आपल्या राशीनुसार कसे व कोणत्या स्वरूपात श्रीगणेश पूजन ठरते शुभ फलदायी? गणेशरूप, मंत्र, प्रसाद आणि उपाय सर्व जाणून घ्या.

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

.

श्रीगणेशाची उपासना केल्यास आरोग्य, आर्थिक, वैयक्तिक, नोकरी, व्यवसायिक, प्रापंचिक इत्यादींशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण होते. विघ्नहर्ता श्री गणेश शुभ संकल्पांची प्रारंभिक देवता आहे. शास्त्रातील नियमांनुसार आणि आपल्या राशीनुसार श्रीगणेशाची पूजाअर्चना कशी करावी?

मेष: या राशीच्या भक्तांनी ‘वक्रतुंड’ या स्वरूपातील श्रीगणेशाचे पूजन करावे. आणि दररोज ‘गं’ किंवा ‘ॐ वक्रतुंडाय हुं’ हा मंत्र जाप करावा. गूळचा नैवद्य अर्पण करावा. याने सर्व समस्या निवारण करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.
उपाय : मेष राशीचे इष्टदेव म्हणजे श्रीगणेश आणि मारुतीराया. मंगळवारी मारुती मंदीरात देवाला प्रसाद दाखवून संपूर्ण प्रसाद मंदिरातच वाटावा.

वृषभ: वृषभ राशीच्या भक्तांनी श्रीगणेशाच्या ‘शक्ती विनायक’ स्वरूपाचे पूजन करून आणि त्यांनी दररोज ‘गं’ किंवा ‘ॐ हीं ग्रीं हीं’ या मंत्राचा जाप करावा आणि शुद्ध तुप व खडीसाखरेचा प्रसाद दाखवावा. सर्व समस्यांचे निराकरण नक्कीच होईल.
उपाय : श्रीगणेश वा मारुती मंदिरात मंगळवारी द्वीमुखी शुद्ध तूपाचा दिवा लावा. आर्थिक समस्या भेडसावत असल्यास कपाळावर केशराचा तिलक लावा.

मिथुन: मिथुन राशीच्या भाविकांनी श्री गणेशाच्या ‘लक्ष्मी गणेश’ स्वरूपाचे मनोभावे पूजन करावे. प्रसादासाठी मूगाचे लाडू करावेत आणि रोज ‘श्रीगणेशाय नमः’ किंवा ‘ॐ गण गणपतये नमः’ हा मंत्र जपवा.
उपाय: श्रीगणेश मंदिरात बुधवारी लाडू अर्पण करा. गरजवंताला काळी घोंगडी दान करा. सर्व कामे मनासारखे सुरळीत होतील.

See also  या 6 राशी ने स्वप्नात देखील पाहिला नसेल एवढा पैसा मिळणार श्री स्वामी समर्थ करणार कृपा...

कर्क : कर्क राशीच्या भाविकांनी ‘वक्रतुंड’ स्वरुपातील श्रीगणेशाचे पूजन करावे आणि ‘ॐ वरदाय नमः’ किंवा ‘ओम वक्रतुंडाय हूं’ मंत्राचा एक माळ जप करावा. पूजेच्या वेळी श्रीगणेशाला सफेद चंदनासह सफेद फुले वाहा.
उपाय: चंदनचा तिलक दररोज लावा. जेष्ठांचा आणि वृद्धांचा सन्मान करा.

सिंह: सिंह राशीच्या भक्तांनी ‘लक्ष्मी गणेश’ स्वरूपातील श्रीगणेशाचे पूजन करुन लाल फुले अर्पण करावी. प्रसाद म्हणून मोतीचूर लाडूं अर्पण करावे. ‘ॐ सुमंगालय नमः’ या मंत्राचा जाप केल्यास सर्व समस्या निवारण होईल.
उपाय : नेहमी एक लाल रुमाल जवळ ठेवा त्यामुळे भाग्योदय होईल. श्रीगणेश मंदिरात जाऊन गणेशाला मनुका अर्पण कराव्या.

कन्या : कन्या राशीच्या भक्तांनी श्रीगणेशाच्या ‘लक्ष्मी गणेश’ स्वरुपाचे पूजन करावे. श्रीगणेशास २१ जुड्या दुर्वा अर्पण करून ‘ॐ चिंतामणीये नम:’ या मंत्राचा जप करावा. सर्व चिंता हरतील.
उपाय : नियमित श्रीगणेशाचे पूजन करावे. भाग्योदयासाठी कायमस्वरूपी तुळशीची माळ धारण करावी. घरात कधी श्वान पाळू नका.

