“आधी तुझं नाक सरळ करून ये” असे म्हणत निर्मात्यांनी केला होता या अभिनेत्याचा अपमान, आज आहे प्रसिद्ध अभिनेता…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवूड मायानगरीत स्वतःचे करियर बनवण्यासाठी आणि नेम फेम करण्यासाठी लूक हा खुप महत्त्वाचा असतो.आपली चेहारपट्टी, नाकनक्शा चांगले असणे, हे खुप महत्वाचे असते. बॉलीवूड मधील अनेक अभिनेते, अभिनेत्री यांनी आपल्या चेहऱ्याची, शरीराच्या विविध अवयवांची सर्जरी करून घेतलेली आहे, असे आपण कित्येकदा पाहतो. आपल्या इंडस्ट्रीतील अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा या टॉप च्या अभिनेत्रींना अनेकांनी सर्जरी करण्याचा देखील सल्ला दिला होता. बदलत्या काळानुसार समीकरणे सुद्धा बदलत चालली आहेत. मात्र तरीही आज देखील अनेक कलाकारांना सर्जरी करण्याचा सल्ला हमखास दिला जातो.

याचे जीवंत उदाहरण म्हणजे अभिनेता ‘सौरभ गोयल’ हे आहे. सौरभ गोयल याने नुकतेच “छोरी” या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, सौरभ गोयल याने ह्या चित्रपटात काम करण्यापूर्वी आपल्या नाकाची सर्जरी केली आहे. चार वर्षांपूर्वी नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला त्याला निर्मात्यांनी दिला होता. आपल्या एका मुलाखतीमध्ये त्याने हा किस्सा शेयर केला आहे.

See also  प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई? भर कार्यक्रमात केला खुलासा...

अभिनेता सौरभ गोयल हा चार वर्षांपूर्वी एका ऑडिशनसाठी निर्मात्यांकडे गेला होता. तो निर्माता सौरभकडे पाहून म्हणाला की, “तू काय विचार करून माझ्याकडे आलास?” अशा प्रकारचा प्रश्न त्या निर्मात्याने सौरभ गोयलला विचारला. पुढे तो निर्माता म्हणाला की, “फिल्मइंडस्ट्री मध्ये काम करायचे असेल तर परफेक्ट बॉडी खूप महत्त्वाची असते. लीड रोलसाठी पीळदार बॉडी पाहिजे, तसे तर तुझ्याकडे काहीच नाही. माझ्यासोबत तुला जर काम करायचे असेल, तर सर्वात आधी नोज जॉब करून ये,” असा त्या निर्मात्याने सौरभला सल्ला दिला. निर्मात्याचे हे शब्द ऐकताच त्याला थोडे वाईट देखील वाटले होते. हे सौरभ ने स्वतः सांगितले होते. परंतु त्या वेळी माझ्याकडे नाकाची सर्जरी करण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते.

See also  'राम तेरी गंगा मैली' चित्रपटातील मंदाकिनी बॉलीवूड सोडून जगत आहे असे जीवन, अभिनेत्रीला ओळखणे ही झाले कठीण!

सौरभ म्हणाला की, घरचे तर सरळ म्हणाले होते की, अभिनयाचा कायमचा नाद सोडून दे. त्यांची इच्छा होती की, नोकरीधंदा कर, लग्न कर आणि लवकरात लवकर सेटल हो…या इंडस्ट्री मध्ये तुझे काही एक भविष्य नाही, असे घरचे नेहमीच म्हणायचे. याच कारणामुळे मी माझ्या बाबांसोबत बोलणे सुद्धा सोडून दिले होते. मला सर्वजण म्हणायचे की, या चकमकीत इंडस्ट्रीमध्ये तुझा कुणीही गॉडफादर नाही ना तुझा लूक.

तसेच मला बर्याच जणांनी नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. परंतु मी त्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही. कारण मला मुळी विश्वासच नव्हता की, नाकाची सर्जरी करून मी हिरो होऊ शकतो. परंतू मला स्वतःवर पूर्ण विश्वास होता. म्हणून मी सतत प्रयत्न करत राहिलो, मेहनत घेत राहिलो. अगदी दरदिवस ऑडिशन देत राहिलो. पण बरेच दिवस मला फक्त नकारच मिळायचे. मात्र मी या सर्व गोष्टी आत्मसात करायला शिकलो. त्या सर्व गोष्टींमधून मी बरेच काही शिकलो आणि आज तुमच्या समोर “छोरी” या चित्रपटाचा अभिनेता म्हणून समोर येत आहे.

See also  अनिल कपूर म्हणाला, "कंगनासाठी मी आपल्या पत्नीला सोडून द्यायला तयार आहे", कारण...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment