शिल्पा शेट्टीच्या अडचणी काही थांबण्याच्या नाव घेईनात; आता ‘या’ संस्थेने केली मोठी कारवाई, ऐकून धक्का बसेल

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मुंबई: अश्लील फिल्म्स प्रकरणात अडकलेले राज कुंद्रा आणि त्याची पत्नी शिल्पा शेट्टी यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही, आता त्यांच्या वियान इंडस्ट्रीज या कंपनीवर सेबीने कारवाई केली आहे. सेबीने (SEBI) शिल्पा शेट्टीवर 3 लाख रुपयाचा दंड लावले असल्याचे वृत्तसंस्था एएनआयने माहिती दिली.

सेबीने ठोठावला दंड…

राज कुंद्रा आणि त्याची कंपनी वियान इंडस्ट्रीजने सेबी नियमांचे उल्लंघन (प्रोहिबिशन ऑफ इनसाइडर ट्रेडिंग)  केल्याबद्दल हा दंड ठोठावला आहे. राज कुंद्राला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सेबी (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) देखील राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरूद्ध अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे.

See also  फक्त 17 व्या वर्षी आई बनली होती सलमान खान सोबत काम केलेली हि अभिनेत्री...

दरम्यान, दुसरीकडे मुंबई न्यायालयाने राज कुंद्रा आणि रयाण थोर्पे याची जमानत याचिका फेटाळली. विशेष म्हणजे यावर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई गुन्हे शाखेसमोर पोर्नोग्राफी रॅकेट उघडकीस आले. गुन्हे शाखेला जेव्हा या प्रकरणातील तार सुप्रसिद्ध व्यापारी आणि शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्राशी संबंधित आहेत कळले तेव्हा त्यांनी तपास सुरू केला. पाच महिन्यांच्या चौकशीनंतर गुन्हे शाखेला मजबूत पुरावे सापडले ज्या आधारावर राज कुंद्राला अटक केली.

कोर्टाने कडून कोणताही दिलासा नाही…

मुंबईची गुन्हे शाखा सातत्याने या प्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. मुंबई पोलिसांनी कोर्टाला सांगितले की राज कुंद्राने अश्लील चित्रपटांच्या निर्मिती व व्यापारातून सुमारे 1.17 कोटी रुपये कमावले आहेत आणि त्याने केवळ ऑगस्ट 2020 ते डिसेंबर 2020 या काळात ही कमाई केली आहे. बरेच दिवसांपासून राज कुंद्रा त्याच्या अटकेस चुकीचे म्हणत आहे पण त्यादरम्यान कोर्टाने त्याला कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

See also  अजय देवगण आणि अक्षयकुमार या दोघांनाही येतो "या" अभिनेत्रीचा खूप राग, कारण जाणून विश्वास बसणार नाही...

शिल्पा शेट्टीला अजूनही क्लीन चिट नाही…

शिल्पा शेट्टीचा या प्रकरणात सक्रिय सहभाग असल्याचा कोणताही पुरावा गुन्हे शाखेला मिळाला नाही. मात्र तिची चौकशी सुरूच आहे. तिला अद्यापही क्लीनचिट मिळाली नसून प्रकरण निकाली लागेपर्यंत तिची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment