शाहरुख खानने ऐश्वर्या रायला बऱ्याच चित्रपटांमधून जबरदस्तीने बाहेर काढले होते, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

ऐश्वर्या राय आपला वाढदिवस 1 नोव्हेंबरला साजरी करते. यानिमित्ताने तिचे चाहते सोशल मीडियावर तिला शुभे शुभेच्छा देत आहेत. तिच्या बॉलिवूड कारकिर्दीत ऐश्वर्याने ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ आणि ‘जोधा अकबर’ यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दरम्यान, बर्‍याचदा असे घडले आहे की तिला काही न सांगता चित्रपटांमधून बाहेर काडले गेले. ऐश्वर्याने स्वतः एका मुलाखतीच्या वेळी हे उघड केले आहे.

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात शाहरुख खानने तिला बऱ्याचदा चित्रपटांतून बाहेर काढले होते. शाहरुखनेही याची कबुली दिली होती. अभिनेत्री सिमी गैरेवाल सोबत दिलेल्या या मुलाखती मध्ये ऐश्वर्याने हा मुद्दा मांडला होता. अभिनेत्री ऐश्वर्याने सांगितले कि कोणतेही कारण न सांगता आपल्याला बऱ्याच चित्रपटांतून बाहेर काढले होते.

‘वीर झारा’ या चित्रपटामध्ये ऐश्वर्याला घेणार हे नक्की झाले होते पण ऐनवेळी तिच्या जागी कोणत्यातरी दुसऱ्या अभिनेत्रीला चित्रपटामध्ये घेतले. ऐश्वर्या म्हणाली ‘मी या प्रश्नाचे उत्तर कसे देऊ? होय, त्यावेळी दोन चित्रपटांबद्दल चर्चा होती की आपण एकत्र काम करू. आणि मग अचानक काही स्पष्टीकरण न देता मला त्या चित्रपटामधून काढून टाकण्यात आले. हे का घडले याविषयी माझ्याकडे कधीच उत्तर नाही.’

स्वत: शाहरुखने एका मुलाखतीत दु: ख व्यक्त केले आणि म्हणाला की ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात अधिक व्यस्त झाली होती, जे तिने व्हायला नको होते. ऐश्वर्या पुढे म्हणते की, ‘मी कोणत्याही चित्रपटासाठी कधीही नकार दिला नव्हता’. अनेक मोठ्या चित्रपटांमधून वगळल्यानंतर ऐश्वर्या खूप दु: खी झाली होती.

ऐश्वर्या पुढे म्हणाली की, ‘पाहा, जेव्हा तुम्हाला कोणीही काही स्पष्टीकरण दिले जात नाही तेव्हा तुम्ही दु: खी आणि आश्चर्यचकित होता आणि काय करावे हे समजत नाही.’ ऐश्वर्या सांगते की, ‘मी शाहरुखला याबद्दल कधी विचारले नव्हते कारण ते माझ्या स्वभावात नाही.

एखाद्या व्यक्तीस हे समजावून सांगण्याची गरज वाटत असेल तर ते करतील पण मी नाही. असा प्रश्न उपस्थित करणे माझ्या स्वभावात नाही. मी कोणत्याही व्यक्तीकडे जाऊन असे का घडले हे कधीही विचारणार नाही.’

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment