बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच अडकणार लग्नबंधनात, होणाऱ्या पतीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

श्रद्धा कपूर म्हणजे आजच्या तरूणाईच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक उत्तम अभिनेत्री. तिच्या अभिनयाने तिने आजवर अनेक चांगल्या सिनेमांमधून आपल्या प्रेक्षकांच मनोरंजन निश्चितप्रकारे केलं आहेच. शिवाय अनेकदा वडील शक्ती कपूर यांच्यामुळेही ती चर्चेचा विषय बनून रहायची.

परंतु श्रद्धाची खास बात म्हणजे तिला काही ठराविक चांगल्या गोष्टींची मनापासून जाणिव आहे. ते तिच्या अनेक विविध कार्यक्रमांच्या पडद्यावर असताना वागण्यातून, बोलण्यातून दिसून येतचं. श्रद्धाने “आशिकी २” या जुन्या आशिकीच्या पार्श्वभूमीवर आधारित सिनेमातून आपलं सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

आणि त्यानंतर डान्स, रोमॅन्टिक सिन्स व इतर भुमिका साकारत प्रेक्षकांवर स्वत:ची वेगळी अशी छाप पाडली. नुकतचं लग्न पार पडलेला वरून धवन याने श्रद्धा व रोहन श्रेष्ठ यांच्याबद्दल थोडीशी हिंट दिली होती.

मुळात आता त्याच रोहन श्रेष्ठ नावाच्या व्यक्तीसोबत श्रद्धा कपूर लग्नात अडकल्या जाण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगत आहे. परंतु अशातच नेमकं श्रद्धा कपूरचे वडील व ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांची या प्रकरणावर एक प्रतिक्रियाही समोर येत आहे.

शक्ती कपूर यांच्याबाबत सांगायला गोष्टी नक्कीच कमी पडतील. एक काळ सबंध बाॅलीवुड त्यांनी त्यांच्या व्हिलन अर्थात नकारात्मक भुमिकांनी गाजवून सोडलं होतं. शक्ती कपूर म्हणाले की, माझ्या मुलीच्या कोणत्याही निर्णयामागे मी खंबीरपणे उभा राहीन. रोहन श्रेष्ठचं का?

किंवा तो जरी असला तरी काही हरकत नाही अथवा इतर कोणाचीही निवड जरी श्रद्धाने तिच्याकरता केली तरी मी तिचा बाप म्हणून खंबीरपणे तिच्या पाठीशी ऊभा राहिन, अशी सकारात्मक व ठाम प्रतिक्रिया शक्ती कपूर यांनी श्रद्धाच्या लग्नाबद्दल दिली आहे.

शक्ती कपूर यांनी पुढे अजून एक महत्वाची बाब सांगितली ती म्हणजे ते म्हणाले की, रोहन एक चांगला मुलगा आहे. मी त्याला लहानपणापासून ओळखतो. रोहन आणि श्रद्धा हे दोघेही लहानपणीने मित्र आहेत, रोहन आजही अनेकदा आमच्या घरी येत असतो.

परंतु श्रद्धाने ती त्याच्याबद्दल काय विचार करते आहे हे अजून मलातरी स्पष्ट नाही सांगितले. श्रद्धा किंवा रोहन एकमेकांबाबच खरचं कितपत गंभिर आहेत याची मला अजूनतरी खबरबात नाही.

रोहन श्रेष्ठ याचे वडील राकेश हे शक्ती कपूर यांचे चांगले मित्र आहेत. राकेश हे एक फोटोग्राफर म्हणून इंडस्ट्रीमधे वा’व’र’ले आहेत. शक्ती कपूर व राकेश यांचे घनिष्ठ संबंध आहेत. ते दोघे अनेकदा हाॅटेलमधे सोबतच जेवण, गप्पा वगैरे करायचे.

राकेश माझा चांगला मित्र आहे, असंही शक्ती कपूर यांनी रोहनचा विषय निघाल्यावर स्पष्टपणे सांगितलं. श्रद्धा कपूर मात्र यावर अजून स्पष्टपणे काहीच बोलली नसली तरी तिच्या चाहत्यांना मात्र तिच्या लग्नाबाबतच्या निर्णयाची अत्यंत उत्सुकता मनात लागून राहिली असेल हे निश्चित आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment