CID फेम एसीपी प्रद्युमनचा मुलगा आणि सून आहेत प्रसिद्ध मराठी कलाकार, त्यांची नावे जाणून थक्क व्हाल!
टेलिव्हिजनवर चालणाऱ्या “सीआयडी” या मालिकेमुळे प्रत्येक घराघरांत पोहोचलेले एसीपी प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम. यांचा फक्त चेहरा जरी आठवला, तरीही त्यांचे ङायलॉग्ज आपल्याला लगेचच आठवतात. लहान पडद्यासोबतच त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला शिवाजी साटम यांच्या मुलाविषयी सांगणार आहोत.
शिवाजी साटम यांचा मुलगा व सून हे दोघेही अभिनय क्षेत्रात आहेत. इतकंच नव्हे तर हे दोघेही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध चेहरे आहेत. शिवाजी साटम यांच्या मुलाचे नाव अभिजीत साटम असे आहे.
शिवाजी साटम यांना स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल व कुटुंबाविषयी बोलायला फारसे काही आवङत नाही. खूप कमी लोकांना माहीत आहे की, अभिजितने “हापूस” या मराठी चित्रपटात काम केले आहे. याशिवाय त्याने अनेक चित्रपटांत काम केले आहे.
शिवाजी साटम यांची सून मधुरा वेलणकर हिने अनेक मराठी चित्रपटांत काम केले आहे. तुम्हांला ठाऊक आहे का मधुरा ही प्रदीप वेलणकर यांची सुकन्या आहे. म्हणजेच प्रदीप वेलणकर आणि शिवाजी साटम हे नात्याने एकमेकांचे व्याही आहेत.
मधुरा व अभिजीत यांना युवान नावाचा एक मुलगा आहे. मधुरा वेलणकर ही आपल्या सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असते. त्यामुळे ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमी नवनवीन पोस्ट शेयर करत असते. मधुराने अखंड सौभाग्यवती, अधांतरी, अशाच एका बेटावर, उलाढाल, एक ङाव धोबी पछाङ, खबरदार, गोजिरी, मी अमृता बोलतेय, सरीवर सरी, हापूस, क्षणोक्षणी यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.