“सारे ग म प लिटिल चॅम्प” मधील या बाल गायिकेची आई सुद्धा आहे प्रसिद्ध गायिका, नाव ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

काय असतं टीव्हीवर आपण ज्यांना पाहतो. लाईक करतो त्यांच्या खऱ्या आयुष्यात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याची तुम्हा आम्हा प्रेक्षकांना फार उत्सुकता असते. मग ते मोठे सेलिब्रिटी असो किंवा बाल गायक, कलाकार. तर सध्या महाराष्ट्र हा सा रे गम पा ( sa re ga ma pa ) च्या सर्व बाल गायिका यांच्या गोड मंजुळ गळ्याच्या आवाजाने मंत्रमुग्ध होत आहे.

Saregamapa%2BLil%2BChamps%2B2021%2B %2BToday%252C%2B9 30PM%2B %2BSwara%2BJoshi%2B %2BPromo%2B %2BZee%2BMarathi%2B0 10%2Bscreenshot

तर त्यातील एक छोटीशी बाल गायिका सध्या खूप भुरळ घालताना दिसत आहे. गाण्याच्या माध्यमातून. पण आपल्याला माहीत आहे का हे तिने तिच्या आईकडून शिकलय सगळं. कारण तिची आई सुद्धा प्रसिद्ध गायिका आहे. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर.

कोणत्या वाहिनीवर शो चालू आहे तर ती म्हणजे झी मराठी. या वाहिनीने पूर्वी एकाहून एक मालिका सादर केल्या आहेत त्यातली सर्वात जास्त चाललेली १२ वर्षांपूर्वीची सिरीज म्हणजे सारेगमप लिटिल चॅम्प. १२ वर्षापूर्वीचे हेच उपांत्य फेरीत पोहचलेले स्पर्धक आता नव्या पर्वातील जज म्हणून काम पाहताना दिसयेत.

See also  तज्ञ ते नटसम्राट म्हणून अजरामर कसे झाले डॉ श्रीराम लागूंनी, जाणून घ्या त्यांचा थक्क करणारा प्रवास...

resize 1624865977761004083swarajoshi1

कारण त्यांच्याकडे आता जज करण्याची ताकत आलेली आहे. तेवढे सुज्ञ ते झालेले आहेत. बरं त्याच सोबत ते प्रसिद्ध पण खूप आहेत. त्यांना चॅनेल वर पाहून टीआरपी ही प्लस राहील.

त्याचसोबत अँकर म्हणून काम करतेय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे. हि ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतेय तेही खूपच उत्तम रित्या. मागच्या आठ्वड्यात गायलेले स्पर्धक खूपच गाजले सगळीच मुलं उत्तम परफॉर्मंस करताना पाहायला मिळतायेत मागच्या आठवड्यात गायलेलं गाणं हि पोरी साजूक तुपातली हे सगळ्यांनीच डोक्यावर घेतलं.

147780386 203867478195224 6708145991408313561 n

बालपणी एवढं छान गायलं तर मोठेपणी तर मग विषयच नाही. इतक्या लहान वयात हावभाव करून उत्तम रित्या गाणं गाणं खूपच अवघड असत पण या पर्वातील सगळीच मुलं आपलं गाणं उत्तम रित्या सादर करताना पाहायला मिळतायेत. ह्या लहानग्या गायिकेचा नाव आहे “स्वरा जोशी”.

स्वरा जोशी हि मुंबईची असून मुंबईतील दादर मधील साने गुरुजी इंग्लिश मेडीयम मध्ये ती शिकत आहे. ती आठ वर्षाची असून ३ऱ्या इयत्तेत शिकतेय. स्वरा जोशी हि एक उत्तम गायिका असून ह्यापूर्वीही तिने टीव्ही शो मध्ये गाणे गायले आहे. गाणं हे रियाज वर अवलंबून आहे. मनापासून गायलं आणि रोज त्याचा रियाज करत राहील की मग गायिका गायक म्हणून सशक्त होता येतं.

See also  अपुर्वा नेमळेकरला सोडावी लागली अर्ध्यावर मालिका, तुझ माझं जमतंय मध्ये अवतरणार ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री...

138657638 186795446569094 7671319024370788427 n

ह्या पूर्वी ती सोनी मराठी वरील जय जय महाराष्ट्र माझा ह्या कार्यक्रमात बालगायीका म्हणून पाहायला मिळाली होती. ह्या कार्यक्रमात देखील तिने सर्वांचे लक्ष वेधले होते. ह्या व्यतिरिक्त आपल्या आई सोबत तिने अनेकदा स्टेजवर गाण्याचा लाईव्ह शो देखील केला आहे. होय तिची आई देखील एक उत्तम गायिका आहे त्या देखील अनेक कार्यक्रमांत गाणी गाताना पाहायला मिळतात. त्यांच्या बद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. स्वरा जोशी हिच्या आईच नाव आहे केतकी भावे- जोशी. तर वडिलांचं नाव आहे अभिजीत जोशी तेही संगीत क्षेत्राशी निगडित आहेत.

कसं असतं घर ज्या वातावरण घेऊन जीवन जगत असतं तसेच संस्कार मुलांवर होत असतात. तर स्वरा च्या घरीच संगीत आहे. रोज मैफिल होतात त्यामुळे तिला या सगळ्याची सवयच होऊन गेलेली आहे.

See also  "या" मराठमोळ्या अभिनेत्याची मालिकेतून झाली हकालपट्टी? राजकीय भूमिका घेतल्याचा होत आहे त्याच्यावर आरोप

122552560 100369641878342 7182712040737850060 n

स्वरा जोशीच्या आई केतकी जोशी ह्या एक उत्तम गायिका असून सोनी मराठी वरील जय जय महाराष्ट्र माझा आणि सिंगिंग स्टार या कार्यक्रमात पाहायला मिळाल्या होत्या. त्याचसोबत अनेक मराठी अल्बम मध्ये देखील त्यांनी गाणी गायली आहेत. “मम्मी कि लोरिया” या अलबम मध्ये सोजा बेटा हे त्यांनी गायलेलं अंगाई गीत खूपच गाजलं.

आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत स्वरा देखील ह्या क्षेत्रात नक्कीच चांगली कामगिरी करून दाखवेल ह्यात शंका नाही. स्वरा जोशी आणि सारेगमप मधील सर्वच बालसिंगरला स्टार मराठी च्या स्टार टीम कडून खूप खूप शुभेच्छा..असेच नाव कमवत सगळे मोठे व्हा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment