या बॉलीवूड अभिनेत्रीच्या नवऱ्यानं तिला दिलंय झक्कास सरप्राईज, पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!
होय मित्रानो!, असा हौशी नवरा मिळवला आहे या अभिनेत्रीने. बुर्ज खलिफाच्या १२२ व्या मजल्यावर असलेल्या रेस्तराँ मधील या कॉफीमध्ये खऱ्या खुऱ्या सोन्याचा वापर केला जातो, असा दावा अभिनेत्री सना खानने केला आहे. किंमत पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क…
बिग बॉस 6 ची स्पर्धक आणि जय हो, वजह तुम हो, टॉयलेट-एक प्रेमकथा अशा सिनेमात झळकलेली अभिनेत्री सना खानने फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला होता. ही सना सध्या काय करतेय, तर चक्क सोन्याची कॉफी पितेय. होय!, सनाने जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफामधील फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओमध्ये ती चक्क सोन्याची कॉफी पिताना दिसत आहे. या कॉफीची किंमत पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
बुर्ज खलीफामध्ये कॉफी डेट, हे पतीकडून मिळालेलं सरप्राईज होतं. या इमारतीच्या १२२ व्या मजल्यावर एक प्रसिद्ध रेस्तरॉ आहे. हे रेस्तरॉ आपल्या खास प्रकारच्या कॉफींसाठी जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी सनाने गोल्ड प्लेटेड कॅपेचीनोचा आस्वाद घेतला. या कॉफीची किंमत १६० दिरहम इतकी आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास ३२०० रुपये. या कॉफीमध्ये ख-या खु-या सोन्याचा वापर केला जातो, असा दावा सनाने केला आहे.
सनाने सूरतचा बिझनेसमॅन मौलाना अनस सईदसोबत गूपचूप ‘निकाह’ केला. सनाने असे एका रात्रीत ‘निकाह’ केल्याने सगळेच हैराण झाले होते. पण आता हा एका रात्रीचा मामला नाहीच मुळी. कारण सना २०१७ पासून अनस सईदला ओळखत होती.
सनाने एका ताज्या मुलाखतीत याबद्दल सांगितले आहे. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सनाने तिच्या व सईद अनसच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले. सना व सईदची पहिली भेट २०१७ मध्ये झाली. तिने सांगितले, आम्ही पहिल्यांदा मक्केत भेटलो होतो. मी भारतात परतली होती. ही एक छोटीशी भेट होती.
अनस हा एक मुस्लिम स्कॉलर आहे, असे सांगून माझी व त्याची ओळख करून देण्यात आली होती. तो मुफ्ती नाही तर आलिम आहे. २०१८ च्या शेवटीशेवटी मी स्वत: अनिसशी संपर्क साधला होता. कारण मला धर्माबद्दलचे अनेक प्रश्नांची उत्तरे हवी होती, असे तिने सांगितले. यानंतर २०२० मध्ये आम्ही पुन्हा संपर्कात आलोत. अनससोबत निकाह करण्याचा निर्णय मी एका रात्रीत घेतला नाही. त्याच्यासारखा शौहर मिळावा म्हणून मी अनेक प्रार्थना केल्या होत्या.
तो सज्जन आहे, सुसंस्कृत आहे, ही एक गोष्ट मला आवडली. तो मला जज करत नाही, ही गोष्टही मला भावली, असेही तिने सांगितले. पुढे तिने सांगितले, एकदा तो मला म्हणाला होता, एखादी वस्तू गटारात पडली असेल आणि तुम्ही तिच्यावर १० बकेट पाणी ओतले तरी ती वस्तू साफ होणार नाही. पण ती वस्तू गटारातून काढून त्यावर एक बकेट पाणी ओतले तरी ती स्वच्छ होईल. त्याची ही गोष्ट मला खूप आवडली होती. माझ्यावर त्याचा खोलवर परिणाम झाला.
ग्लॅमर इंडस्ट्री सोडण्याबद्दल ती म्हणाली, अनेक गोष्टी तुम्हाला उशीरा कळतात. मी माझ्या घरात एकटी कमावणारी होते. म्हणून मी इंडस्ट्रीत आले आणि इंडस्ट्रीने मला जे काही दिले, त्याबद्दल मी ऋणी आहे. पण कालांतराने मी या दुनियेसाठी बनलेलीच नाही, याचा साक्षात्कार मला झाला.
लग्नानंतर सना प्रचंड ट्रो’ल झाली, यावरही ती बोलली. लोकांना माझ्या लग्नाशी काहीही देणेघेणे नाही. माझे शौहर चांगले व्यक्ति आहेत. लोकांना ते आवडत नसतील पण मला आवडतात. लोक काय म्हणतात, याची मला पर्वा नाही, असे ती म्हणाली. मला लवकर आई व्हायचे आहे, असेही तिने सांगितले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.