शरद पवारांच्या ‘त्या’ एका चुकीमुळे शिवसेना आपले पाय मराठवाड्यात घट्ट रोवू शकली…

शरद पवार हे संभ्रमाचे राजकारण करतात, हे आपणा सर्वांना माहिती आहे. पवारांनी ते करू नये, यासाठी राष्ट्रवादीचे अनेक नेते व कार्यकर्ते आग्रही असतात. मात्र पवार त्यांच्या अशा प्रकारच्या राजकारणाविषयी ठाम आहेत. ‘आपल्याला कुणीही गृहीत धरता कामा नये.

Elgar Parishad Organisers Ask Sharad Pawar to Ensure SIT Probe

एकाच वेळी आपले सगळीकडे जाण्याचे मार्ग खुले असायला हवेत, असे पवारांचे मत आहे, असे मी ऐकून आहे. मात्र पवारांच्या याच राजकारणाचा त्यांना फायदा कमी आणि तो’टा’च जास्त झाला आहे, हे आपल्या लक्षात येईल. मात्र त्यासाठी आपल्याला पवारांच्या राजकीय यशाचा आणि भूमिकांचा  अभ्यास करावा लागेल.

1985 च्या दरम्यानचा काळ होता. इंदिरा गांधींची ह’त्या झाल्याने राजीव गांधी शॉ’क’मध्ये होते. त्यावेळी शरद पवार ‘समाजवादी कॉंग्रेसचं’ राष्ट्रीय नेतृत्व होते. इंदिरा गांधींच्या ह’त्ये’नंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकाही झाल्या. त्यातही भूतो न भविष्यती अशा प्रकारचा विजय राजीव गांधी यांनी मिळवला. दरम्यानच्या काळात राजीव गांधी यांनी पवारांची भेट घेतली आणि एकत्र काम करण्याविषयी विचारले. ‘हम सब एक उमर के लोग है, आप कबतक विपक्ष मै बैठंगे? मिलकर काम करना चाहिये’ म्हणत राजीव गांधीनी पवारांना आमंत्रण दिले होते.

READ  या प्रसिद्ध अभिनेत्यावर फिदा आहे ही प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री, या चित्रपटात...

rajiv gandhi and sharad pawar

राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या वागण्या-बोलण्यात आणि भूमिकांमध्ये मोठा फरक होता. राजीव गांधी हे जवळपास सर्वच पक्षाच्या आणि वि’रो’धा’त’ल्या नेत्यांना मित्रत्वाची वागणूक द्यायचे. याचे अनुभव कित्येक भाजप नेत्यांनाही होते. राज्यातील अनेक नेते तसेच पवारांच्या ‘समाजवादी कॉंग्रेस’ पक्षाचे नेतेही राजीवजींच्या प्रेमात होते.

आता नेमका काय निर्णय घ्यायचा हे पवारांना कळत नव्हते. समाजवादी पक्षाच्या नेत्यांचीही मुख्य प्रवाहात जाण्याची इच्छा होती. त्यामुळे आता पवार कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सकारात्मक आणि ठाम झाले होते. मात्र राज्यातील मूळ कॉंग्रेसच्या नेत्यांना पवारांचे परत येणे ख’ट’क’त होते. महाराष्ट्र कॉंग्रेसचे अनेक बडे नेते पवारांच्या परत येण्यावर नाराज होते. मात्र कॉंग्रेस हायकमांडची परंपरा सगळ्यांना माहिती आहे. हायकमांड जे सांगेन तो निर्णय अंतिम असतो.

sharad pawar

दरम्यान पवार पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतणार याची कुणकुण राजकीय वर्तुळात लागली होती. नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारूक अब्दुल्ला यांनीही पवारांना मुख्य प्रवाहात म्हणजेच कॉंग्रेसमध्ये येण्याचा सल्ला दिला. अशातच पवारांना राजकीय विश्लेषक अरुण नेहरू यांनी निमंत्रण धाडले.

READ  पडद्यावर काम करणाऱ्या जोड्या रिअल लाईफ मध्ये कश्या जगतात पहा.. तिसरी जोडी पाहून थक्क व्हाल...

त्यांची भेट झाली. या भेटीत अरुण नेहरू पवारांना म्हणाले की, तू जर कॉंग्रेसमध्ये गेलास तर कॉंग्रेसचं आणि महाराष्ट्राचं नुकसान होईल. महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यात तुझे वलय आहे. त्या भागातील मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग तुझ्या मागे आहे. मूळ कॉंग्रेस नेत्यांच्या वि’रो’ध केल्याने हा वर्ग तुझ्या पाठीशी आहे. तू कॉंग्रेसमध्ये गेल्यास हे तरुण शिवसेनेत जातील. आज फक्त मुंबई-ठाण्यात असलेली शिवसेना थेट मराठवाड्यात पाय रोवू शकेल.

941767 sharad pawar dna

मात्र अरुण नेहरूंचा सल्ला मोठ्या नम्रेतेने धु’ड’का’वू’न लावत अखेर पवारांनी कॉंग्रेसमध्ये पुन्हा परतण्याचा निर्णय घेतला. 7 डिसेंबर 1986 रोजी पवारांनी राजीव गांधी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मराठवाड्यातील हा तरुण वर्ग आपल्याच पाठीशी राहावा म्हणून हा पक्षप्रवेश औरंगाबाद येथे केला. तिथे पवारांनी नेहमीच्या शैलीत लोकांना पटवले. मात्र जे व्हायचे तेच झाले.

READ  समलैंगिक नव्हे तर थेट चक्क ट्रान्सवुमनच झाला हा मराठी फॅशन डिझायनर, नवीन लुक मध्ये असा दिसतोय...

आपले आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’मध्ये पवार सांगतात की, अरुण नेहरूंनी सांगितलेल्या गोष्टी बऱ्यापैकी खऱ्या ठरल्या होत्या. समाजवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असणारे जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. नंतर पवारांनी परभणी आणि इतर ठिकाणी गाठीभेटी घेतल्यावर लक्षात आले की, समाजवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

freepressjournal%2Fimport%2F2018%2F06%2FShiv Sena

हेच कमी म्हणून की काय त्यानंतर २ वर्षांनी झालेल्या औरंगाबाद महानगरपालिकेत पहिल्यांदाच शिवसेनेला बहुमत आणि सत्ता मिळाली. त्याचाच परिणाम शिवसेना मराठवाड्यात मोठ्या जोमाने पसरली. शरद पवारांच्या एका चुकीमुळे शिवसेना मराठवाड्यात आपले पाय घट्ट रोवू शकली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment