या प्रसिद्ध मराठी गायिका सावनी रविंद्रच्या लेकीचं झालं बारसं! ठेवलं हे नाव…
एक मराठी प्रसिद्ध गायिका आहे. जिच्या गाण्याने रसिक मंत्र मुग्ध होऊन जातात. तिचा आवाज म्हणजे कायमस्वरूपी ऐकतचं राहावंसं वाटतं. त्या गायिकेचं नाव आहे सावनी रवींद्र ( savnee ravindra ) जी नुकतीच आई झालेली आहे. तिच्या आई झाल्यानंतर सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.
कारण तिच्या स्वतःचा एक चांगलाच चाहता वर्ग आहे. तर आता तिच्या बाळाचं बारसं करण्यात आलेलं आहे. म्हणजेच नाव ठेवण्यात आलं आहे. तर आता तिच्या चाहत्यांना ही उत्सुकता खूप लागून असेल की नेमकं तिच्या बाळाचे नाव काय ठेवलेले आहे. तर चला मग आपण सविस्तर जाणून घेऊयात.
कन्या रत्न झाल्यानंतर सावनी आणि तिच्या चाहत्यांना फार आनंद झाला होता. कारण तिलाही मुलगीच हवी होती. ती स्वतः सुद्धा सोशल मीडियावर खूप कार्यरत असते. तिचे अनेक फोटो ती शेयर करत असते. मुलीचे आणि तिचे फोटो ही तिने शेयर केलेले आहेत. त्याच सोबत जेव्हा ती गर्भवती होती तेव्हा दिवस भरत आल्यावर होणारे बदल ही तिने फोटो व्हिडीओ स्वरूपात शेयर केलेले आहेत.
आता सर्वांत आधी अनेकांना हा प्रश्न पडलेला असेल की सावनी रवींद्र यांच्या पतीचे नाव काय आहे ? तर लोकप्रिय गायिका सावनी रविंद्र यांचे पती आहेत डॉ. आशिष धांडे. नुकतीच या दोघांच्या आयुष्यात नुकतेच लेकीचे आगमन झाले आहे.
आता या बाळाचा बारसा पार पडला आहे. तिने या बारशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आणि अल्पावधीतच फोटो खूप व्हायरल झालेले आहेत. कारण सावनी रवींद्र या खूप प्रसिद्ध आहेत.
तिने बाळाचं म्हणजेच कन्येचे नाव पोस्ट मध्ये लिहून चाहत्यांना व रसिक प्रेक्षकांना बारश्याची माहिती लिहिलेली आहे. सोशल मीडियावर सावनी रवींद्र या लोकप्रिय गायिकेने फोटो शेअर करत लिहिले की, आजपासून आमच्या बाळाचं नाव ,”शार्वी” (पार्वती देवी आणि दुर्गा देवीचे हे नाव आहे.
तसंच या नावाचा अजून एक अर्थ म्हणजे दिव्य – दैवी ) आमच्या बाळाच्या पाठिशी तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा सदैव राहू देत. तिला बाळ पोटात असताना अनेक आनंदाने भरलेल्या गोष्टी मिळालेल्या आहेत. ज्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार सोबत इतर ही आहेतच.
एवढी मोठी गायिका म्हंटल्यावर कामे तर भरपूर चाललेली असतील. सावनी रवींद्र च्या कामाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या सहा महिन्यात मी गरोदरपणात अनेक वेगवेगळे म्युझिक अल्बम, नविन गाणी, काही प्रोजेक्टस शूट केले आहेत. त्यातील बरीचशी गाणी रिलीज झाली आहेत. तर काही गाणी लवकरच रिलीज होणार आहेत. आणि ही सगळी गाणी खूप युनिक आणि मनात घर करून राहणारे आहेत. लोकप्रिय होण्याची धमक असणारे गाणी आहेत.
तर सध्या सावनी च्या आयुष्यात आणि घरात खूप आनंद आहे. लक्ष्मी चे आगमन झालेले आहे. तर तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा !…
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.