तब्बल 20 तगडे कलाकार असूनही हिरोही अमिताभ आणि व्हिलनही अमिताभच, जाणून घ्या अनोख्या फिल्मचे रंजक किस्से…
सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शन राज सिप्पी, संगीतकार आर डी बर्मन, सोबत चित्रपट सृष्टीतील हेमा मालिनी, अमजद खान यांच्यासह २० तगडे कलाकार आणि विशेष म्हणजे या फिल्मचा हिरोही अमिताभ अन व्हि’ल’न सुद्धा अमिताभच…फिल्म सत्ते पे सत्ता चे काही अज्ञात, अनोखे व रंजक किस्से वाचकांसाठी खास की, जे वाचून तुम्हला ही क्लासिक कल्ट फिल्म पाहण्याचा नक्कीच मोह होईल.
22 जानेवारी 1982 रोजी सत्ते पे सत्ता प्रदर्शित झाला. हा चित्रपट बनला. फ्लॉ’प झाला. का झाला हा आज एक संशोधनाचा विषय ठरावा. तुम्ही सुद्धा हा चित्रपट पाहून नक्कीच विचारात पडाल की, असं का अन कसं झालं असेल? आज 38 वर्षांनंतरही तो म्युझिकलीसुद्धा सुपरहिटच आहे. या चित्रपटाशी संबंधित काही मजेशीर किस्सेही संग्रहित केले आहेत, नक्की वाचा अन मग तर तुम्ही फिल्म एन्जॉय करालच…
तसे या चित्रपटाचत अनेक सीन्स खूप मजेदार आहेत. पण सर्वात मजेदार सीन आहे, “दा’रु पीनेसे लिव्हर ख’रा’ब होता है” ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि अमजद खान दा’रू पीत आहेत. हा सीन खूप विशेष होता. कारण यात ‘शोले’चा ग’ब्ब’र आणि जय एकत्र पार्टी करत होते. यापूर्वीही या दोघांनी ‘परवरीश’, ‘मु’क’द्दा’र का सि’कं’द’र’, ‘कालिया’ आणि ‘लावारिस’ यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यांची के’मि’स्ट्री जबरदस्त होती.
साधारणत: काय असतं की, चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कलाकार त्यांचे संवाद बोलतात. शूटिंगनंतर त्यांचे संवाद स्टुडिओमध्ये स्वतंत्रपणे रेकॉर्ड केले जातात आणि चित्रपटाशी जोडले जातात. जेणेकरून आवाज स्पष्ट होईल. पण या सीनचे शूटिंग सुरू असतांना दिग्दर्शक राज सिप्पी यांना एक अफलातून आयडिया सुचली. अमजद खान आणि अमिताभ बच्चन यांनी शूटसाठी तयारी केली. कॅमेरा सुरू होताच, अमिताभ-अमजद जोडीने लिहून दिलेल्या संवादाच्या जोडीने वेगळेच काम सुरू केले. या संपूर्ण सी’नमध्ये, दोघांनी आपापल्या कॅ’रे’क्ट’रनुसार मनानेच भरपूर इं’प्रो’वा’य’झे’श’न केले. विशेष म्हणजे राज सिप्पी यांना हे दृश्य इतकं आवडलं की त्याने कॅमेराचा आवाज जरासा ठीकठाक करून ओरिजनल सीनच चित्रपटात जो’ड’ला. आत्ता जरी तुम्ही हा सीन पहिला तर त्यांच्या संवादांसह चालू कॅमेराचा घर-घर असा आवाजही ऐकू येईल.
अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक बंगले आहेत. त्यापैकी ‘प्रतीक्षा’, ‘जनक’, ‘वत्स’ आणि ‘ज’ल’सा खास आहेत. बच्चन कुटुंब ज’ल’सा’मध्ये राहते. त्यामुळे या इमारतीची खूप चर्चा आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रमेश सिप्पी यांनी अमिताभ बच्चन यांना ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटात काम करण्याच्या बदल्यात ‘ज’ल’सा’ बंगला दिला होता. इ’न्क’म टॅ’क्स’ची झं’झ’ट टा’ळ’ण्या’साठी यापूर्वी ही हाऊस र’जि’स्ट्री अमिताभ बच्चन यांची वहिनी रमोला (अजिताभ बच्चन यांची पत्नी) यांच्या नावे होती. सन 2006 मध्ये जलसाची जया बच्चन यांच्या नावे नोंद झाली.
आर डी बर्मन उर्फ पंचम दा ‘सत्ते पे सत्ता’ चे संगीत करत होते. बच्चनच्या ब्लॉ’क’ब’स्ट’र ‘शोले’ पासून ते 1981 च्या सनम तेरी कसम आणि रॉकी पर्यंत त्यांचे संगीत चांगलेच फेमस झाले. पंचम दा एक असा संगीतकार होता जो प्रत्येक गोष्टीत संगीत ऐकू शकतो. कधी ट्र’क’च्या लोखंडी पार्टस मध्ये तर कधी बिअरच्या बाटल्यांमध्ये. एकदा रणधीर कपूरने अर्ध्या भरलेल्या बि’अ’र’च्या बाटल्यांमध्ये तोंडाने हवा फुं’कू’न पंचमला आपल्या साथीदारांसह काही आवाज काढतांना पाहिले. त्याला वाटले की, पंचम चे डोके फिरले आहे. पण जेव्हा त्याने ‘शो’ले’ चित्रपटातील ‘मेहबूबा मेहबूबा’ गाणे ऐकले तेव्हा रणधीरला पंचमची बुद्धिमत्ता लक्षात आली.
या गाण्याच्या सुरूवातीला त्याच बी’य’र’च्या बाटल्यांचा आवाज पंचमने वापरला होता. असो!, आपण ‘सत्ते पे सत्ता’ बद्दल बोलत होतो. जेव्हा या चित्रपटाची गाणी रेकॉर्ड केली जात होती, तेव्हा ऍनेट पिंटो नावाच्या गायिकेचा घ’सा खूपच दु’ख’त होता. स्टुडिओच्या मागच्या बाजूला ती मिठाच्या पाण्याने गा’र्ग’लिं’ग व गुळण्या करत असताना पंचमच्या कानावर पडले. ऍनेट गा’र्ग’लिं’ग करत असतांनाचा तिच्या गळ्यातून येणारा विचित्र आवाज ऐकून पंचम ने तिला तो पुन्हा पुन्हा काढायला लावला कारण त्यातूनही पंचमला म्युझीक ट्यून काढायची होती. नंतर चित्रपटातील बच्चनच्या व्हि’ल’न बाबूच्या एन्ट्रीला बॅकग्राउंड स्कोरसाठी पंचम ने त्याच गा’र्ग’ल’सा’ऊं’ड ची अफलातून ट्यून बनविली. फिल्म मध्ये जेंव्हा जेव्हा बाबूची एन्ट्री होते तेंव्हा तेव्हा हा आवाज तुम्हाला बॅकग्राउंडला एका चेतावणीच्या स्वरूपात ऐकायला मिळेल.
अमिताभ बच्चननी या चित्रपटात डबल रोल केला होता. तो 6 भावांचा मोठा भाऊ रवी आणि चित्रपटाच्या व्हिलन बाबूच्या भूमिकेत दिसला होता. बाबू आणि रवि एकमेकांपेक्षा वेगळे दिसणे आणि वाटणे निर्मात्यांसाठी हे एक मोठेच आ’व्हा’न होते. मग रविला दाढी-मिशाचा लूक देण्यात आला. त्याचवेळी बाबूचे फक्त पात्र ग्रे शेडचे नव्हते. त्या पात्राचे डोळे आणि डोक्याचे केसही ग्रे शेडचे होते. बच्चननी आपल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, या चित्रपटासाठी बाबू वाला पो’र्श’न शूट करणे खूप अवघड होते. होते असे की, एक तर त्या ग्रे कॉन्टॅक्ट लेन्सेस काचेच्या होत्या. त्यांना डो’ळ्यां’त घा’ल’णे अत्यंत वे’द’ना’दा’य’क होते. या ग्रे लेन्स डोळ्यांत घालण्यापूर्वी ऍ’ने’स्थे’सि’याच्या मदतीने बच्चनचे डोळे ब’धि’र करायचे आणि नंतर कॉन्टॅक्ट लेन्सेसवाले सीन्स शूट केल्यावर परत डोळे ब’धि’र करून ते लेन्सेस काढायचे. हे अनेकदा करुन अमिताभचे डोळे सु’न्न होऊन सु’जू’न ला’ल व्हायचे.
जेव्हा राज सिप्पी यांनी हा चित्रपटाची योजना बनविली तेव्हा रेखा आणि अमिताभ यांची सुपरहिट जोडी त्यामध्ये कास्ट करायची होती. पण प्रत्यक्ष फिल्मचे काम सुरू होईपर्यंत या दोघांमधील काही गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या. अमिताभने रेखासोबत काम करणेच बंद केले होते. अमिताभच्या लीडिंग लेडीसाठी परवीन बाबी ही दुसरी निवड होती. जया बच्चन नंतर अमिताभ यांनी परवीन बाबीसोबत हिरो म्हणून सर्वाधिक 8 चित्रपट केले. परंतु 1981-82 पर्यंत परवीन यूजी कृष्णमूर्ती आणि अध्यात्मकडे ओढली गेली होती. 1983 मध्ये तिने भारत सोडला असला तरी यापूर्वीच दोन ते तीन वर्ष तिने फिल्मी दुनियेपासून अलिप्त व्हायला सुरुवात केली होती.
ही परिस्थिती पाहता हेमा मालिनी या चित्रपटासाठी शेवटची निवड होती. हेमा मालिनी सुद्धा स्वतःच्या अनेक फिल्म्समध्ये व्यस्त होती. मात्र अमिताभच्या सांगण्यावरून तिने हा चित्रपट करण्यास सहमती दर्शविली. तोपर्यंत धर्मेंद्र आणि हेमाचे लग्नही झाले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हेमा ग’र्भ’व’ती होती. चित्रपटाच्या ‘परियों का मेला है’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान प्रेग्नन्ट हेमाचे तिचे पोट खूपच दिसत होते. याच कारणास्तव, या गाण्याच्या अनेक दृश्यांमध्ये ती शॉलमध्ये लपेटलेली दर्शविला गेली आहे, जेणेकरून तिचे पोट दिसणार नाही. ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटाच्या शुटिंगच्या शेवटी आणि चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानच हेमा मालिनी आई झाली होती. तिने 2 नोव्हेंबर 1981 रोजी तिच्या पहिल्या मुलीला ईशा देओलला जन्म दिला होता.
सत्ते पे सत्ता चा रिमेक करण्याची योजना आखली जात आहे. रोहित शेट्टी यांनी 2019 मध्येच जाहीर केले होते की तो सत्ते पे सत्ता चा रिमेक करणार. त्यात अमिताभच्या भूमिकेसाठी हृतिक रोशन व हेमा मालिनीच्या भूमिकेसाठी अनुष्का शर्मा किंवा दीपिका पादुकोण अशी नावेही चर्चेत आहेत. पण एक महत्वाची समस्या उद्भवलीय ती म्हणजे रोहित शेट्टीला राज सिप्पीकडून चित्रपटाच्या रिमेकचे अधिकार खरेदी करता आलेले नाहीत. यानंतर रोहितने 1954 सालची हॉलिवूड फिल्म सेव्हन ब्राइड्स फॉर सेव्हन ब्रदर्स चे हक्क विकत घेतले की ज्या मूळ फिल्मवरून सत्ते पे सत्ता बनविला होता. पण आता स’म’स्या ही आहे की, हृतिकला हॉलिवूड चित्रपटाच्या रिमेकमध्ये फारसा रस नाहीय…
इतक्या वर्षांनंतरही सत्ते पे सत्ताचे “फ्लॉ’प” या उपाधीमुळे कोणतेही महत्त्वपूर्ण नु’क’सा’न होऊ शकलेले नाही. उलट तो चित्रपट जेव्हा जेव्हा टीव्हीवर येतो तेव्हा मोठ्या टी आर पी ने पाहिला जातो. लोक त्यातील सीन्स आठवतात आणि मनमुराद आनंद लु’ट’ता’त. असो!