लेकीला निरोप देत या अभिनेत्याने टाकली पोस्ट… “पिल्लू निघालं वैमानिक व्हायला”..
मित्रहो मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार खूप लोकप्रिय आहेत, शिवाय ते सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतात. म्हणून त्यांच्या आयुष्यातील लहान लहान घटना, गोष्टी सुद्धा त्यांच्या चाहत्यांना सहज कळतात. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाची छटा आता त्यांच्या नव्या पिढीमध्ये सुद्धा पाहायला मिळते, म्हणून अनेक मराठमोळ्या कलाकारांची मुले आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात उड्डाण घेताना दिसतात. मात्र तरीही काही कलाकार मंडळींची मुले याला अपवाद असून त्यांनी आपल्या करिअर साठी दुसरा ऑप्शन निवडलेला पाहायला मिळतो.
यामध्ये अभिनेत्री अलका कुबल यांची थोरली मुलगी इशानी ही पायलट आहे, तर धाकटी मुलगी कस्तुरी ही फिलिपाईन्स येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. इतकेच नसून आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळी यांची मुलगी मिथिला ही फिटनेस ट्रेनर आहे. अभिनेते भरत जाधव यांची मुलगी डॉक्टर आहे. आता अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी पायलट होण्याचे स्वप्न पाहत आहे, शरद हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध आणि गाजलेले अभिनेते आहेत. अनेक चित्रपट आणि मालिकांतून ते पडद्यावर झळकले आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची लिस्ट देखील भलीमोठी आहे.
ठिपक्यांची रांगोळी, बंदिनी, दुर्वा, दामिनी, अग्निहोत्र, अग्निहोत्र २, वादळवाट, एक वाडा झपाटलेला, उंबरठा, झोका, उंच माझा झोका, अर्थ, वाहिणीसाहेब, असे हे कन्यादान यांसारख्या अनेक मालिकेतून आजवर त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक भूमिकेचे इथे खूप कौतुक झाले आहे, म्हणून तर आजदेखील त्यांची क्रेझ प्रेक्षकांच्या मनात ठासून भरलेली आहे. त्यांना पडद्यावर पाहण्यासाठी रसिक मंडळी नेहमीच फार उत्सुक असतात. हिमालयाची सावली, मी नथुराम गोडसे बोलतोय, गंध निशिगंधाचा, झाले मोकळे आभाळ यांसारख्या अनेक नाटकात देखील ते सहभागी होते.
शरद पोंक्षे यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत, मुलाचे नाव स्नेह आणि मुलीचे नाव सिद्धी असे आहे. स्नेह याने नुकताच मराठी चित्रपट सृष्टीत आपले पाऊल टाकले असून “धर्मवीर” चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या टीममध्ये सहभागी झाला आहे. त्याला नृत्याची देखील खूप आवड आहे, आणि या क्षेत्रात येण्याचा देखील त्याचा विचार आहे. शरद यांची मुलगी सिद्धी हिला पायलट बनायचं आहे, खास तिच्यासाठी पोस्ट शेअर करत शरद यांनी “पिल्लू निघालं वैमानिक व्हायला” अस म्हणत तिला भावनिक निरोप दिला आहे.
सिद्धी लहानपणापासून शालेय शिक्षणात हुशार आहे, १२ वी मध्ये असताना तिने विज्ञान शाखेत ८७% गुण मिळवले होते त्यावेळी तिचे अभिनंदन करत शरद यांनी एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये ते म्हणाले होते की “२०१९ साली माझे कर्करोगावरील उपचार सुरू होते, त्यावेळी हॉस्पिटलमध्ये येऊन कॉलेजचा अभ्यास करून एवढ्या टेन्शन मध्ये असतानाही पिल्लुनं ८७% मार्क १२ शाखेत मिळवले. अभिमान वाटला मला आणि सतत वाईट बातम्या चहुबाजूंनी येत असताना एक चांगली बातमी सांगायला आनंद होत आहे.”
शरद आणि त्यांच्या लेकीला भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.