ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, 93 व्या वर्षी घेतला त्यांनी अखेरचा श्वास
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, 93 व्या वर्षी घेतला त्यांनी अखेरचा श्वास
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते आता 93 वर्षांचे होते. हल्लीच 30 जानेवारी रोजी त्यांनी आपल्या वयाची 93 वर्षे पूर्ण केली होती. रमेश देव यांच्या निधनाविषयी त्यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव याने ही वार्ता सांगितली. मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात रमेश यांनी आपला अखेरचा श्वास घेतला.
आपलं संपूर्ण आयुष्य जणू त्यांनी चित्रपट सृष्टीला समर्पित केलं होतं. मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीत देखील रमेश देव यांनी आपल्या अभिनयाची चुणूक चांगलीच दाखवली होती. 2013 मध्ये 11 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रमेश देव यांना लाईफटाईम अचिव्हमेंट या अवॉर्डने गौरवण्यात आले होते.
दिग्गज अभिनेते रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1929 रोजी कोल्हापूर मध्ये झाला होता. “आंधळा मागतो एक ङोळा” या चित्रपटातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांनी दिग्दर्शनासहित कित्येक मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही त्यांनी अतिशय उत्कृष्ट अभिनय साकारला.
1962 मध्ये रमेश देव यांचा नलिनी सराफ यांच्यासोबत विवाह संपन्न झाला. या दोघांनीही अनेक चित्रपटांत एकत्रितपणे काम केले आहे. पाटलांच पोर, सुवासिनी, झेप, सर्जा, आनंद, या सुखांनो या, कसौटी, फटाकङी, तीन बहुराणीयाँ, जय शिवशंकर हे त्यांचे सुप्रसिद्ध ठरलेले चित्रपट आहेत. स्टार मराठी टीम तर्फे अभिनेते रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.