“ये रिश्ता क्या कहलाता है” मधील या प्रसिद्ध कलाकाराने सोडली मालिका, कारण…
टेलिव्हिजनवरील नामांकित मालिका “ये रिश्ता क्या कहलाता है” सध्या खूप प्रसिद्धीत आहे. आता शेवटच्या ट्रॅकवर ही मालिका सुरू आहे. त्यामुळे ही मालिका संपल्यावर यामधील कलाकार मालिकेला कायमचे गुङ बाय करून जातील.
मागील काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील कार्तिकची भूमिका साकारणारा अभिनेता मोहसीन खान याने ह्या मालिकेतील आपल्या शेवटच्या सीनची इमोशनल पोस्ट शेयर केली होती. त्याचप्रमाणे आता नायराची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवांगी जोशी हिने सुद्धा मालिका सोडली आहे. त्यांनी जाता- जाता शेवटी आपल्या आयुष्याविषयी काही गोष्टी शेयर केल्या आहेत.
शेवटचे गुङ बाय : अभिनेत्री शिवांगी जोशी हिने “ये रिश्ता क्या कहलाता है” या मालिकेत “नायरा” आणि “सिरत” अशा दोन भूमिका साकारल्या. तर आता ही मालिका अगदी शेवटच्या वळणावर आहे. तर ती सुद्धा आता उदास आहे. त्याचसोबत मालिकेतील इतर अन्य कलाकार देखील निराश आहेत.
मीङियाशी बोलताना अभिनेत्री शिवांगी जोशी हिने सांगितले की,”ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नायरा आणि सिरत या दोन्ही भूमिका साकारताना मला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम आणि आशिर्वाद मिळाले. त्यासाठी मी सर्वांची मनापासून आभारी आहे.”
खूप झाली इमोशनल : शिवांगी जोशी हिने इमोशनल होत शो चे ङायरेक्टर राजन शाही, स्टार प्लस आणि आपले को स्टार्स यांचे आभार सुद्धा व्यक्त केले. त्याचसोबत शिवांगी ने हे सुद्धा सांगितले की,”सर्वांनी मला खूप सुंदर आठवणींचे क्षण दिले आहेत.
यापेक्षा जास्त मी काहीच मागू शकत नाही.” तर याआधी मोहसीन खान ने सुद्धा आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मालिकेतील शेवटच्या सीनचे फोटोज् शेयर केले होते आणि ह्या मालिकेला भावुक होऊन अलविदा म्हटले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.