शास्त्रानुसार प्राण प्रतिष्ठापणेसाठी श्री गणेशमूर्ती कशी असावी? विधी, पूजन करताना कोणत्या गोष्टी कराव्या आणि टाळाव्या, जाणून घ्या सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

श्री गणेशमूर्ती ही एक फुटापेक्षा मोठी नसावी. श्री गणेश मूर्ती एका व्यक्तीला अगदी सहजतेने उचलून घेता यावी.

सिंहासनावर विराजमान असलेली अथवा किंवा लोडाला टेकून विश्राम करत असलेली श्री गणेशाची मूर्ती सर्वोत्तम मानण्यात येते. चित्रविचित्र आकारातील अथवा इतर कोणत्याही देवदेवता अथवा प्रसिद्ध व्यक्तिरेखेच्या अथवा पशुपक्षांच्या स्वरुपातील श्रीगणेशमूर्ती मुळीच घेऊ नयेत.

धर्मशास्त्रानुसार शिव-पार्वतीच्या मांडीवर बसलेल्या बाल श्रीगणेशाची मूर्ती घेणे टाळावे. कारण शास्त्रात शिव-पार्वतीचे पूजन हे लिंग स्वरूपातच केले जाते. काहीजण श्री गणेश मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणतात. असे मुळीच करू नये.

श्री गणेशाची मनोभावे पूजा करून विधिवत प्राणप्रतिष्ठापना करावी, तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही. असते ती केवळ माती अशी शास्त्रात मान्यता आहे.

श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होण्यापूर्वी चुकून अनावधानाने मूर्ती तुटल्यास अथवा भंगल्यास मनांत कुठल्याही प्रकारची शंका व अनाठायी भीती न बाळगता त्या मूर्तीस दही-भाताचा नैवेद्य दाखवून मनोभावे क्षमा मागून लगोलग विसर्जन करावे व दुसरी श्री गणेशमूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना करावी.

See also  मोबाईल पॅन्टच्या खिशात ठेवल्याने शरीराचे होते खूप मोठे नुकसान, जाणून घ्या सविस्तर!

घरात वा कौटुंबिक परिवारात कुणाचे निधन होऊन सुतक पडल्यास अशावेळी लगेच श्री गणेश मूर्ती विसर्जन करण्याची घाई न करता शेजारी, मित्रमंडळी यांच्याकडून पूजा करून नैवेद्य दाखवून घ्यावा.

घरामध्ये श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर या पवित्र काळात घरात भांडणे तसेच मद्यपान, मांसाहार इ. अजिबात करू नये.

श्री गणेशाची आरती करून दररोज नैवैद्य दाखवावा. साधा आपला पोळी-भाजीचा नैवैद्य असला तरी चालतो, फक्त फार आंबट व तिखट पदार्थ नसावेत, दही-साखर-भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे.

श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करतांना मंगलगाणी, श्री गणेशाची भक्ती व महिमा कथन करणारी गाणी म्हणत या परमेश्वराला भावपूर्ण निरोप द्यावा. वेडेवाकडे नृत्य आणि सवंग गाणी वाजवून विकृत चाळे करू नयेत.

या व्यतिरिक्त सुद्धा इतर कोणत्याही शुभ, मंगल प्रसंगी आपल्या वास्तूत श्री गणेशाची मूर्ती, चित्र, प्रतिमा इ. ठेवायचे असेल तर त्याला सुद्धा काही नियम आहेत.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सिद्धार्थ शुक्ला करणार होता लग्न, परंतु अखेर त्याचे स्वप्न अधूरेच राहिले...

श्री गणेश अनेक रुपात सर्व दिशांमध्ये आपली सुरक्षा करतात. नियमित श्री गणेशाची आराधना केल्याने वास्तूमधील वास्तुदोष कमी होण्यास निश्चितच मदत होते. कारण मुळात शास्त्रानुसार ब्रह्मदेवाने वास्तुपुरुषाच्या प्रार्थनेनुसार वास्तुशास्त्राचे नियम रचले होते. मंगलमूर्ती श्री गणेशाच्या वास्तव्याशिवाय साक्षात वास्तुपुरुषाचे वरदान प्राप्त करणे शक्य नाही. म्हणूनच…

वास्तूच्या ज्या भागात वास्तू दोष सांगितला असेल, त्या जागी तूप आणि कुंकू अथवा शेंदूराद्वारे भिंतीवर स्वस्तिक चिन्ह काढल्याने वास्तू दोषाचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते.

वास्तू, ऑफिस अथवा व्यवसाय स्थळाच्या कोणत्याही भागात श्री गणेशाची प्रतिमा किंवा चित्र आपण लावू शकतो. काळजी फक्त एवढीच घेणे की, त्या प्रतिमा अथवा चित्राचे तोंड कधीही दक्षिण किंवा नैऋत्य दिशेस नसावे.

वास्तूमध्ये बैठे श्री गणेशाचे चित्र वा प्रतिमा आणि कामाच्या ठिकाणी उभे असलेल्या श्री गणेशाचे चित्र वा प्रतिमा लावावी. वास्तूत अथवा कार्यात स्थिरता येऊन सर्व मंगल व शुभ व्हावे यासाठी लावलेल्या श्री गणेशाचे दोन्ही पाय भूमीला स्पर्श करत असावेत.

See also  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ लंडनमध्ये जगते खूपच साधे जीवन, कारण ऐकून थक्क व्हाल!

वास्तूच्या मध्य भागी म्हणजेच केंद्र अथवा ब्रह्मस्थानी, त्याच प्रमाणे ईशान्य कोप-यात आणि पूर्व दिशेस सुद्धा श्री गणेशाची प्रतिमा किंवा चित्र लावणे शुभ असल्याचे मानले जाते. असते. पण, ज्या ठिकाणी त्या मूर्ती अथवा चित्राचे पावित्र्य भंग होईल अशा अस्थानी श्री गणेशाचे चित्र वा प्रतिमा लावणे कायमच टाळावे.

सुख, शांती, समृद्धीची प्राप्ती करण्यासाठी शुभ्र म्हणजेच पांढऱ्या रंगाच्या श्री गणेशाची मूर्ती किंवा चित्र लावावे आणि सकल मनोकामना पुर्ती होण्यासाठी शेंदरी म्हणजेच केसरी रंगाच्या श्री गणेशाची मूर्ती अथवा चित्र लावावे.

शास्त्रानुसार जितके अधिक नियम व पावित्र्य पाळून आपण मनोभावे श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा करु, तितके तो विघ्नहर्ता सुखकर्ता मंगलमूर्ती आपल्याला शुभ फलदायी ठरेल हे नक्की. बोला गणपती बाप्पा मोरया… शुभं भवतु:!

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment