छत्रपती शिवरायांवर आधारित बॉलीवूड चित्रपटात शिवरायांची भूमिका साकारणार हा बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेता…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

छत्रपती शिवाजी महाराज की जय. असे शब्द आपोआप च कानावर उमटले की अंगावर शहारा येतो. काटा येतो. कारण आपल्या राज्यात या नावात खरा दम आहे. आपल्या राजेंमुळे आज आपण सन्मानाने जगतोय. आता कलाकार लोकांना ही राजेंच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी वर सिनेमा करायचा आहे. पण आता टीम कोण ? आणि कोण कसं म्यानेज करता. तुम्ही कळवा फक्त.

s1jb0mag tanhaji

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्ड सुरू आहे. अनेक नावाजलेल्या व्यक्तिंच्या आयुष्यावर सिनेमे बनवण्यात आले आहेत. त्यातील काही सिनेमांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, अनेक सिनेमे प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत बायोपिकमध्ये कंगना राणौत मुख्य भूमिका साकारत आहे. तर लवकरच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावरही बायोपिक बनवण्यात येणार आहे.

See also  'तारक मेहता...' मधील नव्या अंजली भाभींचे फोटो होता आहेत खूपच वायरल, पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल!

आता या यादीत आणखी एका थोर व्यक्तित्वाच्या नावाचा समावेश झाला आहे. बॉलिवूडमध्ये भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर चित्रपट बनवण्यात येत आहेत. ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटानंतर क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

1614418558 untitled 2021 02 27t150531.050

छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावर चित्रपट बनविण्याचा मानस बॉलिवूडमधील अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांच्या मनात आहे.यात रितेश देशमुख, अली अब्बास जफर, रोहित शेट्टी यांसारखे निर्माते महाराजांवर चित्रपट बनवण्याचा विचार करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘कबीर सिंग’ सिनेमाचे निर्माते अश्विन वर्दे यांनीही मराठयांच्या या वीर योध्याच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा विचार सुरु केला आहे.

इतकंच नाही तर, त्यांनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची निवड केली आहे. त्यांनी या भूमिकेसाठी शाहिदला विचारणा देखील केली आहे. शाहिदला या चित्रपटाची संकल्पना प्रचंड आवडली असून त्याने या भूमिकेसाठी निर्मात्यांना लगेच होकारही कळवला आहे.

See also  हे आहेत बॉलिवूड मधील सर्वात मोठे वा'द'वि'वा'द ज्यामुळे सोशल मीडियासह देशभरात उ'डा'ली होती ख'ळबळ...

1614418852 fc vasu padmavati inline 5

सध्या, चित्रपटाशी संबंधित काही व्यवहार पूर्ण केले जात आहेत. ‘पद्मावत’ या चित्रपटानंतर शाहिदच्या हा दुसरा ऐतिहासिक चित्रपट असणार आहे. यापूर्वी अभिनेता शरद केळकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ मध्ये शरदने साकारलेल्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं.

आता शाहिदच्या या आगामी सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येतेय. या चित्रपटाची निर्मिती लायका प्रोडक्शनद्वारे करण्यात येणार आहे. यापूर्वी अभिनेता रितेश देशमुखने राजे शिवछत्रपती यांवर बायोपिक बनवण्याची घोषणा केली होती. हा चित्रपट तीन भागात प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं त्याने सांगितलं होतं. ते यावर सिनेमा बनवणाऱ्या कलाकारांना पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment