धक्कादायक! तारक मेहता मधील भिडे मास्तर यांचे निधन? जाणून घ्या व्हायरल बातमीचे सत्य

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो टीव्ही जगतात अनेकदा काही शो वर्षानुवर्षे चालतात, या शो चे अनेक लोक मोठे चाहते असतात शिवाय यातील सर्व कलाकार सुद्धा सर्वांचे लाडके असतात. अशीच एक मालिका “तारक मेहता..” नेहमी काही न काही कारणाने चर्चेत येत असते. गेली कित्येक वर्ष झाली ही मालिका लोकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे, मालिकेतील प्रत्येक पात्र विशेष गाजले आहे. त्यामुळे मालिका टॉप मोस्टच्या यादीत कधीपासून उभी आहे, यातील प्रत्येक सिन लक्षवेधी असतो. प्रत्येक वेळी यातून काहीतरी शिकायला मिळते त्यामुळे लहान मुले तर पाहतातच पण घरातील मोठ्यांना देखील ही मालिका खूप आवडते.

मित्रहो ही मालिका सोशल मीडियावर नेहमी चर्चेत येत असते, यातून अनेक कलाकार आपल्या प्रोफेशनल लाईफ सोबतच पर्सनल लाईफ साठी सुद्धा चर्चेत येतात. हल्ली नुकताच एक पोस्ट सर्वाना थक्क करत आहे, या पोस्ट द्वारे मालिकेतील भिडे गुरुजी लक्ष वेधून घेत आहेत. हे पात्र अभिनेते मंदार चंदवादकर यांनी साकारले आहे. आत्माराम तुकाराम भिडे हे नाव “तारक मेहता….” शोमधील प्रसिद्ध नाव आहे. ही भूमिका प्रचंड लोकप्रिय असून प्रत्येक वेळी प्रत्येक वयातील माणसाला शाळेची आठवणं करून देणारी आहे.

See also  बिग बॉस मधील सर्वात महागडी कंटेस्टेंट आहे 'राधे मां', एक एपिसोडसाठी घेते तब्बल इतके लाख रुपये फीस...

या भूमिकेतून मंदार खूप प्रसिद्ध झाले आहेत, त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना अनेकजण सहज ओळखतात. नुकताच त्यांचा बद्दल कोणीतरी वाईट बातमी पसरवली आहे. त्यांचे निधन झाले असल्याची माहिती सर्वत्र व्हायरल होत आहे, त्यांचे सर्व चाहते त्यामुळे खूप नाराज झाले आहेत. या व्हायरल होणाऱ्या पोस्टवर अनेकजण रागाने कमेन्ट करत आहेत कारण एखाद्या व्यक्तीबद्दल खोटी बातमी पसरवणे चुकीचे आहे. असे कोणीही कोणाच्याही बाबतीत अजिबात करू नये. त्यामुळे मोठा गैरसमज वाढतो, लोकांच्यात चर्चेला उधाण येत राहते.

स्वतः अभिनेते मंदार यांनी एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे, ते यामध्ये म्हणतात की “ज्याने कोणी हे काम केले आहे, त्याला माझी पुन्हा विनंती आहे की त्याने परत असे काही काम करू नये. देव त्या माणसाला सद्बुद्धी देवो, तसेच ‘तारक मेहता…’शोमधील सर्व कलाकार ठीक आहेत, स्वस्थ आहेत, खुश आहेत. आम्ही लोक भविष्यात आणखीन चांगले काम करण्याच्या योजना तयार करत आहोत. गेली अनेक वर्षे आम्ही तुमचे मनोरंजन करत आहोत, तुम्हाला सर्वाना विंनंती आहे की अशा अफवा कृपया पसरवू नये.”

See also  'बिग बॉस' फेम ही लोकप्रिय अभिनेत्री राखी सावंत करतेय दुसऱ्यांदा लग्न, त्यामागील कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

अनेकांनी त्यांची ही पोस्ट पाहिली आहे, यावर त्यांच्या सर्व चाहत्यांनी देखील कमेन्ट केली आहे. भिडे गुरुजी हे पात्र खूप लोकप्रिय आहे, त्यामुळे ही पासरलेली अफवा धक्कादायकच होती. अनेकांना सुरुवातीला हे खरंच वाटलेलं पण नंतर त्यांनी व्हिडीओ बनवून सर्वांच्या शंका निरसन केल्या. आजवर मंदार यांनी सर्वांचे खूप मनोरंजन केले आहे, एक कलाकार या नात्याने त्यांनी अनेक भूमिका मनापासून साकारल्या आहेत.त्यामुळे त्यांना आणखी अनेक भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. त्यांना नेहमी अशी लोकप्रियता आणि उदंड आयुष्य मिळत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा, जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

See also  सिंगर नेहा कक्करचा नवऱ्यासोबतचा कि'सिं'ग व्हिडीओ प्रचंड व्हायरल, पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment