“माझ्या नवऱ्याची बायको” या लोकप्रिय मालिकेतील आधीची शनाया पुन्हा परतणार…

.

रसिक प्रेक्षकांनसाठी खूप आनंदाची बातमी आहे. ती अशी की तुमची आवडती मालिका ” माझ्या नवऱ्याची बायको ” मधील शनाया पुन्हा बदलणार आहे. पण यावेळी दुसरी तिसरी कुणी नसून खरी शनाया पुन्हा कमबॅक करणार आहे. ती अभिनेत्री म्हणजेच रसिका सुनील !..

मराठी मालिकेमध्ये सर्वांत जास्त टीआरपी मिळवणाऱ्या मध्ये पाहिलं कोण असेल तर ती ” माझ्या नवऱ्याची बायको ” ही मालिका. चाहत्यांनी या मालिकेला खूप उचलून धरलं. प्रचंड असं प्रेम केलं.

यामध्ये गुरुनाथ, राधिका आणि शनाया यांची जुगलबंदी केमिस्ट्री खूप चालली होती. यामधील ट्विस्ट प्रेक्षकांना खूप आवडायचा. गुरुनाथ ची भूमिका अभिनेता अभिजित खांडकेकर साकारत आहे. तर राधिका अनिता दाते आणि शनाया रसिका सुनील. यामध्ये रसिका सुनील ने साकारलेली शनाया खूप लोकप्रिय झाली.

पण काही काळानंतर रसिका परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेली. त्यामुळे तिला मालिका सोडावी लागली. मग तिच्या जागेवर अभिनेत्री इशा केसरकर ला स्थान देण्यात आलं. तिनं भूमिका साकारताना कुठलीच कसर नाही सोडली. पण नवी शनाया काही लवकर प्रेक्षकांनच्या पसंतीस उतरेना.

हळूहळू सवय झाल्यावर मात्र तिनं ही चांगलं काम करायला सुरुवात केली. आधीच्या शनाया ची आठवण विसरायला लावली. पुढे काय झालं माहीत नाही. करोनामुळे लॉकडाऊन झाला. सर्व चित्रीकरण बंद पडले.

आत्ता काही दिवसांपूर्वी सरकारने दिलेल्या अटींवर चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आली. पण इशा केसरकर ने काही कारणास्तव मालिका सोडल्याचं समोर आलं. आणि सोबतच रसिका सुनील पुन्हा भूमिका साकारत आहे ही आनंदाची बातमीही कळाली.

रसिका सुनील ही लॉकडाउन आधी परदेशात अभिनयाचं शिक्षण घेण्यासाठी गेली होती. तिचं परदेशी शिक्षण पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे ती सध्या काम करण्यास तयार झाली. नव्या भागासह चित्रीकरण सुरू आहे. लवरकच मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सर्व कलाकार तेच असणार आहेत फक्त कथानक थोडं वेगळं असेल. बाकी टीम कमी करण्यात आली आहे.

निर्मिती कंपनी कडून कळवण्यात आलं आहे की पूर्ण सेट नेहमी सॅनिटायझर करण्यात येत आहे. सर्व टीम मास्क वापरत आहे. सगळे कलाकार आपापले मेकअप स्वतः करत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment