फोटोतील या बालकलाकाराला ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री आणि नवरा निर्माता, नाव जाणून थक्क व्हाल!
बालपणी सिने मालिका इंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या बालकलाकार आज प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. कारण लहानपणी पासून ते आत्ता पर्यंत हळूहळू शिकत कामं करत यशाची वाट त्यांना मिळालेली आहे.
त्यात अनेक नावं घेता येतील. पण आपण फक्त एकाच आजच्या प्रसिद्ध तरुण अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत. जिचा सोशल मीडियावर एक बालपणी केलेल्या कामाचा फोटो व्हायरल होत आहे.
जिच्या बद्दल बोलणार आहोत तिचं नाव आहे श्रेया बुगडे. चला हवा येऊ द्या. ओळखलं की नाही ? का नसेल ओळखलं ? आपल्या झटके दार अभिनयाने तिने रसिकांना भुरळ घातलेली आहे. घराघरात जाऊन ती आज हसवत आहे. तिला अनेक पसंत ही करत आहेत. तर तिचा बालपणी पासून आत्तापर्यंत चा प्रवास चला जाणून घेऊ.
लोकप्रिय रियालिटी शो मालिका चला हवा येऊ द्या मधील महिला कलाकार श्रेया बुगडे ( shreya bugde ) एक उत्तम अभिनेत्री आहे. जिला आपण तिच्या आतापर्यंत च्या अनेक चांगल्या कामात पाहिलं आहे. तुम्ही तिला ह्या पूर्वी चला हवा येऊ द्या ( chala hava yeu dya ) व्यतिरिक्त किमवा आधी अनेक मालिकांत देखील पाहिलं असेलच. हो पण चला हवा येऊ द्या मुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. हेही खरं आहे.
तारीख २७ डिसेंबर २०१५ साली तिने निखिल सेठ ( nikhil seth ) ह्यांच्याशी लग्न केलं. एका मालिकेदरम्यान दोघांची ओळख झाली होती. निखिल सेठ हा एका मालिकेचा कार्यकारी निर्माता होता. त्यानेच श्रेयाला लग्नासाठी मागणी घातली होती पुढे परिवाराच्या सहमतीने दोघांनी धूम धडाक्यात लग्न केलं.
श्रेया सोशिअल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे नेहमीच ती तिचे अनेक फोटो सोशिअल मीडियावर अपलोड करताना पाहायला मिळते. आज ती एका निर्मात्याची बायको आहे. तिला वाटेल ती या क्षेत्रात करू शकते. कारण निर्मिती करणाराच नवरा आहे.
लोकप्रिय शो म्हणजेच चला हवा येऊ द्या व्यतिरिक्त तिने कोणत्या मालिकेत काम केलं आहे माहितेय ? तू तिथे मी, माझे मन तुझे झाले, छुत्ता छेडा (गुजराती मालिका)( gujrati malika ), थोडा है, बस थोडे की जरुरत हैं (हिंदी मालिका) ( hindi malika )अश्या बऱ्याच मालिकांत तिने काम केले आहे.
पण अनेकांना हे माहित नसेल कि श्रेया अगदी १०-१२ वर्षांची असताना तिने मीना नाईक दिग्दर्शित आणि डॉ. अनिल बांदिवडकर लिखित “वाटेवरती काचा ग” ह्या नाटकात काम केले आहे. नाटकात अभिनय करून ती पुढे आली. आणि एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नामवंत झाली.
वाटेवरती काचा गं ह्या नाटकात तिच्या सोबत दे धक्का ( de dakhaa ) चित्रपटातील अभिनेत्री गौरी वैद्य देखील होती. ह्या नाटकात विशेष म्हणजे एकही पुरुषाचा ह्या नाटकात समावेश नव्हता. अभिनेत्री मनवा नाईक हिच्या आई मीना नाईक ह्यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले होते शिवाय त्यांनी नाटकात काम हि केलेले पाहायला मिळाले.
श्रेयाने मालिकेत मयुरीचे पात्र साकारले होते. अगदी लहान वयात तिने साकारलेल्या ह्या नाटकाची त्यावेळी अनेकांनी स्थुती केली होती. श्रेया हि एक उत्तम अभिनेत्री आहे हे ह्या नाटकातून पाहायला मिळाले. “वाटेवरती काचा ग” हे नाटक तुम्हाला सोशिअल मीडियावरहि नक्कीच पाहायला मिळेल.
चला हवा येउद्या मालिकेत सध्या श्रेया हि एकमेव महिला कलाकार असली तरी तिला सेटवर कधीही एकटं वाटलं नाही. ती सर्वांत मिळून मिसळून राहणारी एक उत्तम कलाकार आहे. आज श्रेयाचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. याचं सगळं श्रेय ती आपल्या आई वडिलांना देत आहे. कारण त्यांनीच तिला घडवलं. खरच असे आईवडील सर्वांना मिळो. श्रेया आणि तिच्या सगळ्या कुटुंबाला पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून स्टार शुभेच्छा. काळजी घ्या सुरक्षित रहा. वाचको तुम्ही सुद्धा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.