हे मराठमोळं कपल मालदीव मध्ये एन्जॉय करतंय हनिमून, पहा त्यांचे काही खास फोटोज…

Advertisement

मराठी कपल जे सध्या मालदीवमधे आपलं हनीमून एन्जाॅय करत आहे, अर्थात ते आहे शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई. शर्मिष्ठा राऊत हिच्याबद्दल सांगायच तर तिने मराठी सिनेसृष्टीत आपला कामाचा ठसा योग्यरित्या उमटवला आहे.

78603188

Advertisement

तिने मागे पार पडलेल्या बिग बॉसच्या पर्वातून स्वत:च्या फॅन फाॅलोविंगची संख्यादेखील वाढवली. “मन उधाण वाऱ्याचे”, “उंच माझा झोका”, “जुळून येती रेशीमगाठी” या मराठी मालिकांमधेही ती होती. शर्मिष्ठा राऊत हिने मराठी नाटकांमधून आपलं नाव गाजवतं नंतर मराठी सिनेमांमधेही चांगल्या भुमिका पार पाडल्या.

शर्मिष्ठा राऊत हिचा पहिला विवाह अमेय निपानकर या बिझनेसमॅन सोबत झाला होता परंतु गेल्या दोन तीन वर्षांखाली दोघांनी डिव्होर्स घेतला आणि दोघे वेगळे झाले. त्यानंतर मात्र शर्मिष्ठाच्या आयुष्यात आला तो तेजस देसाई.

See also  CID फेम एसीपी प्रद्युमनचा मुलगा आणि सून आहेत प्रसिद्ध मराठी कलाकार, त्यांची नावे जाणून थक्क व्हाल!
Advertisement

80496659

तेजस देसाईसोबत नुकतच वर्षभरात लग्न झालं आणि शर्मिष्ठा त्याच्यासोबत क्वालिटी टाईम अर्थात मोलाचा वेळ सोबत घालवण्यासाठी मालदिवला पोहोचली. खऱ्या अर्थानं शर्मिष्ठाच्या रेशीमगाठी जुळून आल्या त्या तेजस सोबतच असं आता म्हणायला हरकत नाही. दोघेही अत्यंत रोमॅन्टिक पद्धतीने आपला हनीमून एन्जाॅय करत आहेत, आणि दोघेही सोशल मीडियावर आपले फोटोज अपलोड करत आहेत.

Advertisement

सध्याच्या घडीला मराठी सिनेसृष्टी असो, हिंदी असो वा दाक्षिणात्य प्रत्येक ठिकाणचे काम करणारे कलाकार मालदिव या ठिकाणीच आपलं व्हॅकेशन अथवा हनीमून एन्जाॅय करण्यासाठी जात असलेले पहायला मिळतात. अशातच मराठीत कमी कालावधीत लोकप्रिय ठरलेलं कपल म्हणजेच तेजस आणि शर्मिष्ठा राऊत हे दोघेही मालदिवला आपलं हनीमून साजरं करत आहेत.

See also  "तुझ्यात जीव रंगला" फेम पाठक बाईंचा नवा अंदाज सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पहा पाठक बाईंचे सुंदर फोटो...

SINGLE IMAGE 2020 10 23 8 22 9 thumbnail

Advertisement

लग्न झाल्यानंतर शर्मिष्ठा एका सिनेमाच्या शुटमधे व्यस्त होती आणि नेमकचं तेव्हा कोरोनाच सावट सर्वांवर पसरलं होतं, तर त्यानंतर हनीमून प्लॅन करण्यासाठी खास असा विचारच डोक्यात नव्हता असं शर्मिष्ठाने सांगितलं आहे. परंतु नंतर डोक्यात विचार आला आणि कोरोनाच सावटही हळूहळू दूर जाऊ लागलं तेव्हा मनात विचार आला आणि थेट मालदिवला एन्जॉय करायला निघालो. असं शर्मिष्ठा म्हणाली.

शर्मिष्ठाने आपल्या सोशल मीडियावर मालदीवमधले स्वत:चे व सोबत आपल्या नवऱ्याचेही फोटो शेअर केले आहेत, या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स व लाईक्स भरगच्च पहायला मिळताना दिसत आहेत. शर्मिष्ठा मालदीवमधल्या काही फोटोंमधे भलतीच बो’ल्ड’ही दिसत आहे.

Advertisement

Sharmishtha Raut 1

तिने बिकिनी प्रकारातल्या मोनोकिनी कपड्यातही फोटोशुट करत ते शेअर केले आहेत. शर्मिष्ठा आणि तेजस यांचा इगतपुरी या ठिकाणी लाॅ’क’डा’ऊ’नदरम्यान साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर कोरोनाचा अंदाज घेत ऑक्टोबरमधे ठराविक लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळाही पार पडला. तिचा नवरा तेजसदेखील हनीमून चांगलच एन्जाॅय करत असल्याची प्रचिती फोटोंमधून हमखास येतेच आहे.

See also  बापमाणूस मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे कोरोनाने झाले निधन...
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Advertisement

Leave a Comment

close