सिरियल किसर नावाने उगाच बदनाम आहे इमरान हाश्मी, हा महान अभिनेता आहे खरा सिरियल किसर!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

हिंदी सिनेमा अर्थात आपलं लाडकं बाॅलीवुड जे गेल्या वर्षभरात या ना त्या कारणास्तव सतत चर्चेत राहिलं, अशा या बाॅलीवुड सिनेमात अनेक गोष्टी प्रखर्शाने पहायला मिळतात. त्यातच एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, “किसींग सिन्स”. रोमॅन्टिक, अॅक्शनपट, कधीकधी तर एखाद्या बाॅयोपिक सिनेमातही निर्मात्यांना किसींग सिन घुसवायचाच असतो की काय असे प्रश्नचिन्ह निर्माण होते.

पण काही असो किस किंवा सिनेमातील किसेसचा उल्लेख आला की एक नाव पहिले डोळ्यांसमोर उभं राहतं ते म्हणजे इमरान हाश्मी. अर्थात इमरान हाश्मी या अभिनेत्याची आॅन स्क्रीन इमेजच अशी तयार झाली आहे की, तो सिनेमात आहे आणि त्यामधे किसींग सिन नाही असं होऊच शकत नाही. आणि आपणही सतत त्याचाच उल्लेख सिरियल किसर म्हणून करतो.

परंतु एका बाबीचा खुलासा केल्यानंतर तुमचा दृष्टिकोन थोडा बदलला जाणार आहे, हे निश्चित. कारण सिनेमांमधील सिरियल किसर हा चक्क इमरान हाश्मी नसून प्रत्येकाचा लाडका मिस्टर परफेक्शनिस्ट “आमिर खान” आहे. “आमिर खान” आणि तो सिरायल किसर हे समीकरण ऐकायला प्रथमत: थोडसं विचित्र वाटेल पण हेच सत्य आहे. आता या खुलास्याचं स्पष्टीकरण थोडसं समजावून घेऊयात.

See also  "तारक मेहता..." शो मधील डॉ. हाथी यांना खरेखुरे डॉक्टर समजून केला एका व्यक्तीने फोन, त्यानंतर जे घडले ते...

आमिर खान अर्थात सर्वांच्या ओळखीचा मिस्टर परफेक्शनिस्ट. त्याने त्याच्या गेल्या ३० वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल १४ अभिनेत्रींना किस केलं आहे. डेब्यू सिनेमापासून ते धुम ३ पर्यंत आमिरने तब्बल १४ अभिनेत्रींसोबत किसींग सिन्स केले. होली या सिनेमातून डेब्यू केलेली अभिनेत्री किट्टू गिडवाणीसोबतही आमिरने किसिंग सिन केला होता. २००९ साली आलेली आणि अगदी कमी काळात प्रत्येकाच्या मनावर राज्य केलेली मूव्ही “३ इडियट्स” यातही करीना कपूरसोबत आमिरने किसिंग सिन दिला होता.

images

होलीमधून किट्टू गिडवाणीसोबत लिपलाॅक केल्यानंतर आमिरने कयामत से कयामत या सिनेमात जुली चावलासोबत किसिंग सिन केला. हा चित्रपट त्या काळातला ब्लाॅकबस्टर हिट ठरला होता. यानंतर सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. आमिरने चक्क माधुरीसोबतही किसिंग सिन केला आहे. आमिर व माधुरी यांचा दिल हा चित्रपट प्रचंड प्रसिद्ध झाला, याच सिनेमात दोघांचा किसिंग सिन आहे.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री लग्नाअगोदरच होत्या गरोदर, अभिनेत्री श्रीदेवी तर...

माधुरी दीक्षितचा एकून केलेल्या सिनेमांधील हा केवळ दुसरा किसिंग सिन ठरला होता. त्या आधी माधुरीचा एक किसिंग सिन झाला होता. आमिरने एकप्रकारे त्या काळात तरूणाई आपल्या सिनेमातून धरून ठेवली होती. याचच आणखी एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे, जो जीता वही सिकंदर हा सिनेमा. या सिनेमातून “पूजा बेदी” या त्या काळातल्या हाॅट माॅडेलसोबत आमिरने किसिंग सिन दिला ती या सिनेमात आमिरची को-स्टार अभिनेत्री होती.

त्यानंतर महत्त्वाचं नाव येत ते म्हणजे, “मनिषा कोईराला” यांच. मनिषा कोईरालाने आपली एक वेगळी छाप सिनेसृष्टीवर सोडली आहे. “अकेले हम अकेले तुम” या जबरदस्त प्रेमकहाणीच्या सिनेमात लिपलाॅक केला आहे. त्या काळातली बोल्ड अभिनेत्री ममता कुलकर्णी, राजा हिंदूस्तानी सिनेमात करिश्मा कपूरसोबत सर्वाधिक जास्त वेळाच चुंबन (किस), इश्क सिनेमात जुही चावलासोबत पुन्हा किसींग सिन, गुलाममधे रानी मुखर्जी, सरफरोशमधे सोनाली बेंद्रे, मेलामधे ट्विंकल खन्ना, रंग दे बसंतीमधे एलिन पैटन, धुम 3 मधे कॅटरिना कैफ अशा तब्बल सर्व गाजलेल्या व प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत आमिरने किसिंग सिन दिलेले आहेत.

See also  या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला वयाच्या ४७ व्या वर्षी बनायचे आहे आई, कारण...

images 2

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment