अरेच्चा, गॅरीची ‘शनाया’ अडकणार लवकरच विवाहबंधनात, घ्या जाणून कोण आहे तिचा होणारा पती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेविश्वातील अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे यांच्या विवाहानंतर आता लवकरच आपली आणखी एक मराठमोळी ढिंकचाक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत कैद होणार आहे. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण? तर मित्रांनो विवाहाच्या सप्तबंधनात अडकणारी ही अभिनेत्री म्हणजे दुसरी कुणी नव्हे तर “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेतील सर्वांची लाडकी शनाया म्हणजेच रसिका सुनिल.

मागील काही वर्षांपासून रसिका सुनिल आणि आदित्य बिलागी हे एकमेकांना ङेट करत असल्याच्या चर्चा होत होत्या. परदेशात वास्तव्यास असलेल्या आदित्यने अभिनेत्री रसिका सुनिल हिला अतिशय हटके अंदाजात प्रपोज केले होते. त्यानंतर रसिका पुन्हा एकदा या मालिकेत दिसून आली होती. तसेच या मालिकेतून निरोप घेताच ती आपल्या लग्नाच्या तयारीला लागलेली पाहायला मिळाली.

See also  धनुष व ऐश्वर्या यांच्या घटस्फोटास बॉलीवुडची ही सुप्रसिद्ध अभिनेत्री जबाबदार, नेमकं सत्य काय जाणून घ्या.

तर काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ठाण्यात रसिकाने आपल्या साड्यांची संपूर्ण खरेदी केली आहे. तर आदित्य बिलागी हा पुन्हा एकदा आपल्या मायदेशी परतला आहे. रसिका आणि आदित्य हे दोघेही सध्या ठाण्यातच वास्तव्यास आहेत. हे दोघेही एकत्रितपणे आपल्या विवाहाची तयारी करताना दिसत आहेत.

तर नुकतेच अभिनेत्री रसिका सुनिल हिने आपल्या सुंदर हातांवर मेहंदी काढून फोटोशूट आणि व्हिडीओ शूट केले आहे. त्यावरून हे दोघेही लवकरच आपल्या लग्नाचे प्री वेङिंग शूट करणार असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वीच आदित्य व रसिका यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता हे गोड कपल गोव्याच्या किनाऱ्यावर जाऊन जबरदस्त फोटोशूट करत आहेत. रसिकाने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेयर करत “comingsoon” असे म्हटले होते. या व्हिडिओ मध्ये रसिकाच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसत आहे. त्यामुळे आता रसिका साखरपुडा करते की लग्न, हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

See also  'राजा राणीची जोडी' मधील सुजित ढाले पाटलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्या बद्दल जाणून थक्क व्हाल!

आदित्य बिलागी हा एक उत्कृष्ट ङान्सर असून कोरिओग्राफर, मार्शल आर्ट्स आणि ङ्रॉईंगची सुद्धा त्याला खूप आवड आहे. त्याचसोबत तो सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून देखील कार्यरत आहे. बॉलीवुड, हिपहॉप या ङान्स परफॉर्मन्स मधील त्याचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर वायरल झालेले आहेत. आदित्य आणि रसिका या दोघांचीही पहिली भेट लॉस एजिंलिस येथे झाली. तेथेच त्या दोघांची मैत्री सुद्धा झाली होती. तर आता हे क्यूट कपल लवकरच सप्तपदी घेणार आहेत. स्टार मराठीतर्फे अभिनेत्री रसिका सुनिल आणि आदित्य बिलागी यांना सुखी संसाराच्या सुरुवातीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  पुरूषांमधील "या" गोष्टी स्त्रियांना खूपच आकर्षित करतात, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या सिक्रेट गोष्टी...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment