मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘या’ सल्लागारावर आयकर विभागाची नजर, होऊ शकते कारवाई; समोर आले धक्कादायक कारण

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त अजोय मेहता यांच्यावर आयकर विभागाची मोठी कारवाई होऊ शकते. हाती आलेल्या महितीनुसार, आयकर विभागाने नरीमन पॉइंट स्थित एका फ्लॅटच्या डील साठी मेहता यांच्यावर लक्ष ठेवले आहे. त्यांना फेब्रुवारीमध्येच्च महारेराचा अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यांनी अनामित्रा प्रॉपर्टीज प्रायवेट लिमिटेड या कंपनीकडून फ्लॅट विकत घेतला होता. नंतर तपासात ही एक शेल कंपनी असल्याचे समोर आले.

इंडिया टूडेच्या वृत्तानुसार, ज्या कंपनीकडून ही मालमत्ता खरेदी केली गेली तिचे दोन भागधारक होते. हे दोघेही मुंबईतील चाळीत राहतात. अहवालात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कंपनी केवळ या फ्लॅटच्या डीलसाठीच तयार करण्यात आली. कंपनीच्या बॅलेन्स शीटमध्ये बरीच अनियमितता आढळली तसेच या दोन्ही भागधारकांनी रिटर्न्स भरलेले नाहीत.

See also  सैफ - करिनाच्या तैमुरला फक्त सांभाळण्यासाठी ठेवलेली नानी घेते इतका पगार !

मेहता यांनी 1076 चौरस फूटाचा फ्लॅट 5.33 कोटी रुपयांना खरेदी केला होता. यापूर्वी ही प्रॉपर्टी अनामित्रा प्रॉपर्टीज प्रायवेट लिमिटेड या कंपनीने 2009 मध्ये 4 कोटींमध्ये खरेदी केली होती. कंपनीचे भागधारक कामेश नथुनी सिंग याच्यात 99 टक्के भागीदारी आहे. त्यांनी अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला नाही. त्याच बरोबर, दुसरे भागधारक दिपेशसिंग रावत यांनी 2020-21 मध्ये एकदाच रिटर्न भरला होता. यात त्यांनी आपले उत्पन्न 1 लाख 71 हजार 2 रुपये जाहीर केले होते.

या सर्व नोंदी दर्शवितात की या दोन्ही भागधारकांची आय फार कमी आहे आणि ते कोट्यावधींची संपत्ती खरेदी करू शकत नाहीत. यावर अजोय मेहता यांनी म्हटले आहे की, “’मला त्या मालमत्तेच्या मालकाला जाणून घेण्याची कोणतेही कारण नाही. हा एक कायदेशीर करार होता, ज्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया पाळली गेली होती आणि मी बाजारभावाप्रमाणे पैसे दिले आहेत. मी करदाता आहे आणि या सर्व गोष्टी कुठून बाहेर येत आहेत याची मला काही कल्पना नाही.”

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment