ब्रह्मांडनायक अक्कलकोट नरेश श्री स्वामी समर्थांवर आधारित नवीन मालिका स्वामीभक्तांच्या मनोरंजनासाठी येतेय…
श्री स्वामी समर्थांवर आधारीत मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ येणार आहे रसिक प्रेक्षकांच्या भेटीला. स्वामी समर्थांचे संपूर्ण जीवन चरित्र स्वामीभक्त प्रेक्षकांना या मालिकेद्वारे पहायला मिळणार आहे.
मित्रांनो! आपली मराठी भूमी ही संतमहात्मा आणि शूरवीरांची जन्मदात्री म्हणून ओळखली जाते. देव, देश आणि धर्म या तीन गोष्टीसाठी आपला राकट, कणखर तसाच भक्तीशक्तीचा अनोखा संगम वारसदार असलेल्या महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीवर असे अनेक थोर संत होऊन गेले ज्यांनी वाट चुकलेलयांना मार्ग दाखवला, त्यांचे मार्गदर्शक बनले.
View this post on Instagram
त्यांच्या दारी आलेल्या भक्तांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अशाच ब्रह्मांडनायक ‘श्री स्वामी समर्थ’ ह्यांनी भक्तांना सन्मार्ग दाखवला.अशाच असाधारण सिध्दपुरुषाचे जीवनचरित्र ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळणार आहे. शिरीष लाटकार लिखित या मालिकेची निर्मिती कॅम्सक्लब यांनी केली आहे.
या भक्तिरसपूर्ण मालिकेबद्दल बोलताना लेखक शिरीष लाटकर म्हणाले, “मुळात श्री स्वामी समर्थ हा माझाच नव्हे तर अखंड महाराष्ट्राचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. गेली वीस वर्षं मी स्वामी मार्गात आहे. त्यामुळे मी ज्यांची भक्ती करतो त्या स्वामींची गोष्ट मालिकेच्या रूपात सांगायला मिळणे हा एक आनंददायी अनुभव आहे आणि नुसता आनंदच नाही तर हे आ’व्हा’नसुद्धा आहे कारण श्री स्वामी समर्थांचे चरित्र अ’फा’ट आहे.
View this post on Instagram
बावीस वर्षांहून अधिक काळ स्वामी अक्कलकोटमध्ये होते. तिथे त्यांनी शेकडो लीला केल्या आणि स्वामींच्या त्या प्रत्येक लीलेमागे एक अर्थ आहे. एक शिकवण आहे. आपल्याकडे लोक च’म’त्का’र लक्षात ठेवतात पण त्यामागचे तत्त्व लक्षात ठेवत नाहीत. मी तेच तत्त्व उ’ल’ग’डू’न सांगण्याचा प्रयत्न मी या स्वामींच्या मालिकेद्वारे करणार आहे.”.
या मालिकेचे निर्माते राकेश सारंग म्हणाले, “आजच्या काळात तुम्हा आम्हाला पडणाऱ्या कितीतरी अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं श्री स्वामी समर्थांच्या चरित्रात भाविकांना मिळतात. त्यामुळे आजच्या या मॉडर्न पिढीला मठामधल्या प्रतिमेमागचे खरे स्वामी समर्थ कळावेत आणि स्वामी भक्तांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळावा म्हणून मी ही मालिका करायचं ठरवलं. ही मालिका मनोरंजनाबरोबरच खूप काही धार्मिक, अध्यात्मिक शिकवण देऊन जाईल असं मला वाटतं आणि टीव्ही या दृ’क’श्रा’व्य माध्यमाचा मूळ हेतू तोच आहे ना!”
तर श्री स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी ही भक्तिरसपूर्ण मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ २८ डिसेंबरपासून सोम ते शनि संध्या. ९.३० वा. कलर्स मराठीवर पहायला मिळणार आहे. सर्व स्वामी भक्तांनी याचा आस्वाद घ्यावा.
आपण जर मनापासून श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल व आपणांस स्वामी कृपेचा काही अनुभव असेल किंवा स्वामी कृपादृष्टीची आस असेल तर कृपया “श्री स्वामी समर्थ” अशी कंमेंट नक्की करा. स्वामींच्या कृपादृष्टीने आपल्या सर्व मनोकामना सिद्धीस जावो, हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना! शुभं भवतु:!