अखेर श्रुती हसनने केला आपल्या रिलेशनशिप विषयी खुलासा, सोशल मीडियावर वायरल होत आहे तिचा हा व्हिडीओ

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सुपरस्टार कमल हसन यांची मूलगी श्रुती हसन ही बॉलीवुड मध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक अपडेट्सची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तुम्हांला ठाऊक आहे का, श्रुतीने बर्याच दिवसांपासून स्वतःचे नाते आपल्या चाहत्यांपासून लपवून ठेवले होते. परंतु आता तिने जाहीरपणे आपल्या नात्याची कबुली दिली आहे. आपला एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेयर केला आहे. ज्यामध्ये ती आणि शंतनू हजारिका हे एकत्र दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये हे कपल त्यांच्या नात्याशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहेत. श्रुती हसन यामध्ये कपल चॅलेंज खेळताना दिसत आहे. मागील महिन्यात एका टॉकिंग शो मध्ये बोलताना या अभिनेत्रीने तिच्या लवलाईफ विषयी बरेचसे खुलासे केले आहेत. त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये सुद्धा ती अनेक खुलासे करताना दिसत आहे.

See also  अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिच्या मोबाईल कव्हर वरती लिहले आहे असे काही कि, वाचून थक्क व्हाल!

आपल्या इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या या व्हिडिओमध्ये श्रुती ही शंतनू हजारिका सोबत कपल चॅलेंज मध्ये सहभागी होताना दिसत आहे. या क्लिपची सुरुवात “प्रथम कोण इन्टरेस्टेङ होते?” या प्रश्नाने होते. तेव्हा अभिनेत्री पटकन शंतनूकङे बोट दाखवताना दिसते. त्यानंतर पुढे लगेचच प्रश्न येतो की,”पहिलं कोण आय लव्ह यू” म्हणालं. यावेळी दोघेही एकमेकांकडे बोट दाखवतात. परंतु श्रुती आपण पहिल्यांदा आय लव्ह यू म्हटल्याचे कबूल करते. या व्हिडिओला श्रुतीने “स्लिपी फेस” असे कॅप्शन दिले आहे.

श्रुतीने शेयर केलेल्या या व्हिडिओवर तिची बहीण अक्षरा हसन हिने कमेंट करत “खरंच गुङ मॉर्निंग” असे म्हटले आहे. या हसन बहिणी बरेचदा एकत्र दिसतात. कधी त्या वर्कआऊट सेशनसाठी, तर कधी आऊटिंगसाठी सोबत दिसतात. अलीकडेच श्रुती हसन हिने स्वयंपाक बनवतानाचा व्हिडीओ शेयर केला होता. ज्यामध्ये त्या दोघी बहिणी “पावलोवा” बनवताना दिसत होत्या.

See also  NCB कडून मोठी कारवाई, ड्र'ग्स पार्टी करणाऱ्या शाहरुख खानच्या मुलाला झाली अ'टक...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment