धक्कादायक: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; अजूनही क्लीन चिट मिळाली नाही, पुन्हा होऊ शकते चौकशी

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मुंबई: अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. ती अजूनही गुन्हे शाखेच्या रडारवर असून, तिची पुन्हा कधीही चौकशी होऊ शकते. या प्रकरणात अभिनेत्री शेर्लिन चोप्राला साक्षीदार बनवणार असल्याचे गुन्हे शाखेचे म्हणणे असून, आरोपी अरविंद श्रीवास्तव याला चौकशीत पूर्ण सहकार्य करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत समोर आलेल्या सर्व बँक खात्यांची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटर्स नेमण्यात आले आहेत.

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांनी अश्लील रॅकेट चालवल्या प्रकरणी उमेश कामतला अटक केली. उमेश कामतने यापूर्वी कुंद्राच्या कंपनीत काम केले होते. मुंबई गुन्हे शाखेने म्हटले आहे की, या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड राज कुंद्रा आहे. राज कुंद्रा आणि  ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या त्याचा भाऊ यांनी केन्रिन नावाची कंपनी तयार केली. ज्यावर अश्लील चित्रपट दाखवले जातात. चित्रपटांचे व्हिडिओ भारतात चित्रीत करण्यात आले आणि वी ट्रान्सफरच्या माध्यमातून परदेशात पाठविण्यात आले.

See also  जुही चावलाचे या अभिनेत्यासोबत झाले होते पहिले लग्न, स्वतः जुहीनेच केला खुलासा!
Advertisement

मात्र, आतापर्यंत झालेल्या तपासात या प्रकरणात शिल्पा शेट्टीचा सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे मिळाले नाहीत. परंतु या प्रकरणात शिल्पा शेट्टीचीही विचारपूस करण्यात येत आहे. शुक्रवारी जेव्हा मुंबई गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या जुहूतील घरावर छापा मारला तेव्हा शिल्पा आणि राज दोघेही पोलिसांसोबत होते. या दरम्यान शिल्पा आणि तिच्या पतीमध्ये जोरदार भांडण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याठिकाणी पोलिसांनी शिल्पाची बराच वेळ चौकशी केली. यात शिल्पा घाबरलेली वाटत होती असे पोलिसांचे म्हणणे आहे. शिल्पा शेट्टीने अश्लील चित्रपट आणि हॉटशॉट अॅपबद्दल काहीही माहीत नसल्याचे सांगितले.

Advertisement

Leave a Comment

close