ठरले आहे, साराची नवी इस्टाग्रामवरील स्टोरी होय. बुधवारी साराने एक इस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती. ही पोस्ट मुंबई आणि कोलकाता या दोन संघातील सामन्यातील होती.

साराने मुंबई-कोलकाता मॅचचा व्हिडिओ क्लिक रेकॉर्ड केला होता. क्लिपमध्ये कोलकाताचा खेळाडू शुभमन गिलने सुर्यकुमार यादवने मारलेला एक चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला होता. साराने शेअर केलेली ही स्टोरी सध्या पाहता येत नसली तरी चाहत्यांनी त्याचा स्क्रिनशॉर्ट काढून ठेवला आहे.

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चा सुरू झाली आहे. सारा आणि शुभमन यांच्याबद्दल चर्चा सुरू असल्याचे आणखी एक कारण म्हणजे या स्टोरीमध्ये साराने हार्टची इमोजी लावली होती.

त्यामुळे अनेकांना असं वाटलं की सारा नक्कीच शुभमन च्या प्रेमात पडलेली आहे. तिला त्यावर बऱ्याच कॉमेंट ही आल्या. त्यामुळे तिच्या इंस्टा आणि फेसबुकवर प्रचंड नजर क्रिकेट प्रेमी रसिक ठेवत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment