शितलीच्या ‘लग्नाची पिपाणी’, वाजणार लवकरच, शिवानी बावकर सोशल मीडियावर पुन्हा आलीय चर्चेत…

‘लागीर झालं जी’ मालिकेमधील शितलीच्या भूमिकेतून घराघरात आणि रसिकांच्या मनामनांत पोहोचलेली शिवानी बावकर हिने मोठ्या खुबीने तिची ही भूमिका साकारली होती. या मालिकेमधील तिचा हटके असा देसीगर्लचा अंदाज मराठी रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. शिवानी ही कायमच सोशल मीडियावर एक्टिव्ह असते.

तिच्या पोस्ट केलेल्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती सदैव चर्चेत असते. नुकतेच तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट केली आहे. ज्यामुळे ती सध्या फारच चर्चेत आली आहे. या पोस्ट मध्ये ती म्हणतेय की, लवकरच तिची लग्नाची पिपाणी वाजणार आहे.

आतापर्यंत मीडियावर लग्नाची अनेक गाणी आली, त्यातली काही तुफान गाजली सुद्धा. आता त्यात आणखी एका नव्या गाण्याची भर पडणार आहे. मधुर मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या “लग्नाची पिपाणी” या नव्या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ लवकरच सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होत आहे. सचिन कांबळे आणि शिवानी बावकर ही नवी जोडी या गाण्यात रसिक प्रेक्षकांना दिसणार आहे.

READ  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुग्धा गोडसेने लग्नाच्या २ वर्षानंतर पतीबद्दल केला मोठा खुलासा, ऐकून थक्क व्हाल!

या म्युझिक व्हिडिओची निर्मिती सुधाकर फाळके आणि प्रकाश फाळके यांनी केली आहे. तर म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन प्रकाश फाळके यांचं आहे.  दिनकर खाडे यांचं गीत मधुर मिलिंद शिंदे यांनी संगीतबद्ध करून गायलं आहे. सचिन कांबळे यांनी नृत्य दिग्दर्शन, सुनीत गुरव यांनी छायांकन केलं आहे.

अलिबाग , जुन्नर या ठिकाणी हा म्युझिक व्हिडिओ चित्रीत करण्यात आला आहे.  अतिशय फ्रेश असे हे गाणे, उत्तम छायांकन प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीला उतरेल आणि लग्नाच्या सीझनमध्ये प्रत्येक लग्नात ही “लग्नाची पिपाणी” वाजेल यात शं’का नाही, असे या म्युझिक अल्बमच्या कलाकारांना आणि निर्मात्यांना वाटत आहे.

या आधी सुद्धा लागिरं झालं जी या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेले शीतली आणि अज्या म्हणजेच शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. लागिरं झालं जीने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले.

READ  'हे मन बावरे' या लोकप्रिय मालिकेतील या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं दुसऱ्यांदा लग्न, पहा लग्नाचे फोटो...

139983007 270437141172645 5519496975242336144 n 202103572654

या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेले शीतली आणि अज्या म्हणजेच शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण ही जोडी एका गाण्यातून रसिकांच्या भेटीला आली होती. ‘एव्ही प्रॉडक्शन’प्रस्तुत ‘चाहूल’ गाणं नक्कीच प्रेमाची चाहूल लावणारे आहे. ‘एव्ही प्रॉडक्शन’ आणि ‘मराठी म्युझिक टाऊन’प्रस्तुत मंगल पी, अभिजित आणि विश्वजित निर्मित तर दिग्दर्शक ओंकार माने दिग्दर्शित या सुमधुर संगीताला दिलेली नृत्याची जोड अगदी प्रसन्न करून सोडणारी आहे. शिवानी आणि नितीशची सुप्रसिद्ध जोडी पुन्हा एकदा ‘चाहूल’ या गाण्यातून सर्व प्रेमीयुगुलांसाठी एक पर्वणीच ठरली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  'माझा होशील ना' मध्ये डेडली व्हिलन "जेडी" ची एन्ट्री, प्रथमच या रुपात दिसणार हा सुप्रसिद्ध मराठी अभिनेता...

Leave a Comment