‘रात्रीस खेळ चाले 3’ मध्ये ‘शेवंता’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार? जाणून घ्या सविस्तर…

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीझन २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले.

Anna And Shevanta From Ratris Khel Chale 2

आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे.

अण्णा परत येतायत मग ‘शेवंता’ही येणार!, अभिनेत्री अपूर्वानं दिले संकेत; तिसऱ्या भागात दिसणार आहे, ‘शेवंता’चा जबरदस्त लूक! अण्णा नाईक यांच्यासोबतच ‘शेवंता’ देखील परत येणार असल्याचे संकेत खुद्द ‘शेवंता’नं म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं दिले आहेत.

READ  हे मराठमोळं कपल मालदीव मध्ये एन्जॉय करतंय हनिमून, पहा त्यांचे काही खास फोटोज...

75888804

अण्णा परत येतायत मग ‘शेवंता’ही येणारच!, ‘झी’ मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘अण्णा नाईक परत येणार’ अशी जाहीरातबाजी करत या मालिकेच्या तिसऱ्या सीझनचं जोरदार प्रमोशन देखील सुरू आहे. त्यात आता अण्णा नाईक यांच्यासोबतच ‘शेवंता’ देखील परत येणार असल्याचे संकेत खुद्द ‘शेवंता’नं म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं दिले आहेत.

अपूर्वानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. थरार आणि रहस्यमय कथानकानं प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या मालिकेतील शेवतांचा नवा लूक तिनं सोशल मीडियात शेअर केला आहे. लाल रंगाची नऊवारी साडी, कपाळावर कुंकु आणि हातात हिरवा चुडा अशा रुपात उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेवंताचा लूक या मालिकेतील तिच्या भूमिकेची उत्कंठा वाढवणारा ठरतो आहे.

READ  सोनाली कुलकर्णी करणार या नव्या क्षेत्रात पदार्पण, लवकरच येतोय तिचा हा नवीन वेब सिनेमा...

ZEE5 2

कोकणातील रहस्यमय कथेची जोड आणि लोकांच्या मनावर छाप पाडून जाणाऱ्या भूमिका यांमुळे ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या दोन्ही सीझननं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. प्रेक्षकांच्या याच पसंतीनंतर आता या मालिकेचं तिसरं पर्व भेटीला येत आहे. अण्णा नाईक या पात्राचा दरारा चांगलाच गाजला.

तर शेवंतानं आपल्या सौंदर्य आणि अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अण्णा नाईक आणि शेवंता ही जोडी हिट ठरली होती. दोघांवर सोशल मीडियात जोरदार मिम्स देखील तयार केले गेलेत. आता पुन्हा एकदा ही जोडी रहस्यमय कथेचा थरारक अनुभव देण्यासाठी सज्ज झाली आहे.

68201729

रात्रीस खेळ चाले’ ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून काही वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच ‘रात्रीस खेळ चाले २’ प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला होता.

READ  बिगबॉस फेम मराठी अभिनेत्री पडलीय प्रेमात, लवकरच करणार आहे लग्न, परंतु निवडलेला नवरा मात्र...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment