शार्दुल ठाकूर लवकरच विवाहबंधनात अडकणार, नुकताच झाला साखरपुडा धूमधडाक्यात संपन्न…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

हल्ली बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये एकापाठोपाठ एक शुभविवाह सोहळे संपन्न होत असल्याचे आपण पाहत आहोत. परंतु आता लग्नांची धम्माल ही क्रिकेट नगरीत सुद्धा पाहायला मिळणार, असे वाटते. अर्थातच क्रिकेट प्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो लवकरच आपल्या भारताचा युवा स्टार क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर हा विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. शार्दुल ने आपली गर्लफ्रेंड मिताली परुळकर हिच्यासोबत साखरपुडा करून सोशल मीडियावर चाहत्यांसाठी फोटोज् शेयर केले आहेत.

शार्दुल च्या काही फॅन्सनी तर उत्साहाच्या भरात त्याचे फोटोज् आणि व्हिडिओज सोशल मीडियावर वायरल करायला सुरुवात केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या BKC येथील हॉलमध्ये शार्दुल ठाकूर चा साखरपुडा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.

See also  "राहुल द्रविड हे माझं पहिलं वहिलं प्रेम आहे", या बॉलीवुड अभिनेत्रीने केले अखेर कबूल..

मुंबईतील पालघर येथे राहणारा शार्दुल सर्वांत आधी पालघर मधून लोकांच्या समोर आला होता. काही संघामध्ये महेंद्रसिंग धोनी च्या कॅप्टन्सीखाली खेळल्यावर चेन्नई सुपर किंग्ज मध्ये तो खऱ्या अर्थाने झळकला. त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळाल्यावर त्याने स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने वॉशिंग्टन सोबत मिळून केलेलं पूर्ण एक अर्धशतक भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. म्हणून तर भारत मालिका देखील जिंकला होता.

तसेच त्यानंतर मर्यादित षटकांत सुद्धा उत्कृष्ट कामगिरी करणारा शार्दुल एक महत्त्वपूर्ण अष्टपैलू म्हणून आपल्या भारतीय संघात आहे. भारतीय संघाला विकेटची गरज असताना विकेट घेणारा आणि कठीण प्रसंगी फलंदाजी सांभाळणारा म्हणून त्याची अप्रतिम ओळख आहे. त्याचप्रमाणे शार्दुल ने आतापर्यंत तीनही प्रकारच्या क्रिकेट मध्ये भारताकडून पदार्पण करत तो चार कसोटी, 15 एकदिवसीय आणि 24 टी -20 सामने खेळला आहे.

See also  बाहुबली स्टार प्रभासने आपल्या जिम ट्रेनरला तब्बल 89 लाखाची रेंज रोव्हर कार केली गिफ्ट, कारण ऐकून थक्क व्हाल!

साखरपुडा तर संपन्न झाला, परंतु आता लग्न कधी बुवा….हा प्रश्न शार्दुल च्या सर्व चाहत्यांना पडला आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार त्याचे लग्न 2022 मध्ये होणार असल्याचे समजते. 2022 चा टी- 20 सामना पार पडल्यानंतर हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment