या मंदिरात देवीचा अभिषेक होतो चक्क शाईने, कारण ऐकून थक्क व्हाल!
.
उज्जैन येथे असलेल्या प्राचीन काळातील वाग्देवी मंदिराबाबत अनेक रंजक गोष्टी आहेत, ज्याबद्दल सहसा तिककीशी माहिती बऱ्याचदा उपलब्ध होत नाही. तर या लेखात आम्ही तुम्हाला याच मंदिराबाबत असणाऱ्या विशिष्ट खास गोष्टींबद्दल सांगणार आहोत.
उज्जैन हे मध्यप्रदेशातील महत्वाचं स्थळ ते अर्थातच प्रसिद्ध आहे ते महादेवाच्या मंदिरामुळे. परंतु याच उज्जेन शहराच्या इतर काही खास बाबीही आहेत, उज्जैन या पवित्र धर्मस्थळाच्या ठिकाणी ज्ञानाच्या देवीचं अर्थात सरस्वती देवीच पुरातन मंदिर आहे. “वाग्देवी मंदिर” असं या मंदिराला नाव प्राप्त झालं आहे.
या मंदिरात ज्ञानाची देवी मानल्या जाणाऱ्या सरस्वतीची मुर्ती “नील सरस्वती” या रूपात स्थित आहे. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर या देवीचा मोठा अभिषेक केला जातो. वसंत पंचमीचा सण हा येथे अगदी उत्साहात पार पाडल्या जातो. बऱ्याचशा विद्यार्थांचाही येथे यादरम्यान मेळा लागतो. याशिवाय इतर भक्तही उपस्थित असतातचं.
सिहंपुरीच्या अगदी जवळ असलेल्या व बीजासन पीठासमोरील या मंदिरात परिक्षा कालावधीतही अफाट गर्दी पाहायला मिळते. अर्थातचं सरस्वती देवीचा आशिर्वाद निर्विवादपणे बुद्धिजीवींसाठी वरदानच ठरतो.
विद्यार्थी वर्ग यादरम्यानही चक्क पेनाच्या शाईने देवीचा अभिषेक मनोभावे पार पाडतात. येथील विद्यार्थ्यांचा हा समज आहे की, “नील सरस्वती” देवीच्या अशा प्रकारच्या पुजेने अभ्यासात मन एकाग्र होण्यात मदत मिळते. त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित होऊ शकतं.
सनातन धर्माच्या मान्यतानुसार १६ व्या आधारभूत संस्कारांमधून विद्यारंभ संस्काराला विशेष रूप प्राप्त झालेलं आहे जे की, वसंत पंचमीच्या वेळी पुजल्या जातं. संगीत क्षेत्रातही गुरू शिष्य परंपरेच्या महत्वाला याच मुहूर्तावर विशेष रूपात वठवल्या जातं.
उज्जैनच्या प्राचीन वाग्देवी मंदिरात वसंत पंचमीला वासंतीच्या फुलांबरोबरच नीलकमलाचं फूल देवीला अर्पित केल्या जातं. जुन्या काळातील शास्त्रांमधे याचा उल्लेख आढळतो. परंतु सध्याच्या काळात या फुलांच्या जागा आता शाईने घेतल्याच आढळतं. काही कथानकांमधे देवी सरस्वतीचा थेट उल्लेख “नीलवर्णी” देवी असाही पहायला मिळतो.
असं मानल्या जातं की, भगवान विष्णूंच्या आदेशाने देवी सरस्वती या जगतावरील ज्ञानाचं स्थान टिकवून आहे. मागेच उल्लेख केल्याप्रमाणे जुन्या काळात ज्या फुलांचा वापर करून देवीचा अभिषेक केला जायचा त्या फुलांच्या द्रवाचा अर्क सहसा निळ्याच रंगाचा असायचा जो की आजच्या काळात लेखणाच्या शाईचा असतो.
या गोष्टी सोडून महत्वाची बाब म्हणालं तर देवी सरस्वतीची ही मुर्ती अत्यंत दर्शनिय आहे. पाहणाऱ्या भक्तांचे डोळे दिपावेत अगदी तशी. पुरातत्व खात्याच्या माहितीनुसार ही मुर्ती तब्बल १००० वर्षे जुनी असण्याची शक्यता आहे. पण काही असो, एकदा तरी आयुष्यात उज्जैन येथील वाग्देवी मंदिरातील शाईने अभिषेक होणाऱ्या या सरस्वती देवीच्या दर्शनाची आस नक्कीच लागून राहते हे नक्की.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.