तज्ञ ते नटसम्राट म्हणून अजरामर कसे झाले डॉ श्रीराम लागूंनी, जाणून घ्या त्यांचा थक्क करणारा प्रवास…

थिएटर आणि सिनेमामध्ये अजरामर असं काम करून ठेवलेले ज्येष्ठ अभिनेते डॉ श्रीराम लागू आज जरी आपल्यात नसले, तरी त्यांच्या कलाकृती कायमस्वरूपी आपल्या सोबत आहेत. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये झालं.

त्यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेतले. 1950 च्या दशकात त्यांनी कान, नाक, घसा यांच्या शस्त्रक्रियांचं प्रशिक्षण घेतलं आणि पुण्यात पाच वर्ष कामही केलं. त्यानंतर ते कॅनडा आणि इंग्लंडला पुढील शिक्षणासाठी गेले.

1960 च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरु होता. त्यानंतर 1969 मध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्र सोडून पूर्णपणे नाटकात काम करण्यास सुरुवात केली.

See also  डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला को'रो'नाची लागण...

पुण्यातील पी.डी.ए. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. डॉ. श्रीराम लागू यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतही आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडली. अभिनयासह त्यांनी दिग्दर्शनही केलं. आपल्या फिल्मी कारकीर्दीत त्यांनी 100 हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटांत काम केले. मराठी रंगमंचात ते 20 व्या शतकातील सर्वोत्कृष्ट अभिनेते कलाकार मानले जात.

खरं तर व्यवसायाने श्रीराम लागू हे नाक, कान, घसा तज्ञ होता. त्यांनी वैद्यकीय अभ्यासही पूर्ण केला आणि नाट्यगृहात वेगवेगळ्या कलाकृती जन्माला घालून नावही कमावलं. वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांनी थिएटर आणि चित्रपटांच्या जगात प्रवेश केला.

मराठी रंगभूमीचा मैलाचा दगड मानल्या जाणार्‍या डॉ श्रीराम लागू यांच्या ‘नटसम्राट’ नाटकात त्यांनी गणपत बेलवलकर यांची भूमिका अप्रतिम रित्या साकारली. मराठी नाट्यसृष्टीत गणपत बेलवलकर यांची भूमिका इतकी अवघड मानली जाते की ही भूमिका साकारणारे अनेक कलाकार नेहमी गंभीर आजारी व्हायचे; पण लागू सरांकडे मात्र अभिनयाचं अजब रसायन होतं. कोणत्याही भूमिकेला साकारण्याचं त्यांच्याकडे चांगलंच कसब होतं.

See also  "या सुखांनो या" या लोकप्रिय मालिकेतील ती चिमुरडी बघा आता कशी दिसते, फोटो पाहून थक्क व्हाल!

डॉ श्रीराम लागू यांनी २० हून अधिक मराठी नाटकांचे दिग्दर्शनही केले. तसेच आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात वो आहट: एक अजीब कहानी ने केली. हा चित्रपट १९७१ मध्ये आला होता.

त्यानंतर त्यांनी पिंजरा, मेरे साथ चल, सामना, दौलत यासारख्या अनेक चमकदार चित्रपटांत काम केले. अभिनेता नसीरुद्दीन शाह एकदा म्हणाले होते की, डॉ श्रीराम लागू यांचं ‘लमाण’ हे आत्मचरित्र कोणत्याही अभिनेत्यासाठी बायबलसारखेचं आहे.

श्रीराम लागू यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलला. पर्वाच्या जन्मदिवसाच्या स्मृतीस डॉ श्रीराम लागू यांना भावपूर्ण आदरांजली !…

Leave a Comment

close