बेबी डॉल सन्नी लिओनी ची संपत्ती जाणून आश्चर्य चकित व्हाल !
तुम्ही सर्वांनी सनी लियोनी हे नाव नक्कीच ऐकलं असेल. सनी लियोनी या नावाने इंटरनेट वरती प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे. ती एके काळी इंटरनेटवर मोस्ट सर्च सेलिब्रिटी होती. सर्वात प्रसिद्ध पॉर्नस्टार अशी देखील तिची ओळख आहे. तिने बॉलीवूडमध्ये देखील काम केलेलं आहे. पण आज आपण सनी लियोनीच्या या कर्तृत्वाबद्दल चर्चा करणार नसून आपण आज तिच्या श्रीमंतीची माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात…..
बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सनी लियोनी या अभिनेत्रीने अनेक चित्रपट केले या चित्रपटांना देखील प्रेक्षकांनी प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. यातील जिस्म २ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं आहे. आज देखील तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये देखील सनी ने काम केलेलं आहे. याच रियालिटी नाही तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली.
तिच्या बालपणापासून ते बॉलीवूड पर्यंतचा प्रवास एका वेब सिरीज च्या माध्यमातून लोकांपुढे आधीच आलेला आहे. “करणजीत कौर : अन टोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी” असं या वेबसिरिज नाव आहे. या अभिनेत्रीचं संपूर्ण आयुष्य वेबसिरीजच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. प्रेक्षकांनी देखील प्रचंड प्रतिसाद देत हि वेब सिरीज यशस्वी केलेली आहे. अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या संपत्तीबाबत फार लोकांना माहिती नाही.
तरुणांच्या मनावरती राज्य करणारी सनी लियोनी कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या आकडेवारीनुसार तिच्याकडे 97 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिचे वार्षिक उत्पन्न दोन कोटींच्या जवळपास आहे. याशिवाय तिच्याकडे अनेक महागड्या गाड्या देखील आहेत. मुंबईतील तिच्या बंगल्याची किंमत जवळपास तीन कोटी आहे. याशिवाय अमेरिकेतदेखील तिचा बंगला आहे या बंगल्याची किंमत जवळपास तीस कोटी रुपये एवढी आहे.