महाविकास आघाडी सरकारमध्ये विष कालवण्याचं काम करू नका, शिवसेनेचा राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याला सल्ला

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते सरकारमध्ये सगळं ठीक असल्याची वल्गना करतात. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्षांतील इतर नेते एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त दिसतात. यामुळे राज्य सरकारमध्ये सर्व काही ठीक नाही असं चित्र निर्माण होत आहे.

यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात शेरेबाजी केली आहे. नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक विवादास्पद वक्तव्य केलं होतं. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी कोल्हे यांच्या विधानाला उत्तर देत म्हटले की, अमोल कोल्हे यांनी  महाविकास आघाडी सरकारमध्ये विष कालवण्याचे काम व सत्तेचे जे अंगूर मिळाले आहे त्यात आंबटपणा आणण्याचा प्रयत्न करू नये.

See also  पुण्यातील या 2 डॉक्टरनी असे काही केले ते वाचून तुम्ही त्यांचे कौतुक कराल. रुग्णांसाठी साक्षात देवदूत्त ठरले हे डॉक्टर

नेमकं काय म्हणाले होते अमोल कोल्हे?

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद आहे. असे रोकठोक वक्तव्य त्यांनी केलं होतं. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली आहे. अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. त्यांनी हाच तो शिवसेनेतून मोठा झालेला लबाड कोल्हा आहे म्हणत अमोल कोल्हे यांचा समाचार घेतला.  ते म्हणाले, “कोल्हेंनी स्वताची लायकी पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा शिवसेनेतूनच मोठा झाला आणि आता त्याच शिवसेनेवरच बोलायचे हा माणसातील गुणधर्म आहे का?”

काय म्हणाले किशोर कान्हेरे?

खासदार कोल्हे यांच्या विधानाला उत्तर देताना किशोर कान्हेरे म्हणाले की, “अमोल कोल्हे यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, खुद्द शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सरकार चालवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा सल्ला घेत आहेत.” यासोबतच त्यांनी अमोल कोल्हे यांची मेमरी टेस्ट करायची गरज असल्याचा टोमणा मारला. कोल्हे अभिनेते आहेत आणि त्यांना लिहून दिलेले डायलॉग मारण्याची सवय आहे. अमोल कोल्हे बहुदा विसरले आहेत की ते स्वतः उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादानेच राजकरणात आले आहेत.

See also  आमिर खान आणि किरण राव यांच्याप्रमाणेच शिवसेना-भाजपची मैत्री कायम राहील – संजय राऊत

 

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment