अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या बहिणीला वाढदिवसानिमित्त दिली हि खास भेट वस्तू, पाहून थक्क व्हाल!

बाॅलीवुडमधील एका काळात आपल्या अभिनयाने चांगलाच पर्व गाजवलेली अभिनेत्री म्हणजे शमिता शेट्टी. शक्यतो शमिता म्हटलं की प्रदमदर्शनी शिल्पा शेट्टीची बहिण हीच प्रतिमा आपल्यासमोर येते. परंतु मुळात हिंदी सिनेसृष्टीतल्या अनेक चांगल्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

जेहर, फरेब, मोहब्बतें, बेवफा, वजह यांसारख्या अनेक इतर हिंदी सिनेमांमधे तिने काम केल आहे. याशिवाय तिने चार पाच दाक्षिणात्य सिनेमे देखील केले आहेत. तिला तिच्या चेहऱ्यावरील चार्मिंग लुकपेक्षाही जास्त प्रसिद्धी मिळाली ती एक अभिनेत्री आणि कलाकार म्हणून.
Shamita Shetty graces the red carpet of Lakme Fashion Week 2018 %2808%29
शमिता शेट्टी हिचा आजच वाढदिवस साजरा होत आहे. सोशल मीडियावर तिला तिच्या कुटुंबासोबतच इतर मित्रमैत्रिणींकडून फार चांगल्या, हटके भन्नाट शुभेच्छा दिल्याच आपल्याला पहायला मिळत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या बहिणिला वेगळ्या अंदाजात व्हिडिओमधून शुभेच्छा दिल्या आहेत, ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियात ट्रेंड होत आहे.

READ  या भारतीय क्रिकेटरसोबतचा चहलची पत्नी धनश्रीचा डान्स व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल, पाहून थक्क व्हाल!

स्वत: शमितानेदेखील आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर करत इतरांचे शुभेच्छांच्या वर्षावाकरता आभार मानले आहेत. आता तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, शिल्पा शेट्टीने आपल्या बहिणिला दिलेल्या शुभेच्यांच्या शेअर केलेल्या व्हिडिओची.

शिल्पाने शेअर केलेल्या व्हिडिओमधे अभिनेत्री शमिताला सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे, ज्याची कव्हरिंग अनकव्हर करताना ती पहायला मिळते. या व्हिडिओच्या कॅप्शनला शिल्पाने लिहलं आहे की, “तुझे आयुष्य कायम आनंदाने गोड भरलेले रहावे. हॅपी बर्थडे शमिता.”

या व्हिडिओमधे कुटुंबासोबतच इतर मित्रपरिवारही पहायला मिळाला. यात शिल्पाचे मिस्टर राज कुंद्रा देखील शमिताला शुभेच्छा देताना दिसतात. शमिताने आपल्या लग्नाच्या स्वयंवराची बात चक्क राज कुंद्रा यांच्यावर याक्षणी सोपवल्याची गोष्टही पहायला मिळाली आहे.
shamita 1585051381
राज कुंद्राने विनोदाने प्रत्युत्तर देत लिहले की, मला एका पत्नीसोबत तिची गोंडस बहिण देखील मिळाली त्यामुळे मी नशीबवान आहे. पण काहीही असलं तरी जर आपल्या लाडक्या मेहुणीने म्हणजे शमिताने जर लवकर लग्नासाठी मुलगा नाही शोधला तर मलाच तो शोधावा लागेल असंही राज कुंद्रा म्हणाले.

READ  'तारक मेहता...' मधील गोकुळधामला कायमस्वरूपी सोडून जाणार आहेत अय्यर आणि बबिता, कारण ऐकून थक्क व्हाल

शमिताचा मित्रपरिवारही या गोड मुहूर्तावर तिला शुभेच्छा देण्यासाठी हजर राहिला होता. शमिताने तिच्या वैयक्तिक आयुष्यात एक कलाकार म्हणून तर नाव कमावलचं आहे परंतु तिने एक माणुस म्हणून सारी नाती जपतं लोकांना आपलसं केल आहे.
shamita shetty shilpa shetty
तर अशा रितीने शमिताच्या वाढदिवसाच्या सोशल मीडियावर शुभेच्छांना विविध माध्यामातून उधाण आलं होतं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment