अभिनेत्री शिल्पा शेट्टी पेक्षाही खूपच सुंदर आहे तिची बहीण, फक्त ‘या’ चुकीमुळे झाले होते करियर बर्बाद…
बाॅलीवुड सिनेसृष्टीचा आज आवाका इतका प्रचंड मोठा आहे की, तुम्ही कल्पना करता करता थकून जालं. मुळात आणि या मोठ्या आवाक्यात फारशी गर्दी आहे ती एकमेकांच्या नातेवाईकांच्या सिनेसृष्टीतल्या समावेशाची. अनेकदा भाऊ-भाऊ, पिता – पुत्र, तर कधी बहिण-बहिण यांना रूपेरी पडद्यावर आपण पाहत आलो आहोत.
त्यापैकी एक म्हणजे, शिल्पा शेट्टी आणि तिची बहिण शमिता शेट्टी. शिल्पा आपल्या अभिनयाच्या आणि प्रसिद्धीच्या जोरावर फार चांगलं यश सिनेसृष्टीत संपादित करू शकली परंतु दुसरीकडे तिची बहिण शमिता हिला त्या प्रमाणात यश संपादन करता नाही आले. शमिता आज वयाच्या 42 व्या वर्षीत एकटीच आयुष्य जगताना पहायला मिळते आहे.
तिचं अजूनही लग्न झालेलं नाही. शमिताने अनेक चांगल्या सिनेमांमधून आपलं काम बखुबी निभावलं परंतु दुर्दैवाने तरीही तिच्या वाट्याला फारशी यशाची पायरी आली नाही. दुसरीकडे शिल्पा शेट्टी तिच्या सिनेमाच्या काळात जितकी प्रसिद्ध आणि यश मिळवत राहिली तितकिच आजही ती कायम चर्चेत आणि भारतीय टिव्ही माध्यमांच्या अनेक कार्यक्रमातली प्रमुख जज असते.
अनेकदा हा प्रश्न पडतो की, सर्व काही सुरळीत असताना अशी कोणती गोष्ट घडली ज्यामुळे शमिताच्या वाट्याला तिचं यश आलं नाही? तर आज आपण त्याच खास गोष्टीवर प्रकाश टाकणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ही खास आजवर अंधारात राहिलेली गोष्ट.
शमिता शेट्टीने आपल्या बहिणिच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला. शमिताला सुरूवातीला फॅशन डिझायनिंगमधे अगदी रस होता, तिने त्याच विषयात पदवीदेखील प्राप्त केली. काॅलेज जीवन जगत असताना शमिताला अभिनेत्री बनन्यात रूची निर्माण झाली. 2000 साली आलेल्या मोहब्बतें या चित्रपटातून तिने बाॅलीवुडमधे पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट झाला, परंतु तरीदेखील शमिताच्या करियरला फ्लाॅप अभिनेत्रीचा ठपका बसला.
यानंतर तिचे अनेक सिनेमे आले परंतु ते बाॅक्स आॅफिसवर फारशी कमाई करू शकले नाही. शमिताने तिच्या करियरबद्दल सांगताना एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तिने तिच्या आयुष्यात अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. आणि त्यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
शमिता म्हणाली की, मी सिनेसृष्टीत येण्याचा निर्णय पक्का न करताच सिनेमा केला. शमिता म्हणाली, माझ्या चित्रपट निवडीच्या आवडींमुळे मी एक फ्लाॅप अभिनेत्री ठरले. शमिताने हिंदीसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटात कामे केली आहेत. तिचा “ज’ह’र” हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर तिने सिनेमांकडे फार लक्ष दिले नाही.
ती त्यानंतर अनेक वर्षे सिनेमांपासून दूर गेली होती. सध्या शमिता वेबसिरीजमधून पुन्हा सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे सर्वत्र तिच्या कमबॅकची चर्चाही रंगली आहे. ती अजुनही सिंगल असल्याने तिने सध्यातरी फक्त कामावर फोकस करण्याचा निर्णय घेतला आहे. शमिताला हवा तसा जीवनसाथी अजूनतरी मिळालेला नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!