नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद, जाणून घ्या शिवसेनेची प्रतिक्रिया

Advertisement

मुंबई: काल संध्याकाळी (7 जूलै) मोदी सरकारचा बहुप्रतीक्षित असलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल सोहळा पार पडला. यात अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू मिळाला तसेच अनेक नवीन चेहर्‍यांना संधी मिळाली.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोकणातील ज्येष्ठ भाजप नेते नारायण राणे यांनाही केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य तसेच देशभरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Advertisement

राणे यांच्या मंत्रिपदावर शिवसेनेनेही प्रतिक्रिया दिली आहे. राणेंना जे पद मिळालं आहे त्यापेक्षा त्यांची ऊंची मोठी आहे. तरीही आम्ही राणेंना शुभेच्छा देतो. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

See also  बदलण्यात आले 8 राज्यांचे राज्यपाल, ‘अशी’ आहे नवीन राज्यपालांची यादी

प्रकाश जावडेकर यांचे मंत्रिपद गेल्याबाबतही दिली प्रतिक्रिया

Advertisement

माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की, “देशाची परिस्थिती सध्या वाईट आहे. बेरोजगारी, महागाई, आरोग्य या सगळ्या संदर्भात महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर जबाबदारी आली आहे. मोदींनी मंत्रिपदाबाबत घेतलेले निर्णय बरोबर आहेत. मात्र, प्रकाश जावडेकर सारखा मोहरा पडला. ते अनुभवी आणि ज्येष्ठ नेते होते. नारायण राणेंना मंत्रिपद दिलं. त्यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खातं देण्यात आलं. राणेंची ऊंची त्या खात्यापेक्षा मोठी आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते, तसेच अनेक मोठी पदे त्यांनी सांभाळली आहेत. त्यांच्यापुढे आता रोजगार वाढवण्याचे आव्हान आहे.”

संजय राऊत हे चिमटे काढण्यात उस्ताद आहेत. याचा आज पुन्हा प्रत्यय आला. ते म्हणाले, “खरंतर भाजपने शिवसेना-राष्ट्रवादीचे आभार मानायला हवेत. आमच्याकडून जो पुरवठा झाला आहे त्यामुळेच त्यांना मंत्रिपदासाठी चेहरे मिळाले आहेत. कपिल पाटील राष्ट्रवादीचे होते. भारती पवारही राष्ट्रवादीच्या होत्या. तसेच नारायण राणे शिवसेना-कॉंग्रेस करत भाजपमध्ये गेलेले आहेत. यामुळे मंत्रिपदाचा मूळ चेहरा हा शिवसेना-राष्ट्रवादीचाच आहे.”

See also  आमिर खान आणि किरण राव यांच्याप्रमाणेच शिवसेना-भाजपची मैत्री कायम राहील – संजय राऊत
Advertisement

Leave a Comment

close