See also  या 7 राशींना म्हाळसकांत श्री खंडोबाराया देणार सुखाचे वरदान, जीवन होणार सुखकर चिंता होणार दूर...

तुळ: तूळ राशीच्या भाविकांनी ‘वक्रतुंड’ या स्वरूपातील श्रीगणेशाचे पूजन करावे. पूजेच्या वेळी श्रीगणेशाला ५ नारळ अर्पण करावे. त्यानंतर ‘ॐ वक्रतुंडय नमः’ या मंत्राचा जप करावा. सर्व समस्या निवारण होईल.
उपाय: धाकट्या भावंडांना मदत करा. कोणत्याही शुभ दिवशी सकाळी ११ वाजण्यापूर्वी श्रीगणेशाच्या मंदिरात शुद्ध तुपाचा दिवा लावा.

वृश्चिक : वृश्चिक ही मंगळाची राशी, म्हणून या राशीच्या भाविकांनी ‘श्वेतार्क गणेश’ स्वरुपातील श्रीगणेशाचे पूजन करावे. देवाला कुंकू आणि लाल फुले वाहावी. ‘ॐ नमो भगवते गजाननाय’ मंत्राची जपमाळ ओढवी. जीवनात संकट येणार नाही.
उपाय : केळीच्या झाडाचे पूजन करून पाणी घाला. कोणतेही व्यसन टाळा.

धनु : धनु राशीच्या भाविकांनी ‘लक्ष्मी गणेश ‘ या स्वरुपातील श्री गणेशाचे पुजन करावे. ‘ॐ गं गणपतये नमः’ हा मंत्र जाप करावा. धनु गुरुची राशी म्हणून श्रीगणेशाला पिवळी फुले वाहा. बेसनाच्या लाडूंचा प्रसाद द्या. समस्या निराकरण होऊन इच्छा पूर्ण होईल.
उपाय : शांतता आणि समृद्धीसाठी घरातील केरकचरा,जाळी जळमटे स्वच्छ करा. पिवळ्या वस्त्राच्या आसनावर श्रीगणेशाला ईशान्य दिशेस स्थापित करून गुरुवारी शुद्ध तूपाचा दिवा लावा.

See also  सूर्यदेव प्रसन्न होऊन या ५ भाग्यवान राशींचे बदलणार नशीब, आर्थिक समस्यांमधून मुक्ती आणि होणार लवकरच श्रीमंत...

मकर : ‘मकर राशीच्या भाविकांनी ‘शक्ती विनायक’ स्वरुपातील श्रीगणेशाची पूजा करा. पूजेच्या वेळी श्रीगणेशाला पान, सुपारी, वेलची आणि लवंगा अर्पण करा आणि ‘ॐ गं नमः’ मंत्राचा रोज एक माळ जाप करा .
उपाय : गुरुवारी गणेश, लक्ष्मी किंवा विष्णू मंदिरात पिवळी फुले वाहा. लाल वळूला गोड पोळी खाऊ घाला.

कुंभ: कुंभ राशीच्या भक्तांनी देखील ‘शक्ती विनायक’ गणेशाचेच पूजन केले पाहिजे आणि दररोज ‘ ॐ गण मुक्तये फट’ या मंत्राचा एक माळ जाप करावा. सर्व प्रकारचे त्रास दूर होतील.
कुंभ : आपल्या हातून याचक भुकेला माघारी जाऊ नये याची काळजी घ्या. जेवतांना कधीही वरून मीठ घेऊ नका. मंगळवार, गुरुवार किंवा रविवारी उपवास करा.

मीन: मीन राशीच्या लोकांनी ‘हरिद्रा गणेश’ ची पूजा करावी. ‘ॐ गण गणपतये नमः’ किंवा ‘ॐ अंतरीक्षाय स्वाहा:’ या मंत्राचा प्रतिदिन जप करावा. श्रीगणेशाला मध व केशर अर्पण करा.
उपाय: श्रीगणेश मंदिरात पाणपोई साठी पैसे दान करा. पिंपळाच्या झाडाच्या मुळाला पाणी घाला. कधीही खोटे बोलू नका.

विघ्नहर्ता श्री वरदविनायक सर्व भाविकांचे कल्याण करो. शुभं भवतु:…!

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment