बाळासाहेब आणि शरद पवारांनी एकत्र सुरू केला होता व्यवसाय; अशी झाली तिघाडीत बिघाडी

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

शिवसेना भाजपसोबत तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत राहिलेली आहे. शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे बेधडक आणि बेदरकार व्यक्तिमत्त्व होते तर शरद पवार हे संयमी आणि मुस्सदी होते. दोघांचा पक्ष, जडणघडण, विचारसरणी, स्वभाव आणि ध्येय यात जमीन-अस्मानाचा फरक होता. मात्र तरीही दोघे एकदम चांगले मित्र होते. आजही यांच्या मैत्रीचे दाखले राजकीय व्यासपीठावर कायम दिले जातात. राजकारण आणि व्यवसाय हे एकमेकांना पूरक असणारे क्षेत्र आहेत.

सर्वसाधारणपणे व्यवसायाचा एक ट्रेंड पहिला तर असे लक्षात येईल की, कॉलेज किंवा तरुण वयात कुठे न कुठे मित्र झालेली 2-4 जण एकत्र येतात, व्यवसाय सुरू करतात आणि यशस्वी होतात. हे पूर्वापार चालत आलेलं आहे. असाच एक व्यवसाय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी काढायचे ठरवले होते. हा किस्सा नेमका कधीचा आहे, हे सांगता येणार नाही. पण सामना सुरू करण्यापूर्वीचा हा विषय.

See also  'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री ईशा केसकर पडलीये या प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात, नाव ऐकून थक्क व्हाल!

एकमेकांशी कनेक्ट ठेवणारे आणि तरुण वयातच मोठे व्हिजन असणारे तरुण तडफदार असे 5-6 मित्र कायम एकत्र यायचे. सगळ्यांना राजकारण, माध्यम आणि समाज या विषयांवर बोलायचा आणि यात काम करायचा भलताच कंड होता. बोलता बोलता माध्यम या विषयावरची चर्चा जोरदार रंगली आणि मग याच तरुणांनी एक मासिक काढायचं ठरवलं. हा विषय तसा सोपा नव्हता.

पण यांना कंड होता, हे महत्त्वाचं. इंग्लिशमध्ये अव्वल दर्जाचे असणारे टाईम्स या मासिकाच्या धर्तीवर मराठीत एक मासिक काढायची या मित्रांना इच्छा होती. मग याच विषयाला धरून बाळासाहेब ठाकरेंच्या घरी सगळे मिळून एके दिवशी भेटले. आता माध्यमात निर्मिती करायची म्हणजे पैसे गाठीशी लागतात. मग सगळ्यांनी विचारपूर्वक क्वांट्री काढायची ठरवली. 5 हजार रुपये प्रत्येकी अशी रक्कम गोळा झाली. आता काम बऱ्यापैकी मार्गी लागणार, अशी चिन्हे होती.

आपल्याकडे एक प्रथा असते, आपण जे काही नवं करतो, ते गणेशाला म्हणजेच गणपतीबाप्पाला अर्पण करतो. पहिला अंक लावला, छपाई झाली. आता हा नवा व्यवसाय दणक्यात पुढे न्यायचा, असा या मित्रांचा इरादा होता. मात्र अंकाचे वितरण करण्यापूर्वी या 5-6 मित्रांनी या क्षेत्रातील थोरा-मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचे ठरवले. आणि तिथेच नेमका गेम झाला. या नवतरुण पोरांना कुणीकुणी काय काय सल्ला दिले, त्यांनीही ते मान्य केले. अशातच यांना कुणीतरी असा सल्ला दिला की, ‘पहिला अंक सिद्धीविनायकाला अर्पण करा, हे केल्यावर अंक एवढा खपेल की, कुठे दिसणारच नाही’. यावर मात्र मतभेद होण्याची शक्यता होती. कारण पवार हे सुरुवातीपासूनच नास्तिक होते, देवावर त्यांचा विश्वास नव्हता. मात्र सहकाऱ्यांची भावना होती, म्हणून तेही तयार झाले. आणि हा व्यवसाय पुढच्या काहीच दिवसात डबघाईला येऊन बंद पडला.

See also  बिग बॉस मराठीमधील 15 स्पर्धकांची पूर्ण यादी, तृप्ती देसाई, कीर्तनकार शीवलीला पाटील असे कलाकार आहेत यादीमध्ये...

‘ठरल्याप्रमाणे पहिला अंक आम्ही सिद्धीविनायकाला अर्पण केला गेला आणि पुन्हा ते मासिकच कधी दिसले नाही’ असे पवार हसत सांगतात.
व्यवसायात बुडी खाल्लेल्या शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंनी राजकीय क्षेत्रात अशी उडी घेतली की, केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे राजकारण त्यांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही.

एवढंच नाही तर नंतरच्या काळात बाळासाहेबांनी सामना हे मुखपत्र काढले जे आजही चालू आहे. तर पवारांचे बंधू प्रताप पवार यांनी सकाळ विकत घेऊन एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला.

हा किस्सा स्वतः पवारांनी बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत एका सभेत सांगितला होता. या सभेला नारायण राणे, मनोहर जोशी आणि बऱ्याच मोठया प्रमाणात शिवसैनिकही उपस्थित होते. मराठी माणूस उद्योगात पुढे जाऊ शकत नाही, असे या किस्स्यातुन दिसत असले तरी शरद पवारांनी सहकारी क्षेत्रात मोठे काम केले तसेच अनेक मराठी मुलांना उद्योग-धंद्याला लावले. बाळासाहेबांनीही अनेक मराठी मुलांना आणि शिवसैनिकांना उद्योग उभा करण्यास मदत केली.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment