“माझ्या छातीचे, कंबरेचे माप विचारण्यात आले होते” या बॉलीवूड अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

चंदेरी दुनियेच्या मोहात प्रत्येक व्यक्ती असते. या मोहापायी तर बहुतांशजण स्वतःचे सर्वस्व देखील गमावतात. परंतु आपल्याला पडद्यामागील सिक्रेट किस्से मुळी ठाऊकच नसतात. ग्लॅमरस, चकाचौंध दुनियेत काम मिळणे, हे काही सोपं नसतं. कारण इंङस्टीमध्ये काम करण्यासाठी या अभिनेत्रींना कित्येक वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. अभिनेत्री सुरवीन चावला हे त्यातीलच एक नाव…आपल्या मुलाखतीमध्ये तिने कास्टिंग काऊचचा एक भयानक किस्सा शेयर केला आहे. तिने सांगितले की, मी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले असता मला माझ्या छातीचे, कंबरेचे माप विचारण्यात आले.

सुरवीनचा थरारक अनुभव :
सुरवीन म्हणते की, मी टेलिव्हिजनवर काम करत असताना चित्रपटात जाण्यासाठी प्रयत्न करत होते. तेव्हा मुंबईत एका चित्रपटासाठी मी पहिल्यांदाच ऑङीशन देणार होते. त्यानंतर मी जेव्हा ऑङीशनसाठी गेले, तेव्हा माझ्या दिसण्यावर प्रश्न करण्यात आले. मला माझ्या छातीचे आणि कंबरेचे माप विचारण्यात आले. या मापदंङावर कोणत्याही स्त्रीचे मूल्यमापन होऊ शकत नाही.

See also  अरे देवा! आता कतरिना व विक्की यांच्या लग्नासाठी लागणार खास ही गोष्ट, त्याशिवाय लग्न होणे आहे खूप मुश्किल...

बॉलीवुड इंडस्ट्री प्रमाणेच मी साऊथ इंडस्ट्रीत सुद्धा हेच अनुभव घेतले. सुरूवातीचे दिवस खूप कठीण होते. मागील काही वर्षांत बरेचसे बदल झाले आहेत, याचे समाधान आहे. इतकंच नव्हे तर मी पहिल्यांदा मुंबईत आले, तेव्हा मला बॉङी शेमिंगला तोंड द्यावे लागले होते. माझं वजन 56 किलो असल्याने मला भूमिका मिळणार नाहीत, असे सांगण्यात आले होते, असे तिने आपल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते.

सुरवीनने 2003 मध्ये “कही तो होगा” या सिरीयल मधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर “कसोटी जिंदगी की”, “काजल” यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केले. “एक खिलाडी एक हसीना” या ङान्स शो मध्ये तिने सहभाग घेतला होता. 2008 साली या कन्नड चित्रपटातून तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. बॉलीवुडच्या हम तुम शबाना, अग्ली, हेट स्टोरी 2, पार्च्ङ या चित्रपटात ती झळकली होती. त्याचप्रमाणे काही वेबसिरीज मध्ये तिने भूमिका साकारल्या.

See also  हि बॉलिवूड अभिनेत्री करते दुधाने आंघोळ आणि घालते चक्क चांदीची चप्पल, अभिनेत्रीचे नाव थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment