श्री गणेशाला निरोप देताना मनोभावे म्हणा फक्त हे २ मंत्र, बाप्पा भरभरून इतकं सुख देतील की जन्मभर पुरेल…
.
यंदा दि. १ सप्टेंबर २०२० रोजी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. गणपती बाप्पाला ला गणेश चतुर्थीला घरी आणले जाते आणि ११ दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीला वाजत-गाजत आणि श्रद्धेने श्रीगणेशाला निरोप दिला जातो. चला गणेश विसर्जनाची पद्धत जाणून घेऊया.
गणेश विसर्जनाची पद्धत:
- पूजा करण्यापूर्वी आंघोळ करून नवीन किंवा धुतलेले कपडे परिधान करावेत. नंतर कपाळावर टिळा लावून आसनावर बसून पूजा करावी.
- पूर्व दिशेला तोंड करून पूजा करावी.
- दिव्यात तूप घालून कापसाची वात लावा.
- दिवा तांदुळ किंवा फुलाच्या अंथरूणावर मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवा.
- श्री गणेशाला पहिल्यांदा पाण्याने, नंतर पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घाला.
.
- श्रीगणेशाला नमस्कार करून वस्त्र अर्पण करा.
- गंध, शेंदूर, दुर्वांकूर, फुले किंवा फुलमाळा इत्यादीने पूजा करा.
- अगरबत्ती लावून देवापुढे ओवाळा.
- नैवैद्य अर्पण करा. श्रीगणपतीला मोदक सर्वांत जास्त आवडतात. विविध प्रकारचे मोदक, मिठाई, फळांमध्ये केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करावेत
- एक श्रीफळ किंवा रोख दक्षिणा इष्ट देवाला अर्पण करा.
.
- कापराच्या एक किंवा तीन वड्या प्रज्वलित करून आरती करा.
- हातात फुले किंवा फुलांच्या पाकळ्या घ्या आणि देवाच्या चरणी अर्पण करा.
- श्री गणेशाला एक प्रदक्षिणा पूर्ण करा. गणपतीला एकच प्रदक्षिणा घालतात जाते हे लक्षात ठेवा.
- पूजा, विधी करताना माहितीच्या अभावाने काही चुका होऊ शकतात. त्यासाठी क्षमा प्रार्थना करा.
- पूजेच्या शेवटी साष्टांग प्रणाम करा.
- अक्षता व फुले मूर्तीवर वहावीत.
आता ॐ शांती: ॐ शांती: ॐ शांती: मंत्र म्हणून मूर्ती जागेवरून थोडीशी हलवा.
महत्वाचे: – विसर्जनावेळी केवळ या 2 अद्भुत शुभमंत्रांचा जाप करत बाप्पांना निरोप दिला तर जीवनात सुख-समृद्धी नांदेल आणि सुखकर्ता श्रीगणरायाचा इतका भरभरुन आशीर्वाद मिळेल की जन्मभर धन, धान्य, आयु-आरोग्य, समाधान कशाचीही कमतरता पडायची नाही.
प्रथम श्रीगणेश विसर्जन मंत्र: यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्। इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥
द्वितीय श्रीगणेश विसर्जन मंत्र: गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर। मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च॥
श्रीगणेशाचे हे ५ मंत्र सुद्धा शुभफलदायी मानले जातात.
- ॐ हस्ति पिशाचि लिखे स्वाहा
- गं क्षिप्रप्रसादनाय नम:
- ‘ॐ गं नमः’
- ॐ श्री गं सौम्याय गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।
- ॐ वक्रतुण्डैक दंष्ट्राय क्लीं ह्रीं श्री गं गणपते वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।
या मंत्राच्या व्यतिरिक्त श्रीगणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन श्रीगणेश स्तोत्र, श्रीगणेशकवच, संतान श्रीगणपती स्तोत्र, ऋणहर्ता श्रीगणपती स्तोत्र, मयूरेश स्तोत्र, श्रीगणेश चालीसाचा पाठ केल्याने बाप्पांची कृपा प्राप्त होते.
अनंत चतुर्दशीचा शुभ मुहूर्त: १ सप्टेंबर २०२० रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाच्या विसर्जनाचे शुभमुहूर्त खालीलप्रमाणे:
- सकाळचा मुहूर्त : सकाळी ०९:१० पासून ते दुपारी १:५६ वाजेपर्यंत
- गणेश विसर्जनाचा दुपारचा मुहूर्त : दुपारी ३:३२ पासून ते संध्याकाळी ५:०७ वाजेपर्यंत
- गणेश विसर्जनाचा संध्याकाळचा मुहूर्त : संध्याकाळी ८:०७ पासून ते ९:32 वाजेपर्यंत
- गणेश विसर्जनाचा रात्रीचा मुहूर्त : रात्री १०:५६ पासून ते पहाटे ०३:१० वाजेपर्यंत.
बोला गणपती बाप्पा… मोss रया !
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.