“अगं ए लहान पोरं घाबरतील ना तुला” असे म्हणत अभिनेत्री श्रुती मराठे हिला केले ट्रॉलर्सने केले ट्रोल…
मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री श्रुती मराठे हिला तर तुम्ही आम्ही सगळेच ओळखतो. श्रुती सोशल मीडियावर खूप जास्त एक्टिव असल्याने ती दरदिवशी स्वतःचे नवनवीन फोटोज् शेयर करत असते. तिच्या या लोभस व सुंदर फोटोंचे चाहते नेहमीच कौतुक करतात. त्यामुळे तिच्या सोशल मीडियावरील अकाउंटवर आपल्याला कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळतो.
परंतु यावेळी अभिनेत्री श्रुती मराठे हिने सोशल मीडियावर असे काही फोटोज् शेयर केले आहेत. ज्यामुळे चक्क लोकांनी आता तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आता असे का बुवा झाले, हा प्रश्न तुम्हांला देखील पडला असेलच. त्याचे कारण म्हणजे या फोटोमधील श्रुती चा आगळावेगळा मेकअप युजर्सला आवडला नाही.
मग काय विचारता सोय नाही हो….सोशल मीडियावर नेटकर्यांनी पीठ फासले का, चुना लावला का, मेकअपचा एवढा जाङ थर लावायची काही गरज आहे का? अशा अनेक कमेंट्स तिच्या फोटोवर केल्या आहेत.
सोनेरी रंगाची पॅन्ट, पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि सोनेरी रंगाचा ब्लेझर अशा ङॅशिंग लुकमधील फोटोज् श्रुती मराठे हिने शेयर केले आहेत. त्याचप्रमाणे या फोटोमध्ये श्रुतीने पांढऱ्या रंगाचा आयलायनर लावला आहे. तिचे हे फोटोज् पाहून कित्येकांनी अत्यंत मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
इतकंच नव्हे तर एका युजरने तर “घाबरतील की लहान पोरं” अशी कमेंट केली आहे. तर एका युजरने “खूपच बकवास मेकअप” अशी कमेंट केली आहे. एका युजरने तर मेकअपचा मोकार थर….. काही गरज आहे का याची…अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री श्रुती मराठे हिने तामिळमधील प्रेमसूत्र, मराठीत सनई- चौघङे यांसारखे अनेक सुपरङुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने कित्येक मराठी व तामिळ चित्रपटांत काम केले आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ती श्रुती प्रकाश म्हणून प्रसिद्ध आहे. तमिळ सिनेमा “इंदिरा विजहा” मधून तिने आपल्या अभिनयाला सुरुवात केली. श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकर सोबत विवाह केला. या कपलची ओळख “तुझी माझी लवस्टोरी” या चित्रपटाच्या सेटवर झाली आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.